Rishabh Pant : भारतीय संघाला दुखापतीचा झटका, ऋषभ पंत एकदिवसीय मालिकेतून बाहेर

Team India : भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यात आजपासून (4 डिसेंबर) एकदिवसीय मालिकेला सुरुवात होत आहे. या मालिकेतील पहिला सामना ढाका येथे खेळवला जात आहे. पण सामन्यापूर्वी नाणेफेक होताच बीसीसीआयने ट्वीट करत यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडल्याची माहिती दिली आहे. 

बीसीसीआयच्या मेडिकल टीमच्या देखरेखीखाली पंत असणार असून कसोटी सामन्यावेळी संघात पुनरागमन करु शकतो असं बीसीसीआयनं सांगितलं आहे. याशिवाय अक्षर पटेलही पहिल्या सामन्यासाठी उपलब्ध नसल्याचं बीसीसीआयनं सांगितलं.  याच कारणामुळे दोन्ही खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले नसून विशेष म्हणजे आयपीएल 2022 मध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या कुलदीप सेन (Kuldeep Sen) याला संघात संधी देण्यात आली आहे.

भारतीय संघाचा (Team India) विचार करता कर्णधार रोहित शर्मा पुन्हा संघात परतला आहे. तसंच स्टार सलामीवीर शिखर धवनही टीममध्ये असल्याने धवन-शर्मा ही हिट जोडी पुन्हा मैदानात उतरणार आहे. तसंच अंतिम 11 मध्ये विराट, केएल या दिग्गजांसोबत सुंदर, शाहबाज यांचाही समावेश आहे. नेमका भारतीय संघ कसा आहेत पाहूया…

हेही वाचा :  भारत-बांगलादेश यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्याचे लाईव्ह अपडेट्स

अशी आहे टीम इंडिया?

रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकिपर), वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, दीपक चहर, मोहम्मद सिराज, कुलदीप सेन

कसा आहे बांगलादेश संघ?

बांगलादेश संघाचा विचार करता त्यांचा कर्णधार तामिम दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर झाल्यावर लिटन दास कर्णधार आहे. त्याच्या जोडीला अनामूल हक, नजमुल हुसेन शांतो हे वरच्या फळीत फलंदाजी करतील. तर अष्टपैलूी कामगिरी स्टार खेळाडू शाकिप अल् हसन निभावेल. मुशफिकुर रहीम, महमुदुल्ला मधल्या फळीत असून अफिफ हुसैन, मेहदी हसन मिराज, हसन महमूद, मुस्तफिजुर रहमान, इबादोत हुसैन यांच्यावर गोलंदाजीची धुरा असेल.

बांगलादेशचे अंतिम 11 : लिटन दास (कर्णधार), अनामूल हक, नजमुल हुसेन शांतो, शाकीब अल हसन, मुशफिकुर रहीम (विकेटकिपर), महमुदुल्ला, अफिफ हुसैन, मेहदी हसन मिराज, हसन महमूद, मुस्तफिजुर रहमान, इबादोत हुसैन

 हे देखील वाचा-



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …