मी शरद पवार यांना वाकून नमस्कार करेन; राज ठाकरे यांचे जाहीर वक्तव्य

Maharashtra Politics: मराठी कलाकारांच्या वागण्याबाबत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. मराठी कलाकारांचे वागण्यात नेमकी या चुक होते. त्यांनी आपल्या वागण्यात कशा प्रकारचा बदल केला पाहिजे हे राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राजकीय उदाहरण देऊनच पटवून दिले आहे. शरद पवार (Sharad Pawar) मला भटले तर मी त्यांना वाकून नमस्कार करेन असे राज ठाकरे म्हणाले. 

पिंपरी चिंडवडमध्ये 100 वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात राज ठाकरे यांनी जाहीर मुलाखतीत मराठी कलाकारांच्या वागण्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. मराठी कलाकार एकमेकांना मान सन्मा देत नाहीत. मराठी कलाकारांचे वर्तन कशा प्रकारचे असावे याबाबत काही सल्ले दिले आहे.  

अंड्या, पचक्या, आद्या, पाद्या… अशा प्रकारे मराठी कलाकार एकमेकांना एकेरी नावाने हाका मारतात. जाहीर कार्यक्रमात स्टेजवर प्रेक्षकांसमोर मराठी कलाकार एकमेकांना एकेरी नावाने बोलवतात. तुमची मैत्री चार भिंतीत असली पाहिजे. चार चौघात कलाकारांनी एकमेकांन मान दिलाच पाहिजे असा सल्ला राज ठाकरे यांनी दिला. 

हे पटवून देताना राज ठाकरे यांनी साऊथ च्या कलाकारांचा संदर्भ दिला. साऊथचे कलाकर रात्री एकत्र बसून दारु पित असले तरी सार्वजनिक कार्यक्रमात भेटल्यावर एकमेकांना मान देऊनच बोलतात. मराठी कलाकारांनी लोकांसमोर एकमेकांसमोर मान दिला पाहिजे. नाही तर कुणीही तुम्हाला मान देणार नाही. चार चौघांमध्ये एकमेकांना मान देऊनच बोलल पाहिजे. 

हेही वाचा :  Maharastra Politics : ताईंनी घेतला दादांचा धसका? सुप्रिया सुळेंनी पुढील 10 महिन्यांसाठी घेतला मोठा निर्णय!

कलाकार नाक्यावर उभे राहिले तर त्यांना कुणीही पहायला येत नाही. लोकांनी तुम्हाला पैसे देऊन पहायला यावे असे वाटत असेल तर मान हा दिलाच पाहिजे. अशोक सराफ हे मराठी मधील खूप दिग्गज कलाकार आहेत. मात्र, कार्यकर्मांमध्ये अशोक सराफ यांच्या बद्दल चौकशी करताना मराठी कलाकार मामा आलेत का?  असा प्रश्न विचारतात. मात्र, मामा न म्हणता अशोक सर असं आदराने बोलले पाहिजे. एकमेकांना मान देऊनच बोलले पाहिजे तरच नाट्य क्षेत्राचे भविष्य आहे.

सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये  एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून एकेरी भाषेत बोलणे मराठी कलाकारांनी टाळले पाहिजे असे राज ठाकरे म्हणाले.   राजकीय भाषेत सांगायचे झाले तर या स्टेज वर जर शरद पवार आले तर मी त्यांना पाया पडेल, राजकीय भूमिका स्टेज वर….! तुम्ही एकमेकांचा आदर राखला पाहिजे…! असं राज ठाकरे म्हणाले. 

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Akola News : मुलांची काळजी घ्या! कुलरचा शॉक लागून 7 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

जयेश जगड, झी मीडिया, अकोला (Akola News in Marathi) : विदर्भ, मराठवाड्यासह राज्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढतोय. अशात …

कोकण रेल्वेचा मोठा निर्णय; वाढत्या गर्दीमुळं ‘या’ स्थानकांदरम्यान धावणार विशेष रेल्वे; तातडीनं पाहा वेळापत्रक

Konkan Railway News : मे महिन्याची सुट्टी, शिमगा आणि गणेशोत्सव यादरम्यान कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या …