काय करू अन् काय नको! आलिया भट्टच्या डोहाळेजेवणाच्या तयारीत रंगल्या बाळाच्या दोन्ही आज्जी

मुंबई- आलिया भट्ट आणि रणबीर कपूर या बॉलिवूडमधील हॉट जोडीच्या लग्नाची चर्चा थांबतेय न थांबतेय तोवर या दोघांनी बाळ होणार असल्याची गोड बातमी दिली. लवकरच कपूर आणि भट्ट कुटुंबात नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. बाळाच्या स्वागतासाठी सगळेच खूप वाट पाहत आहेत. प्रेग्नन्सीची बातमी दिली तेव्हा आलिया हॉलिवूड सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी होती. त्यानंतर तिचा डार्लिंग आणि पाठोपाठ ब्रह्मास्त्र सिनेमा रिलीज झाला.

‘प्रिन्स’ सूरज पवारला होऊ शकते अटक, शिर्डीत केली फसवणुक

प्रेग्नन्सीच्या पहिल्या महिन्यापासूनच बिझी असलेल्या आलियाचे डोहाळे पुरवायला काही तिच्या सासरमाहेरला इच्छा असूनही वेळ मिळाला नाही, पण आताही कसर भरून काढायचं ठरवलं आहे ते आलियाच्या बाळाच्या होणाऱ्या दोन्ही आज्जींनी. आलियाचं डोहाळं जेवण सोहळा दणक्यात करण्यासाठी आजी नीतू कपूर आणि सोनी राजदान तयारीला लागल्या आहेत.


आलिया आणि रणबीर यांनी पाच वर्षाच्या रिलेशनशीपनंतर लग्न केलं. १४ एप्रिलला रणबीरच्या वास्तू अपार्टमेंटमध्येच हा विवाह झाला. लग्नानंतर दोनच महिन्यात आलियाने आई होणार असल्याचं सांगताच तिच्या चाहत्यांना तर आनंद झालाच, पण कपूर आणि भट्ट कुटुंबालाही खूपच आनंद झाला. २०२२ हे वर्ष आलिया आणि रणबीर यांच्यासाठी खूप बिझी आणि अनेक घडामोडींचं ठरलं आहे. ज्या ब्रह्मास्त्र सिनेमाच्या सेटवर हे दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले त्याच ब्रह्मास्त्र सिनेमाच्या रिलीजवेळी आलिया आणि रणबीर आईबाबा होणार आहेत. त्यामुळे हा सिनेमा त्यांच्यासाठी खास ठरला आहे.

आपल्या प्रेमापासून दूर जाऊन पाहा, उर्वशी रौतेलानं शेअर केली पोस्ट; नेटकऱ्यांना आठवला ऋषभ पंत

ब्रह्मास्त्र सिनेमाचं प्रमोशन करण्यात गेल्या काही दिवसात आलिया दौऱ्यावर होती. आता ब्रह्मास्त्र सिनेमाने बॉक्स ऑफीसवर तगडी कमाई केल्याचाही आनंद आहे. त्यामुळे आता आलियाला थोडा वेळ मिळणार आहे. त्यामुळेच नीतू कपूर आणि सोनी राजदान यांनी आलियाच्या डोहाळेजेवणाच्या कार्यक्रमाची तयारी सुरू केली आहे. लवकरच आलियाचं शाही थाटात डोहाळेजेवण होणार आहे. कपूर आणि भट्ट कुटुंबीयांसाठी हा कार्यक्रम खास आहे, साहजिकच या सोहळ्यात काही कमी राहणार नाही याची काळजी बाळाच्या दोन्ही आज्जी घेत आहेत.


आलियाच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमासाठी कुणाकुणाला आमंत्रण द्यायचे त्याची यादी तयार झाली. आता हा कार्यक्रम ओटीभरण्याचा असल्यामुळे फक्त महिलावर्गालाच बोलवण्यात येणार आहे. त्यामुळे आलियाच्या ओटीभरणाला बॉलिवूड सेलिब्रिटी अभिनेत्री येणार हे तर नक्की. मग यामध्ये दीपिका पादुकोण, कतरिना कैफ या खास पाहुण्या असणार का याकडेही चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

Memes: आलियाच्या डोहाळे जेवणात दीपिका, कतरिनाचा भन्नाट डान्स, मराठी गाण्यावरील ठुमके पाहून हसू येईल

आलिया आणि रणबीरचं लग्न जसं त्याच्या घरीच झालं तसं आलियाचं ओटीभरणंही घरीच होणार असल्याची चर्चा आहे. अजून याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही. नीतू कपूर आणि सोनी राजदानला सध्या तयारीसाठी आलियाची बहिण शाहीन, रणबीरच्या बहिणी रिद्धीमा साहनी, करिना कपूर, करिश्मा कपूर या आत्या, मावशीसोबत आकांक्षा रंजन, नव्या नंदा, श्वेता बच्चन यांचीही मदत होत आहे.



Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

बांदेकरांच्या ‘होम मिनिस्टर’ला अठरा वर्ष पूर्ण; टीमसह केलं सेलिब्रेशन

मुंबई, 15 सप्टेंबर : झी मराठीवरील  होम मिनिस्टर’ कार्यक्रम महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेला. आदेश भाऊजींची पैठणी …

मुनव्वर फारुकीचं गर्लफ्रेंड नजिलाबरोबर ब्रेकअप, नक्की कोण आहे कारण?

मुंबई : ‘लाॅक अप’फेम मुनव्वर फारुकी शो जिंकल्यानंतर चर्चेत आला. सुरुवातीला शोमध्ये असताना तो प्रकाशझोतात …