४ वेळा विश्व चषक जिंकलेल्या खेळाडूनं अचानक घेतला संन्यास, नेमकं काय कारण

मुंबई : टीम इंडियाविरुद्ध सामना खेळल्यानंतर ३८ दिवसांनी अचानक संन्यास घेण्याची घोषणा खेळाडूनं केली. गेल्या काही दिवसांत क्रिकेटमधील अनेक खेळाडूंनी संन्यास घेण्याबाबत निर्णय घेतला आहे. या खेळाडूच्या निर्णयामुळे चर्चेला उधाण आलं आहे. ४ वेळा विश्वकप विजेत्या टीममधील खेळाडूनं असा अचानक संन्यास का घेतला याची चर्चा रंगली आहे.

ऑस्ट्रेलियन महिला दिग्गज क्रिकेट रेचेल हेन्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. हेन्स ऑस्ट्रेलियाच्या सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. तिने तिन्ही फॉरमॅटमध्ये अव्वल क्रमांकावर फलंदाजी करून सर्वांना आश्चर्यचकित केलं.

हेन्स महिला बिग बॅश लीगच्या आगामी मोसमात सहभागी होणार असली तरी तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपला प्रवास थांबवल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे ऑस्ट्रिलियाच्या महिला क्रिकेट टीमला याचा मोठा फटका बसणार आहे.

हेन्सने 2009 मध्ये वन डे क्रिकेटमधून डेब्यू केला. अवघ्या तीन दिवसांनंतर, हेन्सने ऑस्ट्रेलियासाठी पहिला कसोटी सामना खेळला आणि 2 धावांनी शतक हुकलं. तिने 2013 आणि 2022 मध्ये ऑस्ट्रेलियासाठी दोन ICC महिला विश्वचषक तसेच 2018 आणि 2020 मध्ये दोन T20 विश्वचषक जिंकले.

आयसीसीने हेन्सच्या निवृत्तीनंतर ट्विट करत लिहिले, ‘ऑस्ट्रेलियाच्या चार वेळा विश्वचषक विजेत्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे’.

Published by:Kranti Kanetkar

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.



Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

क्रिकेट विश्वात शोककळा, Heart Attack ने माजी अंपायरचं निधन

मुंबई : क्रिकेट विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. आयसीसीचे माज अंपायर आणि पाकिस्तानच्या …

जय हो… विश्व अजिंक्यपद स्पर्धेत विनेश फोगटने पटकावले कांस्यपदक, ठरली पहिलीच भारतीय

नवी दिल्ली : भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगटने विश्व अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली …