मुनव्वर फारुकीचं गर्लफ्रेंड नजिलाबरोबर ब्रेकअप, नक्की कोण आहे कारण?

मुंबई : ‘लाॅक अप’फेम मुनव्वर फारुकी शो जिंकल्यानंतर चर्चेत आला. सुरुवातीला शोमध्ये असताना तो प्रकाशझोतात आला. त्यानंतर गर्लफ्रेंडमुळेही तो चर्चेत राहिला. शो संपल्यानंतर मुनव्वरनं नजिलाबद्दल सांगितलं होतं. पण आता दोघांचं ब्रेकअप झाल्याची माहिती समोर आलीय. मुनव्वर आणि नजिला वेगळे झाले आहेत.

मुनव्वर-नजिलाचा ब्रेकअप
बाॅम्बे टाइम्सशी बोलताना एका सूत्रानं दोघांचं ब्रेकअप झाल्याचं सांगितलं आहे. दोघांनी एकमेकांबरोबर न राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी इन्स्टाग्राम आणि सोशल मीडियावर एकमेकांना अनफाॅलो केलंय.

त्याप्रकारची भूमिका साकारायला मी केव्हाही तयार आहे…अनुजा साठेनं व्यक्त केली इच्छा

अंजली अरोरा आहे का कारण?
ई टाइम्सनं मुनव्वरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा मॅनेजर म्हणाला की तो आपल्या नात्याबद्दल काही बोलणार नाही. यामागचं कारण अजून नक्की कळलं नसलं, तरीही लाॅक अप शोमध्ये मुनव्वर आणि अंजली अरोरा जवळ आले होते. कदाचित तेच कारण असू शकतं, अशी चर्चाही आहे. अंजली मुनव्वरमध्ये गुंतत चालली होती. पण शो संपल्यावर मुनव्वरनं नजिलाबद्दल सांगितलं होतं.

लाॅक अप शोमध्ये सत्य नव्हतं सांगितलं
मुनव्वर आणि अंजलीबद्दल चर्चा सुरू झाली होती. लाॅक अपमध्ये तर दोघांचं अफेअर आहे, असं वाटत होतं. शिवाय त्यानं खरं काय तेही सांगितलं नव्हतं. मुनव्वर आता बिग बाॅस १६ शोमध्ये जाणार अशीही चर्चा आहे.

Video : आनंदाच्या पालखीचा मी भोई, भाऊजींनी साजरी केली ‘होम मिनिस्टर’ची १८ वर्ष!

स्टँडअप काॅमेडियन म्हणून सुरुवात करणाऱ्या मुनव्वर फारुकी यशाची नवनवीन शिखरं चढतोय. ओटीटी शो लाॅक अपनंतर त्यानं मागे वळून पाहिलंच नाही. मुनव्वरनं आपलं नवं गाणं ख्वाब समोर आणलंय. त्याच्या युट्युब चॅनेलवर हे गाणं आहे. हे रॅप साँग आहे. यातून मुनव्वर फारुकीनं आपल्या जीवनाची संघर्ष गाथा समोर मांडलीय. या गाण्यातून त्याचं करियर कसं घडलं हे चाहत्यांना कळलं.

उर्फीचा ब्रेकअप? हार्ट ब्रेक ड्रेसनं वेधलं साऱ्यांचं लक्ष

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

बांदेकरांच्या ‘होम मिनिस्टर’ला अठरा वर्ष पूर्ण; टीमसह केलं सेलिब्रेशन

मुंबई, 15 सप्टेंबर : झी मराठीवरील  होम मिनिस्टर’ कार्यक्रम महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेला. आदेश भाऊजींची पैठणी …

कंगना आहे विकी कौशलची फॅन!; ‘इमर्जन्सी’च्या सेटवर रिक्रिएट केला प्रसिद्ध डायलॉग

मुंबई, 15 सप्टेंबर : विकी कौशल स्टारर ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’ रिलीज होऊन जवळपास तीन …