क्रीडा

रोहित शर्मा पहिल्या सामन्याला मुकणार, शामी- जाडेजा मालिकेतून बाहेर, उनाडकटचा संघात समावेश

BAN vs IND Test Series: भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यात येत्या 14 डिसेंबरपासून दोन सामन्याची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेपूर्वी भारतीय संघात मोठा बदल करण्यात आलाय. कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) दुखापतीमुळं पहिल्या कसोटी सामन्यातून बाहेर पडलाय. या सामन्यात केएल राहुलकडं (KL Rahul) नेतृत्व सोपवण्यात आलंय. याशिवाय, मोहम्मद शामी (Mohammed Shami), रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) मालिकेतून …

Read More »

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या टी-20 सामन्याला सुरुवात; पाहा दोन्ही संघाची प्लेईंग इलेव्हन

India Women vs Australia Women 2nd T20: मुंबईतील (Mumbai) डॉ. डीवाय पाटील स्पोर्ट्स अकादमी येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील दुसरा टी-20 सामना खेळला जातोय. या सामन्यात नाणेफेक जिंकून भारतीय महिला संघानं ऑस्ट्रेलियाच्या संघाला प्रथम फलंदाजीचं आमंत्रण दिलंय. पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. दुसऱ्या टी-20 सामन्यात हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ …

Read More »

पोर्तुगाल फुटबॉल विश्वचषकातून बाहेर; वर्ष 2019 आणि जर्सी क्रमांक 7 ची सर्वांना आठवण, कारण काय?

FIFA World Cup 2022: कतारमध्ये सुरु असलेल्या फुटबॉल विश्वचषकात (FIFA WC 2022) अनेक उलेटफेर पाहायला मिळाले. या स्पर्धेच्या क्वार्टर फायनलमध्येही अशाच काही गोष्टी पाहायला मिळाल्या, जिथे मोरोक्कोनं (Morocco) स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोचा (Cristiano Ronaldo) संघ पोर्तुगालचा (Portugal) 1-0 असा पराभव केला. या पराभवामुळं रोनाल्डोचं विश्वचषक जिंकण्याचं स्वप्नही भंगलं. रोनाल्डो हा 7 नंबरची जर्सी घालून खेळतो. पराभवानंतर रोनाल्डो खूपच निराश दिसत …

Read More »

हॅप्पी एनिवर्सरी विरुष्का; विराट-अनुष्काच्या लग्नाला पाच वर्ष पूर्ण, किंग कोहलीची खास पोस्ट

Virushka Anniversary 2022: भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि अनुष्का शर्मा (Anushka Sharma) लग्नाला आज 5 वर्षे पूर्ण झाली आहेत. लग्नाच्या पाचव्या वाढदिवसानिमित्त विराटनं त्याची पत्नी अनुष्का शर्मासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना एक खास संदेश लिहिलाय. कोहलीनं 11 डिसेंबर 2017 मध्ये अनुष्कासोबत इटलीत लग्न केलं. त्यांचा विवाह सोहळा पूर्णपणे कौटुंबिक होता. त्यात फार कमी लोकांना आमंत्रित करण्यात …

Read More »

क्रिकेटर मयांक अग्रवालनं आपल्या मुलाचं नाव काय ठेवलं? ऐकून तुम्हीही विचारात पडाल

भारतीय संघाचा स्फोटक सलामीवीर मयांक अग्रवाल (Mayank Agarwal) आणि त्याची पत्नी आशिता सूद (Aashita Sood) यांनी त्यांच्या पहिल्या बाळाचं स्वागत केलं. मयांक अग्रवालनं स्वत: सोशल मीडियाद्वारे याबाबत माहिती दिली.  अग्रवालनं सांगितलं की, त्यांच्या मुलाचा जन्म या महिन्याच्या 8 तारखेला झाला असून आम्ही त्याचं नाव ‘आयांश’ (Aayansh) ठेवलंय. मयांक आणि आशिताचं लग्न 4 जून 2018 रोजी झालं होतं. यापूर्वी दोघांनी एकमेकांना …

Read More »

बेन स्टोक्सची मॅक्युलमच्या वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी; कसोटीत सर्वाधिक षटकार ठोकणारा फलंदाज बनला

Most Sixes in Test Cricket: पाकिस्तानविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या (Pakistan vs England) दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सनं (Ben Stokes) विश्वविक्रमाला गवसणी घातलीय. या सामन्यातील दुसऱ्या डावात बेन स्टोक्सनं 41 धावांची महत्त्वपूर्ण भागिदारी केली. ज्यात एका षटकाराचा समावेश होता. या षटकारासह बेन स्टोक्सनं न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू ब्रेंडन मॅक्युलम (Brendon McCullum) वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी साधलीय. दरम्यान, पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या विजयानंतर …

Read More »

भारत विरुद्ध बांगलादेश कसोटी मालिकेला 14 डिसेंबरपासून सुरुवात; येथे पाहा संपूर्ण वेळापत्रक

IND vs BAN Test Series Schedule: तीन सामन्यांची एकदिवसीय मालिकेनंतर भारतीय संघ बांगलादेशसोबत (India vs Bangladesh) दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना 14-18 डिसेंबरदरम्यान खेळला जाईल. एकदिवसीय मालिका गमवल्यानंतर भारतीय संघ कसोटी मालिकेत बांगलादेशच्या संघाला पराभवाची धुळ चारण्यासाठी मैदानात उतरणार आहे. यापूर्वी भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेतील वेळापत्रकावर एक नजर टाकुयात. आयसीसी वर्ल्ड टेस्ट …

Read More »

तडफदार फलंदाजीनंतर भेदक गोलंदाजी; भारताचा बांगलादेशवर 227 धावांनी विजय

IND vs BAN 3rd ODI: ईशान किशनच्या (Ishan Kishan) वादळी द्विशतक आणि विराट कोहलीच्या (Virat Kohli) शतकानंतर शार्दूल ठाकूर (Shardul Thakur) आणि अक्षर पटेलच्या (Axar Patel) भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारतानं तिसरा आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात 227 धावांनी विजय मिळवला आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या भारतीय संघानं बांगलादेशसमोर 410 धावांचा डोंगर उभा केला. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी …

Read More »

ईशान किशनच्या तुफानी 150 धावा; बांगलादेशविरुद्धच्या अखरेच्या एकदिवसीय सामन्यात विक्रमाला गवसणी

Ishan Kishan Record: भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना चटोग्राम (Chattogram) येथील झहूर अहमद चौधरी स्टेडियमवर (Zahur Ahmed Chowdhury Stadium) खेळला जातोय. या सामन्यात नाणेफेक जिंकून बांगलादेशच्या संघानं भारताला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. या सामन्यात भारताचा युवा सलामीवीर ईशान किशननं (Ishan Kishan) मोठ्या विक्रमाला गवसणी घातलीय. बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात भारताकडून सर्वात जलद 150 धावा करणारा …

Read More »

धोनी-विराटलाही टाकलंय मागं; यावर्षात ‘या’ खेळाडूचं गूगलवर सर्वाधिक सर्च

Most searched Indian Cricketer: भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) आणि स्टार फंलदाज विराट कोहलीच्या (Virat Kohli) चाहत्यांची संख्या कोटींमध्ये आहे. महेंद्रसिंह धोनीनं 15 ऑगस्ट 2022 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलीय. मात्र, अजूनही त्याच्या फॅन फॉलोईंगमध्ये कोणतीही कमतरता पाहायला मिळाली नाही. पण यावर्षी गूगलवर सर्च केलेल्या भारतीय क्रिकेटपटूंमध्ये धोनी, विराट यांचं नाव नसून या यादीत प्रविण तांबेचं (Pravin Tambe) …

Read More »

भारतीय संघात दोन मोठे बदल; पाहा दोन्ही संघाची प्लेईंग इलेव्हन

IND vs BAN 3rd ODI: भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना चटोग्राम (Chattogram) येथील झहूर अहमद चौधरी स्टेडियमवर (Zahur Ahmed Chowdhury Stadium) खेळला जातोय. या सामन्यात नाणेफेक जिंकून बांगलादेशच्या संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 2-0 अशा पिछाडीवर गेलेल्या भारतीय संघ आजचा सामना जिंकण्यासाठी मैदानात उतरणार आहे. यासाठी भारतीय संघात दोन बदल …

Read More »

भारत-बांगलादेश यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्याचे लाईव्ह अपडेट्स

India tour Of Bangladesh: बांगलादेश दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघानं (Team India) अतिशय निराशाजनक कामगिरी करून दाखवलीय. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय संघानं तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 2-0 असा पराभव स्वीकारावा लागलाय. या मालिकेतील तिसरा आज चटोग्राम येथील झहूर अहमद चौधरी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत केएल राहुल (KL Rahul) भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे.  हेड टू हेड …

Read More »

IND vs BAN Live Streaming : भारत विरुद्ध बांगलादेश तिसरी वन-डे मॅच, कधी कुठं पाहाल सामना?

India vs Bangladesh Match Live Streaming : भारतीय क्रिकेट संघ (Team India) सध्या बांगलादेश दौऱ्यावर असून दौऱ्यात एकदिवसीय सामने आणि कसोटी सामने भारत खेळत आहे. या दौऱ्यातील तीन एकदिवसीय सामन्यांपैकी अखेरचा सामना आज रंगणार आहे. मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारताला एका विकेटने पराभव स्वीकारावा लागला. ज्यानंतर दुसरा सामना भारताने 5 धावांनी गमावला. विशेष म्हणजे दोन्ही सामने अगदी रोमहर्षक झाले. पण दोन्ही …

Read More »

India vs Australia : बेथ मूनीची विस्फोटक फलंदाजी, ऑस्ट्रेलियाचा भारतावर 9 गड्यांनी विजय

India Women vs Australia Women: ऑस्ट्रेलियाच्या महिला संघानं भारतीय महिला संघाचा दारुण पराभव केला आहे. सलामी फलंदाज बेथ मूनी हिच्या विस्फोटक फलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने भारताचा नऊ गड्यांनी पराभव केला. भारतानं दिलेलं 173 धावांचं आव्हान ऑस्ट्रेलियनं एक गड्यांच्या मोबदल्यात 11 चेंडू राखून पार केलं. या विजयासह दोन सामन्याच्या टी 20 मालिकेत ऑस्ट्रेलियानं 1-0 ने आघाडी घेतली आहे.  नवी मुंबईतील डी वाय …

Read More »

भारत विरुद्ध बांगलादेश तिसरा एकदिवसीय सामना, कसा आहे आजवरचा इतिहास, मैदानाची स्थिती?

IND vs BAN, Pitch Report : भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यात सुरु तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना आता खेळवला जाणार आहे. पहिले दोनही वन डे सामने गमावल्यामुळे मालिका भारताच्या हातातून निसटली आहे. पण आता किमान शेवटची वन डे जिंकून व्हाईट वॉश मिळण्याच्या नामुष्कीपासून भारताला वाचायचं आहे. त्यामुळे आजचा सामना भारतासाठी महत्त्वाचा आहे. तर या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी मैदानाची स्थिती …

Read More »

Womens IPL 2023 : महिला आयपीएलच्या तारखा ठरल्या? समोर आली महत्त्वाची माहिती

Women’s IPL 2023 : बहुप्रतिक्षीत महिला आयपीएलचं आयोजन लवकरच होणार असून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) महिला आयपीएलसाठी तयारी सुरू केली आहे. दरम्यान पुरुषांची आयपीएल 2023 1 एप्रिलपासून सुरू होण्याची शक्यता असून महिला आयपीएलचा आगामी हंगाम 3 ते 26 मार्च दरम्यान खेळला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दोन्ही स्पर्धा भारतात खेळल्या जातील. बीसीसीआयने अद्याप तारखा जाहीर केल्या नसल्या तरी महिला …

Read More »

भारतात रंगणार अंधांची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा

Blind  T20 World Cup 2022: भारतात 5 डिसेंबर 2022 पासून अंधांच्या तिसऱ्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात झाली. या स्पर्धेतील अंतिम सामना 17 डिसेंबर 2022 रोजी खेळला जाणार आहे. या स्पर्धेचे आयोजन देशातील आठ राज्यांत सुरू असून महाराष्ट्रात यामधील दोन सामने येत्या शनिवारी (10 डिसेंबर) आणि रविवारी (11 डिसेंबर) खेळले जातील. या सामन्यांच्या आयोजनाचे धनुष्य क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड …

Read More »

चौकार कसा मारायचा? राहुल द्रविडनं अॅक्शन करुन सुंदरला दाखवलं, पाहा VIDEO

IND vs BAN : भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यात सुरु एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना उद्या अर्थात शनिवारी (10 डिसेंबर) होणार आहे. या सामन्यात टीम इंडियाला कोणत्याही किंमतीवर विजय मिळवून क्लीन स्वीपची नामुष्की ओढावण्यापासून स्वत:ला वाचवायचं आहे. यासाठी टीम कसून सराव करत असून कोच राहुल द्रविडच्या (Rahul Dravid) प्रशिक्षणाखाली भारतीय संघ सामन्यापूर्वी चांगलाच घाम गाळत आहे. दरम्यान …

Read More »

महिला आयपीएलच्या प्रसारण हक्कांसाठी बीसीसीआयनं मागवले अर्ज, लवकरच हक्कांची होणार विक्री

Women’s IPL 2023 : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) महिला आयपीएलच्या आयोजनासाठी तयारी सुरू केली आहे. मंडळाने पहिल्या पाच सीझनचे मीडिया हक्क विकण्यासाठी अर्ज मागवले आहेत. आयपीएलच्या गव्हर्निंग कौन्सिलने एक निविदा जाहीर केली आहे. या निविदेतंर्गत 2023-27 पर्यंत महिला IPL च्या मीडिया हक्कांच्या खरेदीसाठी अर्ज मागवले गेले आहेत. ज्यांना माध्यमांचे अधिकार विकत घ्यायचे आहेत त्यांना या निविदेअंतर्गत कागदपत्रे सादर करावी …

Read More »

वेस्टइंडीजच्या अल्झारी जोसेफचा मोठा पराक्रम; 2022 मध्ये घेतल्यात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विकेट्स

Year Ender 2022: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात वेस्टइंडीजचा ( Australia vs West Indies) वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफनं (Alzarri Joseph) खास विक्रमाला गवसणी घातलीय. कॅलेंडर वर्षात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विकेट्स (Most wickets in international cricket in 2022) मिळवण्याचा मान त्यानं मिळवलाय. या वर्षी त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 65 विकेट्स घेतल्या आहेत. विशेष म्हणजे, त्यानं या वर्षी खेळल्या गेलेल्या 17 एकदिवसीय सामन्यात …

Read More »