बाबा वेंगांची काय होती पुतिन आणि रशियाविषयी भविष्यवाणी, ती खरी ठरतेय का?

मुंबई : रशिया-युक्रेनमधील घडामोडींवर सगळ्या जगाचं लक्ष आहे. त्यांची सध्याची परिस्थीती सगळ्यांनाच माहित आहे. अशा स्थितीत एक भविष्यवाणी समोर आलीये. जी आता खरी होताना पाहायला मिळत आहे. बल्गेरियाचे प्रसिद्ध वेंगा बाबा यांनी रशियाशी संबंधीत भविष्यवाणी केली होती. त्यामुळे सध्याची परिस्थीती पाहाता ही भविष्यवाणी खरी ठरताना दिसतेय. वेंगा बाबा यांनी आपल्या भविष्यवाणीत सांगितले की, ‘पुतीन हे सगळ्या जगाचे सम्राट होतील’.

युक्रेनमध्ये आपलं सैन्य पाठवून रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी आपले इरादे स्पष्ट केलेत. अमेरिका आणि युरोपच्या दबावापुढे न झुकता त्यांनी युक्रेनची शहरं बेचिराख करायला सुरूवात केलीये. मात्र एका भविष्यवाणीवर विश्वास ठेवला, तर ही नव्या युगाची सुरूवात ठरू शकते. ही भविष्यवाणी आहे बाबा वेंगा यांची, त्यांनी नक्की असं काय भविष्य वर्तवून ठेवलंय, ते जाणून घ्या.

ते म्हणाले, ‘रशिया भविष्यात जगाचा बादशाह होईल. युरोप बेचिराख होणार आणि कायमचं ओसाड होणार. जसा की बर्फ वितळतो, तसंच सगळं काही वितळून जाईल. पण फक्त एका वस्तुला कुणीबी स्पर्शही करू शकणार नाही.  ती म्हणजे व्लादिमीरची शान… रशियाची शान… रशियाला कुणीही अडवू शकणार नाही.’

हेही वाचा :  'छातीत दुखायला लागलं तरी येईना'; सरकार रडीचा डाव खेळत असल्याचा जरांगेंचा आरोप

वेंगेलिया पांडेवा गुश्तेरोवा हे बल्गेरियातील नेत्रहीन साधू वेंगा बाबा नावानं प्रसिद्ध आहेत. 1996 साली मृत्यू होण्यापूर्वी त्यांनी अनेक भविष्यवाणी करून ठेवल्यात. एका वादळात त्यांचे डोळे गेले मात्र त्यांना भविष्य बघण्याची दिव्यदृष्टी प्राप्त झाली, असं मानलं जातं.

बाबा वेंगांची ही भाकितं लिखित स्वरुपात नाहीत. आपल्या शिष्यांना त्यांनी हे सगळं भविष्य ऐकवलंय. त्यांचे काही भाकित खरे ठरले, तर काही चुकीचे निघालेत. आता व्लादिमीर आणि रशियाबाबत त्यांनी वर्तवलेलं भविष्य किती खरं ठरतं, हे येत्या काही वर्षांत समजेलच.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

राणेंनी मंत्रीमंडळात काय दिवे लावले? राऊतांचा सवाल; राज ठाकरेंना म्हणाले, ‘वकिली करणाऱ्यांनी..’

Sanjay Raut Slams Narayan Rane Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी नारायण राणेंसाठी …

‘राज ठाकरेंचे देव बदलू शकतात, ते नकली अंधभक्त! त्यांनी वेळ काढून..’; राऊतांचा टोला

Sanjay Raut On Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्मा सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे नकली अंधभक्त आहेत, असा टोला …