लाइफ स्टाइल

मराठा आरक्षणाच्या वादात मोठा ट्विस्ट; अजित पवार यांचे मनोज जरांगे यांना ओपन चॅलेंज

Ajit Pawar On Manoj Jarange : मराठा आरक्षणावरुन मंत्री छगन भुजबळ आणि मराठा आंदोकल मनोज जरांगे यांच्यात वाद सुरु आहे. आता या वादात अजित पवार यांची देखील भर पडली आहे. मुंबईत येण्याची भाषा करणाऱ्या मनोज जरांगे यांना अजित पवार यांनी जाहीर इशारा दिला आहे. कायदा हातात घेतला तर कारवाई करु असेही अजित पवार म्हणाले आहेत.  आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज मुंबईत …

Read More »

संपूर्ण इतिहास हा भूगोलावर अवलंबून आणि भूगोल म्हणजे तुमची… मराठा OBC आरक्षणावर राज ठाकरेंचे वक्तव्य

Raj Thackeray : मी मराठी माणसाला हे सतत बोलत राहणार, हे माझं काम आहे. संपूर्ण इतिहास हा भूगोलावर अवलंबून आहे. भूगोल म्हणजे तुमची जमीन, तीच जमीन ताब्यात घेणे म्हणजे  भूगोल हाच इतिहास आहे. सध्या महाराष्ट्राचा भूगोल धोक्यात आहे, तो विकत घेतला जातोय. पुढे तुमच्या लक्षात ही येणार नाही. नंतर जमिनीचा तुकडा म्हणजे तुमचं अस्तित्व तुमच्या ताब्यातून गेलं तर कोण तुम्ही? …

Read More »

नव्या वर्षात मुंबईकरांच्या खिशाला कात्री; रिक्षाचालक कोर्टात जाण्याच्या तयारीत, भाडे वाढण्याची शक्यता

Mumbai AutoRickshaw Fare: मुंबई महानगर क्षेत्रातील रिक्षाचे भाडे वाढण्याची शक्यता आहे. मुंबई रिक्षामेन्स युनियनने रिक्षाचे भाडे वाढवण्याचा प्रस्ताव सरकारकडे दिला होता. या प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी डिसेंबरपर्यंतची मुदत दिली होती. मात्र, आता मुदत उलटून गेल्यानंतरही सरकारने निर्णय न दिल्याने आता युनिअन मुंबई उच्च न्यायालयात धाव घेण्याची शक्यता आहे. मुंबईतील रिक्षा चालक कोर्टाचे दार ठोठावणार असल्याची माहिती समोर येतेय.  सध्या मुंबईत रिक्षाचे …

Read More »

मी शरद पवार यांना वाकून नमस्कार करेन; राज ठाकरे यांचे जाहीर वक्तव्य

Maharashtra Politics: मराठी कलाकारांच्या वागण्याबाबत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. मराठी कलाकारांचे वागण्यात नेमकी या चुक होते. त्यांनी आपल्या वागण्यात कशा प्रकारचा बदल केला पाहिजे हे राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राजकीय उदाहरण देऊनच पटवून दिले आहे. शरद पवार (Sharad Pawar) मला भटले तर मी त्यांना वाकून नमस्कार करेन असे राज ठाकरे म्हणाले.  पिंपरी चिंडवडमध्ये …

Read More »

बायोकाचा वाढदिवस विसरलात तर होईल तुरुंगवासाची शिक्षा! नेमकं काय आहे प्रकरण

Weirdest of laws from around the world : अनेक पुरुषांसाठी लग्नाचा वाढदिवस लक्षात ठेवणे कठीण होऊन जाते. तर दुसरीकडे त्याचबाबतीत स्त्रियांना आपल्या आयुष्यातील सगळ्या तारखा अगदी नीट लक्षात असतात, पण पुरुषांची अशावेळी गोची होते आणि हमखास ते अनेक दिवस विसरून जातात, त्यापैकीच एक लग्नाचा वाढदिवस (marriage anniversary) असतो. हा दिवस नात्यासाठी अगदी स्पेशल असून तो नेहमी दणक्यात साजरा करावा अशी …

Read More »

आता मुंबईत जमीन विकत घेऊन बांधा घर; म्हाडा घेऊ शकते मोठा निर्णय, नियम- अटी जाणून घ्या

Mhada Plots News: महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरणच्या (म्हाडा) मुंबई बोर्डाने प्लॉटचा लिलाव करण्याची योजना आखली आहे. म्हाडाला जो सर्वाधीक ऑफर देईल त्याला ती जमीन देण्यात येईल. सर्व विभागाच्या अधिकाऱ्याने त्यांच्या क्षेत्रात उपलब्ध असलेल्या प्लॉटची माहिती देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्लॉटची माहिती मिळाल्यानंतर त्या क्षेत्रानुसार त्याची किंमत ठरवली जाईल. किंमत ठरवल्यानंतर त्याचा लिलावासाठी जाहिरात काढण्यात येणार आहे. हे प्लॉट …

Read More »

‘बापाला कधी…’; 85 वाल्यांनी थांबले पाहिजे म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर

Maharashtra Politics : राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे काका शरद पवार यांच्यात टीका जोरदार वाद सुरु आहे. दोन्ही गटांनी एकमेकांवर जोरदार आरोप करत आपला गट खरी राष्ट्रवादी काँग्रेस आहे असे सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे. दोन दिवसांपूर्वी अजित पवार यांनी नाव न घेता शरद पवार यांना निवृत्तीचा सल्ला दिला होता. 80-85 वाल्यांनी थांबलेच पाहिजे, असे अजित पवार म्हणाले …

Read More »

बघता बघता पाळीव कुत्र्याने तब्बल 3 लाखाहून अधिक रुपये खाल्ले, मालकाने ‘या’ पद्धतीने मिळवले अडीज लाख

‘नजर हटी दुर्घटना घटी’ … हे वाक्य आपण अनेकदा ऐकलं असेल.  ज्यानंतर फक्त पश्चाताप करण्याची वेळ येते. हल्लीच एक असा प्रकार सोशल मीडियावर उघडकीस आला आहे. एका पाळीव कुत्र्याने आपल्या मालकाचे जवळपास 3 लाख रुपये खाल्ल्याचे समोर आले आहे. अचानक कुत्र्याची तब्बेत बिघडल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे. तेव्हा मालकाच्या लक्षात आलं की, आपल्या हातून खूप मोठी चूक झाली. …

Read More »

2 वर्षांत पूर्ण होणार पश्चिम रेल्वेचा महत्त्वाचा प्रकल्प; लोकलचा प्रवास वेगवान होणार

Mumbai News Today:  पश्चिम रेल्वेचा आता विरारच्या पुढे विस्तार होत आहे. डहाणूपर्यंत रेल्वेचा विस्तार झाल्यानंतर तिथले प्रॉपर्टीचे भावही वाढले आहेत. त्याचबरोबर तिथल्या लोकांचा प्रवास अधिक सुखाचा होण्यासाठी रेल्वे प्रशासन जोमाने काम करत आहे. विरार आणि डहाणू दरम्यान दोन रेल्वे रूळ टाकण्याचे काम सुरू होणार आहे. या प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहणाची प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. आत्तापर्यंत 23 टक्के काम पूर्ण झाले आहे …

Read More »

Maharashtra Rain : राज्याला बसणार अवकाळी पावसाचा तडाखा, पुण्यासह ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता!

Maharashtra Weather Update : ऐन हिवाळ्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने आता अनेकांची तारंबळ उडाल्याचं पहायला मिळतंय. गुरूवारी अचानक राज्यात पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांवर मोठं संकट ओढावलं आहे. राज्यातील अनेक भागांत पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास आता हिसकावला जाणार तर नाही ना? अशी चिंता लागून राहिली आहे. अशातच आता राज्यातील काही भागात अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात …

Read More »

दीड वर्षात मी एकही सुट्टी घेतली नाही, आता मोदींचे हात बळकट करायचेयत- मुख्यमंत्री

CM Eknath Shinde: गेल्या दीड वर्षात मी एकही दिवस सुट्टी घेतली नाही, आता मोदींचे हात आपल्याला बळकट करायचेयत, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किवळे येथील  शिवसेनेच्या शिवसंकल्प यात्रेदरम्यान बोलत होते. मावळ लोकसभेसाठी खासदार श्रीरंग बारणे यांच्यासाठी मावळ मधील किवळे येथे मुख्यमंत्र्यांनी जाहीर सभा घेतली.   पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्वर्गीय बाळासाहेब यांच्यावर आम्ही मते मागितली, …

Read More »

Pune News : ‘पालकमंत्री म्हणून मी…’, शरद मोहोळ हत्या प्रकरणावर अजित पवार स्पष्टच म्हणाले…

Ajit Pawar On Sharad Mohol Case : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळच्या हत्येप्रकरणी (Sharad Mohol Murder Case) पोलिसांनी आठ जणांना बेड्या ठोकल्या आहेत. तर 3 पिस्तुलं जप्त केल्यात. नामदेव पप्पू कानगुडे उर्फ मामा या हत्येचा मास्टरमाईंड असून त्यानेच प्लॅन करुन भाच्याला मोहोळ टोळीत घुसवलं होतं. साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर (Munna Polekar) गेल्या महिन्याभरापासून शरद मोहोळच्या टोळीत काम करत होता. …

Read More »

Forest Guard Job: 1 हजारहून अधिक वनरक्षक पदांची होणार भरती, वनमंत्र्यांचा मोठा निर्णय

Forest Guard Recruitment: वनरक्षक पदाच्या भरतीच्या प्रतिक्षेत बराच काळ असलेल्या युवा उमेदवारांची प्रतिक्षा संपली आहे. त्यांच्यासाठी राज्य सरकारने आनंदाची बातमी दिली आहे. 1256 वनरक्षकांची भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ही प्रक्रिया वेगात पूर्ण करण्याचे निर्देश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत. वन विभागाकडून एकूण 2138 वनरक्षक पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या 2138 वनरक्षक पदांसाठी 2 …

Read More »

सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी, नव्या वर्षात मिळाले 45 किमीच्या रिंग रोडचे गिफ्ट

Solapur Ring Road: सोलापुरातील जड वाहतूक कायमची हद्दपार करण्यासाठी सोलापूर शहराच्या बाहेरून रिंग रोड अर्थात बाह्य वळणाची सतत मागणी होत होती. एकंदरीत शहराचा विकास आणि लोकांची मागणी पाहता शहराच्या बाहेरून रिंग रोडचे काम 2022 पासून सुरू होते. ते काम आता पूर्ण झाले आहे. त्यामुळे सोलापूरचा रिंग रोड आता वाहनांसाठी खुला करण्यात आला आहे.  2024 या नवीन वर्षामध्ये सोलापूर जिल्ह्यातील लोकांना …

Read More »

Pune Crime News : शरद मोहोळचा गेम का झाला? टोळीत माणूस पेरून केला गेम; पोलिसांनी सांगितलं कारण!

Sharad Mohol Murder : कुख्यात गुंड शरद मोहोळ (Sharad Mohol) याची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली. त्यानंतर संपूर्ण पुण्यात (Pune Crime News) याचीच चर्चा होताना दिसत आहे. शरद मोहोळ याच्या हत्येनंतर पुण्यात गँगवॉर सुरू होणार की काय? अशी भीती व्यक्त केली जातीये. शरद मोहोळ याच्या टोळीतल्या माणसानेच, मुन्ना उर्फ साहिल पोळेकर (Munna Polekar) याने शरद …

Read More »

विमान 16 हजार फुटांवर असताना उडाली खिडकी; शेजारी बसलेल्या मुलाचा शर्ट फाटला अन्…

Alaska Airlines : गेल्या काही दिवसांपासून विमानातील अपघाताच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसतेय. अशातच आणखी एक विमान अपघाताची धक्कादायक घटना समोर आली आहे. अमेरिकेतील अलास्का एअरलाइन्सच्या विमानात ही भयानक घटना घडली आहे. विमान उड्डाण घेत असतानाच त्याच्या खिडकीचा काही भाग आकाशात तुटून हवेत उडाला. यानंतर प्रवाशांमध्ये घबराट पसरली आणि त्यानंतर अमेरिकेतील ओरेगॉनमध्ये विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. या सगळ्या …

Read More »

महाबळेश्वरला पर्यटनासाठी जात असाल तर सावधान! घोड्यांमुळे ओढावलंय भयानक संकट

-तुषार तपासे Mahabaleshwar Health Issues & Horse Connection: थंडीच्या दिवसातच नाही तर 12 महिने महाराष्ट्रातील पर्यटकांबरोबरच देशभरातील पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या महाबळेश्वरमध्ये एक अजब संकट समोर आलं आहे. येथील वेण्णा तलावाजवळ पर्यटकांचे आकर्षण असणाऱ्या घोडे सफारीमुळे वेण्णा तलावात घोड्यांची विष्ठा जात असल्याने महाबळेश्वरमध्ये वर्षानुवर्षे रोगराई पसरवत असल्याचे एका अभ्यासातून समोर झाले आहे. कोणी केला अभ्यास? पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स आणि …

Read More »

भारतीय नौदलाच्या मार्कोसपुढे समुद्री चाच्यांचा पराभव; सोमालियात अडकलेल्या 15 भारतीयांची सुटका

MV Lila Norfolk Hijacked : आफ्रिकन देश सोमालियाच्या किनाऱ्याजवळ एका मालवाहू जहाजाचे अपहरण झाल्याची बातमी समोर आल्यानंतर खळबळ उडाली होती. या जहाजावर 15 भारतीय क्रू मेंबर्स असल्याची माहिती समोर आल्यानंतर भारतीय नौदल अॅक्शन मोडमध्ये आली होती. भारतीय नौदल अपहरण झालेल्या जहाजाच्या आसपासच्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून होते. त्यानंतर आता अपहरण करण्यात आलेल्या जहाजावरील 15 भारतीयांसह सर्व 21 क्रू मेंबर्सची भारतीय …

Read More »

350 कोटींचा उल्लेख करत ठाकरे गटाला ‘महानंद’बद्दल वेगळीच शंका; राणेंना लगावला टोला

Uddhav Thackeray Group On Mahananda Dairy: महाराष्ट्रातील महानंद डेअरीचा कारभार गुजरातमधील कंपनीकडे हस्तांतरीत करण्याच्या वृत्तावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. असं असतानाच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गटाने महानंद डेअरीचा कारभार गुजरातमध्ये हलवण्यामागील कारणांबद्दल बोलताना काही धक्कादायक शक्यता व्यक्त केल्या आहेत. भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांची नावं घेत ठाकरे गटाने काही दावे केलेत. “‘महानंद’ विकली जात आहे …

Read More »

मराठा आरक्षण मिळाल्यानंतरही स्वस्थ बसणार नाही, मनोज जरांगे ‘ही’ मोहिम घेणार हाती

Maratha Reservation : आता आरक्षणाशिवाय माघार नाही अशी भूमिका मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी घेतली आहे. यासाठी मुंबई धडक देणार असून आझाद मैदानात 20 जानेवारीपासून मनोज जरांगे पाटील आमरण उपोषण करणार आहेत. मुंबईत शांततेत जायचं अन शांततेत यायचं. कुणी जर धिंगाणा करायला लागला, गाडी पेटवायला लागला, तर जाग्यावर धरून पोलिसांकडे न्यायचं, असं आवाहन मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला …

Read More »