अभिनेत्याला या सिनेमातील एक दृश्यादरम्यान अगदी डोळ्याखाली जखम झाली होती. त्यावेळी तपासणी करतानाचा फोटो विकीने शेअर केला आहे. यावेळी त्याच्या डोळ्याखाली काही टाकेही पडलेले. अभिनेत्याने हा फोटो शेअर करताना म्हटले आहे की, ‘#4yearsofManmarziyaa आशिकों की जान लेगा तू…! या दृश्यामुळे माझ्या डोळ्याखाली काही टाके पडले होते. विकी सांधूची भूमिका करताना एक मुक्त अनुभव मिळाला. एकत्र एक अविस्मरणीय प्रवास केल्याबद्दल कृतज्ञ आहे- अनुराग कश्यप, आनंद राय, तापसी पन्नू, अभिषेक बच्चन, कनिका धिल्लो’.
हे वाचा-सिनेविश्वात धमाकेदार एण्ट्रीनंतर हृता दुर्गुळेने घेतला ब्रेक! सेकंड हनीमून एन्जॉय करतेय अभिनेत्री
विकीने ही पोस्ट शेअर करताच त्याच्या पोस्टवर कमेंट्सचा पाऊस पडला आहे. ‘विकी सांधू’ हे या सिनेमातील विकीचे पात्र प्रेक्षकांना विशेष आवडलेले. यामध्ये त्याचा वेगळाच लूक पाहायला मिळाला होता. अनेकदा साधे-सोज्वळ शर्ट्स, एकाच रंगाचे टीर्शट्स किंवा पारंपरिक भारतीय वेषात दिसणाऱ्या विकी कौशलचा या सिनेमात स्वॅग वेगळाच होता. रंगीबेरंगी टीशर्ट, कानात बाळी, रंगवलेले केस आणि अतरंगी हेअर स्टाइल अशा रुपात विकीला पाहून चाहते आश्चर्यचकित झाले होते. पण त्यांना ‘मनमर्झियाँ’च्या विकीवरही प्रेम केलं. असाच काहीसा लूक तापसी पन्नूचाही होता.
हे वाचा-आणखी एका बॉलिवूड सिनेमात हिंदू देवतेचा अपमान? अजय-सिद्धार्थ अडचणीत
तापसीने या सिनेमात रुमी बग्गा ही भूमिका केली होती. विकी आणि रुमी यांची क्रेझी लव्ह स्टोरी, त्यानंतर तिचं झालेलं रॉबी भाटियाशी झालेलं लग्न अशी कहाणी या सिनेमात दाखवण्यात आली आहे. विकी, रुमी आणि रॉबी यांचा लव्ह ट्रँगल या सिनेमात पाहायला मिळाला.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या