100,000,000,000 ! व्हिएतनाममध्ये सर्वात मोठा आर्थिक घोटाळा, महिला उद्योजकाला फाशीची शिक्षा, रस्त्यावरुन थेट अरबरपती

व्हिएतनाममधील महिला अब्जाधीशाला कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. रिअल इस्टेट क्षेत्रातील दिग्गज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या Truong My Lan यांना अब्ज डॉलर्सची फसवणूक केल्याप्रकरणी ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. हा देशातील आतापर्यंत सर्वात मोठा आर्थिक घोटाळा असल्याचं बोललं जात आहे. या घोटाळ्याचा फटका तब्बल 42 हजार लोकांना बसला आहे. यानंतर ही महिला नेमकी कोण आहे आणि तिने रिअल इस्टेट क्षेत्रात इतकं मोठं साम्राज्य कसं उभं केलं? याची चर्चा रंगली आहे. 

11 वर्षं करत होती फसवणूक

व्हिएतनामच्या ची मिन्ह सिटीत 67 वर्षीय रिअल इस्टेट टायकून ट्रांग माई लेन यांना 11 वर्ष सलग देशातील सर्वात मोठ्या बँकांची फसवणूक केल्याच्या एका प्रकरणात गुरुवारी कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली. हा देशाच्या इतिहासातील दुर्मिळ निर्णयांपैकी आहे. व्हिएतनाममध्ये फाशी देणं ही सामान्य बाब आहे. मात्र एखाद्या आर्थिक घोटाळ्यात इतक्या मोठ्या व्यक्तीला अशा प्रकारची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 

तब्बल एक दशकापासून हा घोटाळा सुरु होता. Forbes च्या रिपोर्टनुसार, ट्रांग माई लेन व्हिएतनाममधील एक मोठी आणि प्रसिद्ध उद्योगपती आहे. वान थिन्ह फॅटच्या त्या अध्यक्ष आहेत. त्यांची कंपनी आलिशान अपार्टमेंट, हॉटेल, कार्यालयं आणि शॉपिंग मॉल उभारतं. ऑक्टोबर 2022 मध्ये महिला उद्योजकाला एससीबी बँकेतील आर्थिक घोटाळा प्रकरणी अटक करण्यात आली. यानंतर त्यांच्यावर 12.5 अब्ज डॉलर्सचा खटला दाखल करण्यात आला. तथापि, या घोटाळ्यातून बँकेचे 27 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाल्याचा दावा सरकारी वकील करत आहेत. 

हेही वाचा :  Ajit Pawar Net Worth : संपत्तीच्या बाबतीत अजित पवारच 'दादा', शरद पवार यांची नेट वर्थ किती?

ट्रांग माई लेन यांना सायगॉन कमर्शिअल बँकेतून (SCB) 44 अरब डॉलर्सचं कर्ज घेतल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आलं होतं. कोर्टाने निर्णय सुनावताना त्यांनी 27 अब्ज डॉलर्स परत करण्याचा आदेश दिला होता. पण सरकारी वकिलांच्या मते हे पैसे कधीच वसूल केले जाऊ शकत नाहीत. पाच आठवडे चाललेल्या सुनावणीत करण्यात आलेल्या युक्तिवादांवरुन हा निष्कर्ष काढण्यात आला की, लेनने 2011 ते 2022 यादरम्यान एसीबीबी बँकेला अनधिकृतपणे नियंत्रित केलं. त्याचा वापर त्यांनी खोट्या कंपन्याच्या नावे पैशांची अफरातफर करण्यात केला. 

अत्यंत चालाखीने हा घोटाळा करताना, अधिकाऱ्यांना पैसे देऊन तो लपवण्यात आला. सरकारी वकिलांनी कोर्टाला सांगितलं की, लेन आणि तिच्या सहकाऱ्यांनी बनावट कंपन्यांना अनधिकृतपणे अब्जावधी डॉलर्सची 2500 कर्जं मंजूर केली. ज्यामुळे बँकेचं 27 अब्ज डॉलर्सचं नुकसान झालं. 

दरम्यान या घोटाळ्यात फक्त लेनच नाही तर अन्य 85 जणांना भ्रष्टाचार आणि सत्तेचा दुरुपयोग तसंच बँकेसंबंधी कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी शिक्षा होऊ शकते. तब्बल 42 हजार जण या घोटाळ्याचे पीडित आहेत. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान 2700 जणांची साक्ष नोंदवण्यात आली. यामध्ये 10 राज्य सरकारी आणि 200 वकील सहभागी होते. इतकंच नाही तर सादर केलेले पुरावे 6 टन वजनाच्या 104 बॉक्समध्ये होते. कोर्टाने ट्रांग माई लेनला लाचखोरी, फसवणूक, आणि बँकिंग नियमांचं उल्लंघन प्रकरणात दोषी ठरवत शिक्षा सुनावली. 

हेही वाचा :  पिंपरीः खेळत्या मुलाला ऊसाचा रस देऊन बोलावलं, नंतर मृतदेहच सापडला! बॉडी पाहून पोलिसही हादरले

रस्त्यावरुन सुरु केला होता संघर्ष

ट्रांग माई लेन हो ची मिन्ह सिटी (पूर्वीचे सायगॉन) मधील चीन-व्हिएतनामी कुटुंबातील आहे. त्यांचा जन्म 1956 मध्ये झाला. प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेल्या लेनचं आयुष्य फारच संघर्षमय होतं. स्थानिक मीडिया टिएन फोंगच्या रिपोर्टनुसार, तिने बाजारात स्टॉल लावून आणि आईसोबत सौंदर्य उत्पादने विकून कमाई सुरू केली. परंतु 1986 मध्ये, जेव्हा कम्युनिस्ट पक्षाने डोई मोई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आर्थिक सुधारणांचा कालावधी सुरू केला तेव्हा लेनने जमीन आणि इतर मालमत्ता खरेदी आणि विक्री सुरू करण्याच्या संधीचा फायदा घेतला.

1990 पर्यंत त्यांनी हॉटेल-रेस्तराँचं एक मोठं साम्राज्य उभारलं होतं. 1992 मध्ये तिने कुटुंबासह वान थिन फिट नावाची कंपनी सुरु केली. काही वर्षात ही कंपनी देशाच्या महत्त्वाच्या कंपन्यांपैकी एक झाली. 1992 मध्येच तिने हाँगकाँगमधील दिग्गज गुंतवणूकदार एरिक चू नपशी लग्न केलं. त्यांना दोन मुली आहेत. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘मोदींची कौटुंबिक पार्श्वभूमी…’; ‘पवारांना कुटुंब संभाळता आलं नाही’वर पवार स्पष्टच बोलले

Sharad Pawar On PM Modi Comment About His Family: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादीचे संस्थाप शरद पवारांवर …

Weather Forecast: मुंबईसह कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा; ‘या’ भागात पडणार पाऊस

Maharashtra Weather Forecast Today : एप्रिल महिन्यापासून राज्यातील नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागतोय. मुंबईतही …