लाइफ स्टाइल

रशियाच्या 8 भागात युक्रेनचा ड्रोन हल्ला, 3 पॉवर स्टेशन आणि इंधन डेपो नष्ट, रशियाकडून 50 ड्रोन हल्ल्याचा दावा

अमेरिकन मीडिया सीएनएनने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी पहाटे युक्रेनने रशियनमधील 8  ठिकाणी लांब पल्ल्याच्या स्ट्राइक ड्रोनने हल्ला केला. या हल्ल्यात इंधन डेपो आणि पॉवर सबस्टेशनला लक्ष्य करण्यात आले. (Ukraine drone strike in 8 areas of Russia 3 power stations and fuel depots destroyed Russia claims 50 drone strikes) वृत्तसंस्था रॉयटर्सने बेल्गोरोड शहराच्या गव्हर्नरच्या हवाल्याने सांगण्यात आलंय की, या हल्ल्यात दोन नागरिकांचाही …

Read More »

अर्जेंटिनामध्ये सापडला 9 कोटी वर्षे जुना डायनासोर, नाव ठेवलं ‘शिव’! कधीकाळी पृथ्वीवर करायचा राज्य

Dinosaur shiva: अर्जेंटिनामध्ये एक विशालकाय डायनासोरचे जीवाश्म शोधण्यात आलंय. हा डायनासोर 9 कोटी वर्षांआधी येथे वास्तव्यास होताय ज्याची मान चे शेपटीपर्यंतची लांबी 98 फूट इतकी होती. या डायनासोरचे नाव शंकर भगवानाच्या नावावरुन ठेवण्यात आले आहे. संशोधकांनी गेल्या वर्षाच्या अखेरीस पश्चिमी अर्जेंटिनामध्ये बस्टिंगोकीटिटन शिवचा शोध लावला होता. आता या डायनासोरचा व्हिडीओ आणि फोटो बनवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. यासाठी वैज्ञानिक आर्टिस्टची मदत …

Read More »

रोज 5 लाख किंमतीच्या सोन्याची राख ओकतोय पृथ्वीवरील ‘हा’ ज्वालामुखी; NASA ची माहिती

Rs 5 Lakh Gold Ejectes Per Day: पृथ्वीवर एक असा ज्वालामुखी आहे ज्यामधून चक्क खऱ्याखुऱ्या सोन्याचा पाऊस पडतो असं सांगितलं तर तुमचा कदाचित यावर विश्वास बसणार नाही. पण खरोखरच इरेबस डोंगरातील एका ज्वालामुखीतून रोज लाखो रुपयांचं सोनं बाहेर फेकलं जात आहे. हा सक्रीय ज्वालामुखी अंटार्टिका खंडात आहे. अर्थात या ज्वालामुखीमधून इतरही अनेक पदार्थ बाहेर फेकले जातात. अमेरिकेतील अंतराळ संस्था असलेल्या …

Read More »

इराण की इस्रायल? अधिक शक्तीशाली कोण? कोणाकडे किती अणूबॉम्ब, तोफा? 2,84,742 कोटी कनेक्शन

Israel Vs Iran War Military: इराणने इस्रायलवर 14 एप्रिल रोजी केलेल्या हल्ल्याला इराणने आज म्हणजेच 19 एप्रिल रोजी जशास तसं उत्तर दिलं आहे. पहाटेच्या सुमारस इराणने अण्विक केंद्र असलेल्या इस्फहान शहरावर हल्ला करण्यात आला. येथील एअरपोर्ट पहाटेच्या सुमारास अचानक बॉम्बस्फोटांनी हादरलं. या विमातळावरील सर्व उड्डाणे दुसरीकडे वळवण्यात आली आहे. तसेच या हल्ल्यानंतर इराणने इस्रायला तसेच इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना …

Read More »

‘जग बदलणारा बापमाणूस’ पुस्तकाचे अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात प्रकाशन

Jag Badandana Bapmanus : अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात आंबेडकर इंटरनॅशनल मिशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या समारोहात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन चरित्रावर लेखक व वक्ते जगदीश ओहोळ यांनी लिहिलेले प्रेरणादायी पुस्तक ‘जग बदलणारा बापमाणूस’ या पुस्तकाच्या दहाव्या आवृत्तीचे प्रकाशन अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंती महोत्सव कार्यक्रमात मोठ्या थाटात अनेक आंतरराष्ट्रीय विद्यापीठातील ज्ञानवंत मान्यवरांच्या हस्ते करण्यात …

Read More »

….अन् दुबईतील आकाश अचानक हिरवं पडलं; मुसळधार पाऊस आणि वादळातील VIDEO व्हायरल

Viral Video: गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर दुबई चर्चेत आली आहे. याचं कारण दुबईत गेल्या काही दिवसांपासून वातावरणात अचानक बदल झाले असून मुसळधार पाऊस आणि वादळाने हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे दुबईत पूरस्थिती निर्माण झाली आहे. रस्ते, विमानतळं, दुकानं सगळीकडे पाणी साचलं आहे. रस्त्यांवर पाण्यात कित्येक गाड्या अडकून पडल्या असून, विमानसेवाही ठप्प आहे. दुबईत गेल्या 75 वर्षात पहिल्यांदाच इतक्या पावसाची …

Read More »

कायमचं Work From Home! पुण्यात ऑफिस असलेल्या कंपनीकडून Good News; 30 हजार कर्मचाऱ्यांना फायदा

Permanently Work From Home: कोरोनाच्या लाटेनंतर आता अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कार्यालयामधून काम करणं बंधनकारक केलं आहे. अनेक ठिकाणी आता कंपन्यांनी हायब्रीड म्हणजेच काही दिवस घरुन आणि काही दिवस कार्यालयातून काम करण्याची मूभाही काढून घेत सरसकट कोरोनाच्या पूर्वीच्या काळात चालायचं त्याप्रमाणे कार्यालयातूनच काम करण्याचं धोरण स्वीकारलं आहे. त्यामुळे मागील अडीच ते तीन वर्षांपासून घरुन काम करण्याची सवय सोडून आता कर्मचाऱ्यांना …

Read More »

जपानच्या बुलेट ट्रेनमध्ये साप घुसतो तेव्हा… अख्खी रेल्वे यंत्रणा लागली कामाला

Bullet Trains : रेल्वे प्रवास करत असताना त्यादरम्यान येणारे अनुभव अनेकदा हैराण करणारे असतात. वेळ वाचवण्यासाठी म्हणून उत्तम ठरणाऱ्या या रेल्वे प्रवासातही अनेक प्रकार आहेत. मुळात रेल्वेचेच कैक प्रकार आहेत. भारतात सध्याच्या घडीला वंदे भारत ही सेमी हायस्पीड रेल्वे प्रवाशांच्या अशाच गरजा पूर्ण करत त्यांचा प्रवास अधिक सोपा करण्याचं काम करत आहे, तर तिथे जगाच्या पाठीवर रेल्वे हा आकर्षणाचा विषय …

Read More »

पृथ्वीजवळ सापडलं भलंमोठं Black Hole; सूर्यापेक्षा 33 पट वजनदार! आकाशगंगेत पहिल्यांदाच..

Black Hole Found Near Earth: अंतराळ संशोधकांनी आपल्याच आकाशगंगेमध्ये एक मोठ्या आकाराचं कृष्णविवर म्हणजेच ब्लॅकहोल शोधून काढलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे हे कृष्णविवर पृथ्वीपासून तुलनेनं जवळ आहे. कृष्णविवरांचं आकारमान आणि अंतराळातील अंतरांचा संदर्भ लक्षात घेतल्यास हे कृष्णविवर पृथ्वीच्या फारच जवळ असल्याचं संशोधकांचं म्हणणं आहे. हे कृष्णविवर 2 हजार लाइट वर्ष अंतरावर आहे. म्हणजेच प्रकाशाला त्या ठिकाणी पोहचण्यासाठी 2 हजार वर्ष लागतील …

Read More »

Dubai Rain: दुबईची झाली डुबई! वर्षभराचा पाऊस अवघ्या 24 तासांत कसा झाला?

Dubai Rain: दुबई हे नाव जरी काढलं तरी आपल्या डोक्यात मोठमोठ्या ईमारती, महागड्या गाड्या, श्रीमंत व्यक्ती असं काहीसं चित्र समोर उभं राहतं. मात्र सध्या दुबईचं नाव चर्चेत आहे ते म्हणजे पावसाने घातलेल्या हाहाकारमुळे. अवघ्या काही तासांच्या पावसाने श्रीमंतांची ही दुबई वाहून गेली, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या दुबईत आकाशातून एवढ्या पाण्याचा वर्षाव झाला की या …

Read More »

कर्ज काढण्यासाठी बँकेत थेट ‘मृतदेह’ घेऊन पोहोचली महिला, कर्मचाऱ्यांसमोर त्याच्याशी गप्पाही मारल्या; मग…

बँकेतून कर्ज घेण्याची गरज प्रत्येकाला आयुष्यात कधी ना कधीतरी भासत असते. पण हे कर्ज घेताना त्यातून काही पळवाट काढता येते का असा काहींचा प्रयत्न असतो. दरम्यान अशाच एका प्रकरणात एक महिला चक्क मृतदेह घेऊन बँकेत पोहोचली होती. इतकंच नाही तर त्याच्याकडून आपल्या नावे कर्ज मिळवण्याचा प्रयत्नही तिने केला. बँक कर्मचाऱ्यांनाही त्याची स्थिती पाहून काही वेळासाठी शंका आली होती. याचा रंग …

Read More »

33 वर्षं राबलेल्या कर्मचाऱ्याला Microsoft नं वाईट पद्धतीनं कामावरून काढलं; त्याच्या ‘त्या’ कृतीनं सर्वांनाच रडवलं…

Job News : एखाद्या ठिकाणी जेव्हा कोणा व्यक्तीची नोकरी सुरु होते तेव्हा त्या व्यक्तीची संस्थेप्रती असणारी एकनिष्ठा, समर्पकता आणि कामावर असणारं प्रेम या सर्व गोष्टी कर्मचारी म्हणून नकतळत त्या व्यक्तीला घडवत असतात. अनेकांसाठी नोकरीचं ठिकाण हे एखाद्या कुटुंबाप्रमाणे असतं. तिथं चांगले मित्र मिळतात, सुखदु:खाची आणि अनुभवांची देवाणघेवाण होते आणि यातूनच चांगलं काम करण्याची प्रेरणा मिळते. ओघाओघानं नोकरीच्या ठिकाणी प्रगती, पगारवाढ, …

Read More »

Video: दुबईत पावसाने हाहाकार! गुडघाभर पाण्यातून विमानांचं टेकऑफ, पुराच्या पाण्यात अडकल्या Rolls-Royce

Dubai Airport Flooded Viral Video: संयुक्त अरब अमिराती म्हणजेच युएईमधील सर्वात स्मार्ट शहर असलेल्या दुबईची जगभरामध्ये तेथील श्रीमंतीसाठी चर्चा असते. जगभरातील अब्जाधिशांनी केलेली गुंतवणूक आणि येथील आलिशान घरांबरोबरच पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या या शहरावर सध्या एक मोठं नैसर्गिक संकट ओढावलं आहे. युएईमध्ये मागील 2 दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. येथे पावसाने हाहाकार माजवला आहे. या शहरातील भव्यता, चकाचक इमारती, मोठे …

Read More »

Travel : ‘या’ समुद्रात कोणीही बुडत नाही; पोहता येत नसणारेही इथं हमखास भेट देतात, महिलांसाठी तर असते ब्युटी ट्रीटमेंट

Dead Sea Secrets : पृथ्वीवर अशी कैक ठिकाणं आहेत, जी आपल्या कल्पनाशक्तीला आणि वास्तवालाही शह देतात. काही ठिकाणांची भौगोलिक रचना आपल्याला भारावून सोडते, तर काही ठिकाणांची कधीही न उलगडलेली रहस्य आपल्या कुतूहलात आणखी भर टाकण्याचं काम करतात. सध्या अनेकांच्या वाट्याला आलेली आर्थिक सुबत्ता, नोकरीच्या विविध संधी या आणि अशा अनेक कारणांनी या भारावणाऱ्या ठिकाणांना भेट देण्याची संधी मिळते. यातलीच एक …

Read More »

2 महिन्यानंतर कोमातून बाहेर आली 25 वर्षीय Adult Star; ‘त्या’ रुममध्ये फेब्रुवारीत काय घडलं? गूढ कायम

25 Year Adult Star In Coma: एडल्ट स्टार एमिली विल्सच्या कुटुंबाने तब्बल 2 महिन्यांनंतर ती कोमातून बाहेर आल्याची माहिती दिली आहे. 11 मार्च रोजी एमिली कोमात असल्याची माहिती पहिल्यांदा समोर आली आहे. त्यावेळी फेब्रुवारी महिन्यात एमिलीला आलेल्या हार्ट अटॅकमुळे ती कोमात गेल्याचं कुटुंबाने सांगितलं होतं. आता ही माहिती दिल्यानंतर जवळपास महिन्याभराहून अधिक काळाने कुटुंबाने एमिली कोमातून बाहेर आल्याचं सांगितलं आहे. …

Read More »

नग्नावस्थेत महिलेचा विमातळावर गोंधळ! किंचाळत करत होती S*x ची मागणी; Video व्हायरल

Woman Strips Naked On Airport: अंमली पदार्थांचं सेवन करुन एका महिलेने विमानतळावर गोंधळ घातल्याचा विचित्र व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. जमैकामधील किंग्स्टन विमानतळावरील व्हिडीओमध्ये नशेत असलेली एक महिला अंगावरील कपडे काढून आरडाओरड करताना दिसत आहे. आपल्या अंगावरील कपडे काढून अर्धनग्नावस्थेत ही महिला सेक्सची मागणी करत आरडाओरड करत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. अंमली पदार्थांच्या अंमलाखाली असलेल्या या महिलेने विमानतळावर पोहचल्यावर गोंधळ घालण्यास …

Read More »

जोरु का गुलाम? बायकोचे पाय धुवून पाणी पिणाऱ्या ‘या’ व्यक्तीचा Video पाहिला का?

Pakistani Couple Viral Video : इंटरनेटवर एक व्हिडीओ धुमाकूळ घालत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती दोन तरुणींच्या पायाशी बसला आहे. त्यातील एका महिलेचे तो पाय दाबताना दिसत आहे. हे पाहून नेटकरी अवाक् तर झाले आहेत. शिवाय त्याच्यावर खूप टीका होतेय. इंटरनेटवर धुमाकूळ घालत असलेला हा व्हिडीओ पाहून यूजर्सला जोरू का गुलाम या चित्रपटाची आठवण होतेय. जे नवरे …

Read More »

नदीच्या मध्यभागी दगडावर उभारलं घर; गेल्या 50 वर्षांपासून झेलतंय प्रवाहाचा मारा, तरीही अभेद्य

जगात असे अनेक लोक आहेत ज्यांना एकांतात राहायला आवडते. शांततेच्या शोधात हे लोक डोंगरावर जातात किंवा समुद्रात जातात. शहरांच्या गजबजाटापासून दूर जाण्याची प्रत्येक व्यक्तीची इच्छा असली, तरी लोकवस्तीपासून दूर नदीच्या मधोमध दगडावर बांधलेल्या घरात तुम्हाला राहता येईल का? असेच एक घर सर्बियामध्ये अस्तित्वात आहे. जे नदीच्या मधोमध दगडावर बांधलेले आहे. पण त्या मागची इंटरेस्टिंग फॅक्ट्स काय? रेकॉन टॉक आणि माय …

Read More »

100,000,000,000 ! व्हिएतनाममध्ये सर्वात मोठा आर्थिक घोटाळा, महिला उद्योजकाला फाशीची शिक्षा, रस्त्यावरुन थेट अरबरपती

व्हिएतनाममधील महिला अब्जाधीशाला कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. रिअल इस्टेट क्षेत्रातील दिग्गज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या Truong My Lan यांना अब्ज डॉलर्सची फसवणूक केल्याप्रकरणी ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. हा देशातील आतापर्यंत सर्वात मोठा आर्थिक घोटाळा असल्याचं बोललं जात आहे. या घोटाळ्याचा फटका तब्बल 42 हजार लोकांना बसला आहे. यानंतर ही महिला नेमकी कोण आहे आणि तिने रिअल इस्टेट क्षेत्रात इतकं …

Read More »

चिकन नीट शिजलं नाही, संतापलेल्या पतीने पत्नीला थेट खिडकीतून खाली फेकलं… Video व्हायरल

Pakistan Viral Video : पती आणि पत्नीमध्ये (Husband-Wife) या ना त्या कारणावरुन भांडणं होत असतात. काहीवेळा समजुतदारपणे ती भांडणं मिटवली जातात. तर काही वेळा हा वाद अकदी टोकाला जातो. यातून  एकमेकांवर हल्ला करण्याचीही घटना घडते. अशाच एका घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहे. व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत एक महिला उंचावरुन खाली रस्त्यावर पडताना दिसत आहे. परिसरात …

Read More »