CBSE School: नवी मुंबईत दोन सीबीएसई शाळा सुरू होणार

म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई

शिक्षण व्हिजन धोरणानुसार (Education Vision Policy) नवी मुंबईमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या सीबीएसई शाळा (New CBSE School) सुरू झाल्या. याअंतर्गत सुरुवातीला दोन शाळा होत्या. त्यांना मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता, आमदार गणेश नाईक यांनी आणखी दोन शाळा सुरू करण्याची सूचना महापालिकेला केली होती. त्यानुसार महापालिका हद्दीत आणखी दोन शाळा मंजूर झाल्या होत्या, परंतु त्या सुरू झाल्या नव्हत्या. महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्यासोबतच्या बैठकीत आमदार नाईक यांनी हा महत्त्वाचा विषय पुन्हा उपस्थित केला. त्यावर, आयुक्तांनी तातडीने शिक्षणाधिकाऱ्यांची बैठक घेऊन हा विषय मार्गी लावण्याची ग्वाही दिली. त्यामुळे नवी मुंबईत आणखी दोन सीबीएसई शाळा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

या बैठकीमध्ये शिक्षण, आरोग्य, प्रदूषण, पाणीटंचाई या विषयांवर चर्चा झाली. माजी खासदार डॉ. संजीव नाईक, माजी महापौर सागर नाईक, जयवंत सुतार, सुधाकर सोनवणे, माजी सभागृहनेते रवींद्र इथापे, माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत आदी पदाधिकारी बैठकीस उपस्थित होते.

महापालिकेच्या माध्यमातून कोपरखैरणे आणि नेरूळ येथे सीबीएसई बोर्डाच्या दोन शाळा सुरू आहेत. या शाळांमध्ये प्रवेश घेण्यास इच्छुक विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे आणखी दोन शाळा सुरू करण्याची मागणी आहे. परंतु या शाळा सुरू होण्यास विलंब झाल्याने आमदार गणेश नाईक यांनी हा विषय आयुक्तांसमोर मांडला. नव्याने प्रस्तावित सीबीएसईच्या शाळा वाशी आणि कोपरखैरणे येथे सुरू होणार आहेत.

धक्कादायक! एड्सबाधित मुलाला शाळेत प्रवेश नाहीच
जिल्ह्यात शिक्षकांची हजार पदे रिक्त; निम्म्याअधिक जागा माध्यमिक शाळांमधील
नेरूळमधील पालिकेच्या सीबीएसई शाळेत विद्यार्थ्यांना बसण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नाही. ही अडचण माजी नगरसेवक विशाल डोळस यांनी आमदार नाईक यांच्याद्वारे आयुक्तांपर्यंत पोहोचवली. या दुमजली इमारतीवर आणखी दोन मजले चढवण्याची मागणी त्यांनी केली. त्याला आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्याचबरोबर कोपरखैरणे येथील पालिकेच्या शाळेत विद्यार्थ्यांची बसण्याची गैरसोय होते आहे. कोपरखैरणे सेक्टर २ येथे पालिकेची एक इमारत बांधून तयार असल्याने या प्रशस्त इमारतीमध्ये वर्गखोल्या उपलब्ध करून देण्याची मागणी माजी नगरसेवक शंकर मोरे यांनी केली, तीदेखील आयुक्तांनी मान्य केली.

गणवेशासाठी पर्यायी उपाययोजना हवी
शालेय गणवेश खरेदीसाठी महापालिकेने थेट बँक ट्रान्सफर योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत, विद्यार्थ्यांनी आधी स्वखर्चाने गणवेश खरेदी करायचा असून खरेदीच्या पावत्या शाळेत जमा केल्यानंतर खर्चाची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होते. परंतु अनेक गरीब, गरजू विद्यार्थी गणवेश खरेदीसाठी रक्कम खर्च करू शकत नाहीत. त्यांची अडचण लक्षात घेऊन त्यांच्यासाठी पर्यायी उपाययोजना करण्याची सूचना आमदार नाईक यांनी केली.

ऑनलाइन शिक्षणाचे असेही तोटे, विद्यार्थ्यांना जडले डोळ्यांचे आजार

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत नाश्ता योजना, ‘या’ मुख्यमंत्र्यांकडून मोठी घोषणा

Free Breakfast Scheme: तामिळनाडू सरकारने राज्यातील विद्यार्थ्यांना एक अद्भुत भेट दिली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एमके …

Engineers Day 2022: विश्र्वेश्वरय्या यांचं इंजिनीअरिंगमधील योगदान

Happy Engineers Day 2022: भारताचे महान इंजिनीअर आणि भारतरत्न मोक्षगुंडम विश्र्वेश्वरय्या यांचा जन्मदिन १५ सप्टेंबर …