भारत विरुद्ध बांगलादेश तिसरा एकदिवसीय सामना, कसा आहे आजवरचा इतिहास, मैदानाची स्थिती?

IND vs BAN, Pitch Report : भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यात सुरु तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना आता खेळवला जाणार आहे. पहिले दोनही वन डे सामने गमावल्यामुळे मालिका भारताच्या हातातून निसटली आहे. पण आता किमान शेवटची वन डे जिंकून व्हाईट वॉश मिळण्याच्या नामुष्कीपासून भारताला वाचायचं आहे. त्यामुळे आजचा सामना भारतासाठी महत्त्वाचा आहे. तर या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी मैदानाची स्थिती अर्थात पिच रिपोर्ट (Pitch Report) कसा असेल? याबाबत जाणून घेणंही अत्यंत महत्त्वाचं आहे.

सामना होणाऱ्या चटोग्राम येथील झहूर अहमद चौधरी स्टेडियमची खेळपट्टी नवीकोरी असल्याने एक रंगतदार लढत होऊ शकते. बांगलादेशातील इतर कोणत्याही विकेटप्रमाणेच, ही खेळपट्टी देखील फिरकीपटूंना जास्त फायदा देणारी आहे. तर फलंदाजांना त्यांची लय मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागेल. या मैदानावर वनडेतील पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या फक्त 216 धावांची आहे, यावरून एक लो स्कोरिंग मॅच आज होऊ शकते.

कसा आहे आजवरचा इतिहास?

भारतीय संघ 38 वेळा बांगलादेशसमोर (India vs bangladesh) मैदानात उतरला आहे. आजवर खेळवल्या गेलेल्या सामन्यात टीम इंडियाचं (Team India) पारडं कमालीचं जड राहिल्याचं दिसून आलं आहे. भारताने 36 पैकी 30 सामन्यात विजय मिळवला आहे. तर, बांगलादेश संघाला 7 सामने जिंकता आले आहेत. तर एक सामना अनिर्णीत राहिला आहे.

हेही वाचा :  IPL Auction : आयपीएल लिलावात 'या' 7 नव्या भारतीय खेळांडूंना संधी मिळणार?

News Reels

कसा आहे भारतीय संघ?

केएल राहुल (कर्णधार, विकेटकिपर), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, इशान किशन (विकेटकिपर), शाहबाज अहमद, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद. सिराज, उमरान मलिक, कुलदीप यादव.

कुठे होणार लाईव्ह स्ट्रिमिंग

भारतीय वेळेनुसार भारत विरुद्ध बांगलादेश हा तिसरा एकदिवसीय सामना आज सकाळी 11.30 वाजता खेळवला जाईल. त्यापूर्वी अर्धातास आधी नाणेफेक होणार आहे. या सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच Sony Liv अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं.  याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील.   

हे देखील वाचा-

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …