प्रसिद्ध कॉमेडी शो ‘द कपिल शर्मा शो’ पुन्हा एकदा काही नवीन कलाकारांसह पडद्यावर परतला आहे. शोच्या नवीन सीझनच्या पहिल्या एपिसोडमध्ये बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमारने त्याच्या ‘कठपुतली’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हजेरी लावली होती. विशेष म्हणजे या शोमध्ये चंदू उर्फ चंदन प्रभाकर देखील प्रेक्षकांना हसवताना दिसला होता. शोच्या पहिल्या एपिसोडमध्ये चंदूला पाहून दर्शकांना आश्चर्य वाटले कारण नुकतंच चंदन प्रभाकरने शो सोडल्याची घोषणा केली होती.
फारच कमी लोकांना माहिती असेल की, चंदन प्रभाकर कपिल शर्माच्या जवळच्या मित्रांपैकी एक आहे. तो अनेक वर्षांपासून कपिलच्या शोचा भाग आहे. अशा परिस्थितीत त्याने अचानक शो सोडल्याने प्रेक्षकांना धक्का बसला आहे. आता चंदननेच ‘द कपिल शर्मा शो’ सोडण्यामागचं खरं कारण उघड केलं आहे.
(हे वाचा:Jethalal: ‘तारक मेहता…’मधून का गायब आहेत जेठालाल? समोर आलं कारण )
नुकतंच ई-टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत चंदन प्रभाकरने सांगितलं की, ‘गेल्या पाच वर्षांपासून मी या शोचा भाग आहे. मी फक्त वेळेमुळे ब्रेक घेतला आहे. मला असे वाटते की जेव्हा तुम्ही दीर्घकाळ एखाद्या प्रोजेक्टचा भाग असता तेव्हा विश्रांती घेणे आणि इतर गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक होतं. मी वेब शोमध्ये काम करण्यास उत्सुक आहे. याशिवाय मला माझ्या कुटुंबासोबत दर्जेदार वेळ घालवायचा आहे. सोबतच कपिल शर्मासोबत वाद झाला असल्याच्या अफवांवर उत्तर देत चंदनने सांगितलं, ‘बऱ्याचवेळा आपल्याला लवकर समजत नाही की, आपल्याला नेमकं काय करायचं आहे. माझ्यासोबतसुद्धा असंच झालं होतं. मला पहिल्या एपिसोडची शूटिंग केल्यानंतर जाणवलं की, मला ब्रेक घ्यायचा आहे. त्यामुळे मी शोमधून ब्रेक घेतला. याचा लोकांनी कोणताही वेगळा अर्थ काढू नये’.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या