Dubai Rain: दुबईची झाली डुबई! वर्षभराचा पाऊस अवघ्या 24 तासांत कसा झाला?

Dubai Rain: दुबई हे नाव जरी काढलं तरी आपल्या डोक्यात मोठमोठ्या ईमारती, महागड्या गाड्या, श्रीमंत व्यक्ती असं काहीसं चित्र समोर उभं राहतं. मात्र सध्या दुबईचं नाव चर्चेत आहे ते म्हणजे पावसाने घातलेल्या हाहाकारमुळे. अवघ्या काही तासांच्या पावसाने श्रीमंतांची ही दुबई वाहून गेली, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या दुबईत आकाशातून एवढ्या पाण्याचा वर्षाव झाला की या शहराला जणू महासागरच रूप आलेलं दिसून आलं.

दुबईमध्ये झालेल्या पावसामुळे अनेक शहरांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. एरपोर्ट पाण्याखाली गेली. मेट्रो स्टेशन, मॉल, रस्ते या सर्व ठिकाणी केवळ पाणीच पाणी आहे. यामुळे शाळाही बंद कराव्या लागल्या. गेल्या 24 तासांत दुबईत वर्षभरात जितका पाऊस पडतो तितका पाऊस पडला आहे. मुसळधार पावसानंतर दुबईत पूर आला असून ही एक मोठी नैसर्गिक आपत्ती आहे. 

एका वर्षाचा पाऊस केवळ 24 तासांत?

UAE मध्ये 15 एप्रिलच्या रोजी रात्रीपासून पावसाला सुरुवात झाल्याची माहिती आहे. याठिकाणी 160 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. याचाच अर्थ एक वर्षाचा पाऊस अवघ्या 24 तासांत झाला. केवळ पावसाचं पाणीच नाही तर वादळी वाऱ्यासह पावसाने नवं संकट उभे केले आहे. अनेक शहरात पुरासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. तर उंच इमारतींमधील रस्त्यांवर शेकडो वाहने अडकलेली पहायला मिळाली. कधीकाळी दुबईच्या रस्त्यावर धावणाऱ्या महागड्या गाड्यांऐवजी अचानक बोटी दिसून लागल्या होत्या. 

हेही वाचा :  701 किमीची लांबी, 24 जिल्ह्यांना लाभ आणि...; पंतप्रधानांच्या हस्ते होणार 55 हजार कोटींच्या समृद्धी महामार्गाचे उद्धाटन

दुबईच्या नागरिकांसाठी गेले 24 तास एक वाईट स्वप्नाप्रमाणे आहे. याचं कारण म्हणजे इथे कधीच इतका पाऊस पडत नाही. मात्र अशातच प्रश्न असा समोर येतो की, पाऊस नसताना ही आपत्ती दुबईत कशी आली?

कृत्रिम पावसाने उडवली दाणादाण

UAE मध्ये वर्षभर तापमानाची नोंद घेतली तर याठिकाणी उष्णता असते. यावेळी कमाल तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत असतं. याशिवाय तिथे पाण्याची कमतरता आहे. यामुळे सरकार दरवर्षी क्लाउड सीडिंग म्हणजेच कृत्रिम पावसाची मदत घेतात. यंदाच्या वेळी दुबईतील आपत्तीचे कारण या कृत्रिम पाऊस असल्याचं म्हटलं जातंय. 

दुबई प्रशासनाने सोमवारी आणि मंगळवारी क्लाउड सीडिंगसाठी विमाने उडवली होती. या विमानांनी दोन दिवसांत एकूण सात वेळा उड्डाण केलं. UAE मध्ये रेन एन्हांसमेंट प्रोग्राम चालतो. शास्त्रज्ञ प्रत्येक वेळी यूएईच्या वातावरणाची भौतिक आणि रासायनिक चाचणी घेतात. ज्यामध्ये Aerosol आणि प्रदूषणकारी घटकांची विशेषत: चाचणी केली जाते. यानंतर ढग तयार होण्याची प्रक्रिया सुरू होते.

यानंतर क्लाऊड सीडिंग किती वेळा करायचं याबाबत माहिती घेण्यात येते. यावेळी विमानं एका विशिष्ट उंचीपर्यंत गेल्यानंतर chemicals सोडण्यात येतात जेणेकरून पाऊस पडेल. संयुक्त अरब अमिराती दरवर्षी क्लाउड सीडिंगसाठी याच प्रक्रियेचा अवलंब केला जातो. मात्र यावेळी शास्त्रज्ञांना या प्रक्रियेत अनियमितता असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. क्लाउड सीडिंगमध्ये वापरल्या जाणाऱ्या रसायनांवरही प्रश्न उपस्थित केले जात असल्याची माहिती आहे.

हेही वाचा :  अभिनेत्री मयुरी देशमुखचा 'लग्नकल्लोळ'; मोशन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला

कृत्रिम पाऊस कसा पाडला जातो?

कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी शास्त्रज्ञ सिल्व्हर आयोडाइड, कोरडा बर्फ आणि मीठ आकाशातील ठराविक उंचीवर जाऊन ढगांमध्ये सोडण्यात येतं. कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी आकाशात किमान 40 टक्के ढग असणे आवश्यक आहे. ज्यावेळी ढगांमध्ये पाण्याचे प्रमाण किंवा आर्द्रतेचा अभाव असतो तेव्हा cloud seeding योग्य पद्धतीने होऊ शकत नाही.Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

रवींद्र वायकर यांच्या खासदारकीच्या वादात मोठा ट्विस्ट! उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील निकालाविरोधात हायकोर्टात याचिका

Ravindra Waikar : उत्तर पश्चिम मुंबईचे खासदार रवींद्र वायकर यांच्या विरोधात, मुंबई उच्च न्यायालयात याचिका …

कल्याण लोकसभेची निवडणूक पुन्हा घेण्याची मागणी; रस्त्यावर सापडले शेकडो मतदार ओळखपत्र

Kalyan Lok Sabha : ठाकरे गटाने कल्याण लोकसभेमधील संपूर्ण निवडणूक ही संशयास्पद असून पुन्हा एकदा …