त्यापैकीच एक म्हणजे उज्जैन येथे मोठ्या उत्साहात महाकाल मंदिरात गेल्यानंतर आलिया आणि रणबीर यांना काही हिंदू संघटनांनी विरोध केला होता. ब्रह्मास्त्र रिलीज झाल्यानंतर जो काही प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे या सिनेमाची सगळी टीम खूप खुश आहे. त्यासाठी महादेवाचे आशीर्वाद घेण्यासाठी सोमनाथ मंदिरात जाण्याचा निर्णय अयान मुखर्जीने घेतला. आता अयानसोबत रणबीर आणि आलिया ही जोडीही सोमनाथ मंदिरात दर्शनासाठी गेली.
ब्रह्मास्त्र सिनेमाच्या प्रमोशनसाठी काही दिवसांपूर्वी हे तिघेही उज्जैनला पोहोचले. पण अयान मुखर्जीसोबत असलेल्या रणबीर आणि आलियाला महाकाल मंदिरात जाण्यासाठी हिंदू संघटनांनी प्रवेश नाकारला आणि फक्त अयानलाच परवानगी दिली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अयान एकटाच मंदिरात गेला. रणबीर आणि आलियाला मंदिरप्रवेश नाकारल्याचं मला खूप वाईट वाटलं असं म्हणत अयान याने त्याच्या मनातील खंत व्यक्त केली होती. खरंतर उज्जैनच्या महाकाल मंदिरात जाताना अयाननेच रणबीर आणि आलियाला तुम्ही दोघं मंदिरात येऊ नका, मी एकटाच जातो असा सल्ला दिला होता. पण आता चित्र बदललं असल्याने तिघांनी मिळून सोमनाथांचे दर्शन घेतलं.
हे वाचा-धनश्री-युझीमध्ये सारंकाही आलबेल! कपलचा रोमँटिक किस Video व्हायरल
माझे सिनेमे आवडत नसतील तर बघू नका असं आलिया एका मुलाखतीत म्हणाली होती त्याचा समाजात राग आहे. याशिवाय रणबीरने ११ वर्षांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये गोमांस आवडतं असं म्हटलं होतं. या कारणांमुळेच रणबीर आणि आलिया यांना महाकाल मंदिरात जाण्यापासून रोखण्यात आलं होतं.
हे वाचा-सिनेविश्वात चाललंय तरी काय? परदेशींना रोजगार; स्थानिक कर्मचारी मात्र बेरोजगार!
अयान मुखर्जी याने ब्रह्मास्त्र सिनेमाच्या प्रमोशनची सुरूवात बनारसच्या काशी विश्वेश्वर मंदिरापासून केली होती. त्याने प्रत्येक टप्प्यावर महादेवांचे आशीर्वाद घेतले आहेत. बायकॉटचा अडथळा पार करत ब्रह्मास्त्र सिनेमाने बॉक्स ऑफीसवर करोडो रूपयांची कमाई केल्याने अयानला आकाश ठेंगणं झालं आहे. त्यासाठी तो महादेवांच्या दर्शनासाठी सोमनाथ मंदिरात गेला. यावेळी त्याने आलिया आणि रणबीर यांनाही मंदिरात सोबत नेले.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या