भारतात रंगणार अंधांची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा

Blind  T20 World Cup 2022: भारतात 5 डिसेंबर 2022 पासून अंधांच्या तिसऱ्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात झाली. या स्पर्धेतील अंतिम सामना 17 डिसेंबर 2022 रोजी खेळला जाणार आहे. या स्पर्धेचे आयोजन देशातील आठ राज्यांत सुरू असून महाराष्ट्रात यामधील दोन सामने येत्या शनिवारी (10 डिसेंबर) आणि रविवारी (11 डिसेंबर) खेळले जातील.

या सामन्यांच्या आयोजनाचे धनुष्य क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड ऑफ महाराष्ट्र म्हणजेच सीएबीएम यांनी क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड इन इंडिया यांच्या मार्गदर्शनाखाली पेललं आहे. वरील दोन्ही सामन्यांचे आयोजन मुंबई क्रिकेट संघटना म्हणजेच एमसीएनं कांदिवलीच्या महावीर नगर येथील मैदानावर होणार आहे. हे सामने सकाळच्या सत्रात 9.30 ते दुपारी 1.30 च्या दरम्यान खेळले जातील.’एमसीए’ने  हे मैदान निःशुल्क उपलब्ध करून दिल्यानं ‘सीएबीएम’नं त्यांचे आभार मानले. भारतीय महिला क्रिकेटपटू पूनम राऊत, द्रोणाचार्य पुरस्कार विजेते प्रशिक्षक दिनेश लाड, क्रिकेटपटू पॉल वल्थाटी, पय्याडे स्पोर्ट्स क्लबचे डॉ. पी.व्ही.शेट्टी आणि हेतु चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष रिकब जैन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील.

हेही वाचा :  हॅप्पी बर्थडे गब्बर! शिखर धवनच्या कारकिर्दीतील 3 सर्वोत्कृष्ट खेळीवर एक नजर

सीएबीएम संस्थेबाबत महत्त्वाची माहिती
‘सीएबीएम’ ही संस्था 2 डिसेंबर 2011 पासून नोंदणीकृत संस्था आहे. गेल्या 11 वर्षांत महाराष्ट्रातील 4 हजाराहून अधिक अंध महिला, शालेय विद्यार्थी व तरुण अंध व्यक्तींना क्रिकेट खेळाचे प्रशिक्षण दिलं आहे. ही संस्था अंधांच्या विविध स्तरांवरील स्पर्धांचे आयोजन करून त्या मार्फत आपल्या राज्याचा संघ बांधून राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत आपल्या महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करते. तसेच ही संस्था या संस्थेस मागील 8 वर्षांपासून क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड इन इंडिया संलग्न असून ही संस्था जागतिक अंध क्रिकेट परिषद या आंतरराष्ट्रीय संस्थेस संलग्न आहे. या संघटनेकडून राबविलेल्या अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेत असते. आतापर्यंत  ११ अंध क्रिकेट खेळाडू आपल्या राज्यातून आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळले आहेत.  पय्याडे स्पोर्ट्स क्लबकडून संघातील सदस्यांना जेवणाची सोय करण्यात आली आहे. तर, फेअर प्ले स्पोर्ट्स मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड तर्फे ही स्पर्धा आयोजित केली जात आहे.

शासनाकडून मदतीची अपेक्षा
मुंबईत होणाऱ्या सामन्यांच्या आयोजनात  एकूण 360000/- इतका खर्च अपेक्षित आहे. यश खेळाडूंचा  प्रवास खर्च, आंतरराष्ट्रीय दर्जाचे निवास, भोजन व सामन्यांतील बक्षीस रक्कम हे सर्व फार खर्चिक असून आम्ही मागील दोन महिन्यांपासून विविध खाजगी कंपन्यांना तसेच निम शासकीय कार्यालयांना निधी संकलन प्रस्ताव दिलेले आहेत परंतु कोठून अद्याप सकारात्मक आश्वासन मिळाले नाही. तसेच, स्थानिक आमदार श्री सुनील राणेजी यांना आर्थिक साहाय्य मिळण्याबाबत  निवेदन दिले असून अद्याप कोणतेही आश्वासन मिळाले नाही, अशी खंत क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष पंकज चौधरी यांनी व्यक्त केली.

हेही वाचा :  बीसीसीआयच्या नव्या निवड समितीसाठी अर्ज करण्याची आज शेवटची तारीख

News Reels

पंकज चौधरी काय म्हणाले?
राज्याचे माननीय मुख्यमंत्री यांच्याशीही  पत्र व्यवहार केला असून त्यांच्याकडून अद्याप कोणतीही दखल घेतली गेली नाही. तसेच या स्पर्धेच्या आयोजनाबाबतची माहिती लोकप्रतिनिधीना दिला  असून शासनाची या बाबत उदासीन भूमिका दिसून आली आहे. आंतरराष्ट्रीय खेळाच्या आयोजनात शासकीय मदत मिळावी शासकीय परिपत्रक असून देखील याची दखल घेतली गेली नाही. आमचे मागील कामकाज पाहून कायम स्वरुपी शासकीय अनुदान मिळावे. तसेच, आपल्या राज्यातील प्रमुख शहरांत दिव्यांग अंध प्रवर्गातील खेळाडूंसाठी स्वतंत्र क्रीडांगण व चांगल्या दर्जाचे क्रिकेट स्टेडियम किंवा या करिता संस्थेस जागा आरक्षित करून मिळावी. जेणेकरून, अजून अनेक खेळाडूंना संधी उपलब्ध करून देणे शक्य होईल, असे  चौधरी यांनी सांगितले. सर्व स्पर्धांच्या आयोजनात फार खर्च लागतो. हा खर्च  सर्व पदाधिकारी स्वतः वर्गणी काढून करत असतात. आमच्या पुढील पिढी चांगली  व सुसंस्कृत नागरिक बनवी  म्हणून आम्ही झटत आहोत.  याची दखल शासनाने घेऊन चर्चा करून सहकार्य करणे अपेक्षित असल्याचे चौधरी म्हणाले.

हे देखील वाचा- 

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …