कांजीवरम साडीत दिसायचं असेल रॉयल तर वाचा या सोप्या टिप्स

डिसेंबर ते फेब्रुवारी हा साधारण लग्नाचा हंगामच असतो. लग्नाच्या सीझनमध्ये महिलांना नटूनथटून जायला प्रचंड आवडते आणि त्यातही साडी असेल तर मग अधिकच उत्साह येतो. पारंपरिकता आणि आधुनिकता जपत साडी नेसली जाते. मात्र कांजीवरम साड्यांना आजही इतर पर्याय नाही. लग्नसमारंभात अधिक आकर्षक आणि वेगळे दिसायचे असेल तर पारंपरिक कांजीवरम साडी हा उत्तम पर्याय आहे. कांजीवरम साडी एव्हरग्रीन आहे आणि कोणत्याही कार्यक्रमात रॉयल लुक देण्यासाठी हमखास याची मदत मिळते. मात्र कांजीवरम साड्यांचे नक्की कोणते डिझाईन तुम्हाला अधिक चांगले दिसेल याबाबत महत्त्वाच्या टिप्स.

फुल वर्क कांजीवरम साडी

कांजीवरम सिल्क साडीचे कोणतेही डिझाईन आकर्षक असते असा सर्वसाधारण समज आहे. मात्र त्यातदेखील फुल वर्क कांजीवरम साडी असेल तर अधिक आकर्षक दिसते. विशेषतः प्लस साईज बॉडी टाईप असणाऱ्या महिलांसाठी ही साडी परफेक्ट पर्याय आहे. यामध्ये गडद रंगाची निवड करावी आणि लग्नाच्या कार्यक्रमात ही साडी नेसून जावी. साधारणतः ४००० रूपयांपासून फुल वर्क कांजीवरम साडीचे डिझाईन मिळते.

MT Fashion Tip: तुम्ही प्लस साईज असाल तर पूर्ण हाताचा अर्थात फुल स्लीव्ह्ज कॉटन ब्लाऊज शिवा. तसंच फुल वर्क कांजीवरम साडीच्या डिझाईन्ससह स्लीक हेअर स्टाईल निवडा आणि मिनिमल मेकअप करा. यामुळे अधिक आकर्षक दिसाल.

हेही वाचा :  बॉलिवूडच्या या अभिनेत्रींनी केला कॅन्सरचा सामना, केस गेल्याने खच्चून न जाता धीराने केलं Comeback

(वाचा – Bigg Boss Marathi 4: तेजस्विनी लोणारीचा जलवा, फॅशन सेन्सने केले चाहत्यांना घायाळ! खेळ आणि सौंदर्याने जिंकले मन)

ब्रॉड बॉर्डर कांजीवरम साडी

कोणत्याही शरीरयष्टीसाठी ब्रॉड बॉर्डर कांजीवरम साडी ही उत्तम पर्याय आहे. तसंच तुमची उंची कमी असो वा जास्त असो या डिझाईन्सच्या साडीत तुम्ही छानच दिसणार. तसंच वेगळी फॅशन करायची असेल तर या कांजीवरम साडीमध्ये तुम्ही केप स्टाईल करू शकता. मात्र केप स्टाईल करताना सर्वात आधी साडीचा पदर नीट काढून प्लेट्स व्यवस्थित काढून घ्या. कांजीवरम साड्यांच्या पदराच्या निऱ्या अत्यंत सुंदर दिसतात हे नेहमी लक्षात ठेवा.

MT Fashion Tip: ब्रॉड बॉर्डर कांजीवरम साडीसह तुम्ही मोठे आणि जड कानातले घाला. गळ्यात काहीही घालू नका. तसंच हेअर स्टाईल करून यामध्ये गजरा अथवा गुलाबाची फुलं माळा. हा लुक तुम्हाला इतरांपेक्षा अधिक सुंदर बनवतो आणि समारंभाचे मुख्य आकर्षणही तुम्हीच दिसता.

(वाचा – इन आंखों की मस्ती के.. केसात गजरा मांग टिका लावून 68 व्या वर्षांच्या रेखाचा रॉयल अंदाज, मलायका नोरा सर्वजणी फेल)

प्लेन कांजीवरम साडी

तुम्हाला अधिक भपका आवडत नसेल मात्र रॉयल लुक हवा असेल तर तुम्ही प्लेन कांजीवरम साडीची निवड करावी. कांजीवरम साड्यांची किंमत जरी इतर साड्यांपेक्षा जास्त असली तरीही याचा लुक रॉयल असून तुम्ही इतरांपेक्षा नक्कीच वेगळे दिसता. अगदी प्लेन साडीतही तुम्ही आकर्षकच दिसता.

हेही वाचा :  उन्हाळा जवळ येताच मलायकाने काढले इतके हॉट आणि शॉर्ट कपडे, तिच्या बोल्डनेससमोर सुर्याचं तापमानही पडलं फिकं..!

MT Fashion Tip: प्लेन कांजीवरम साडी तुम्ही निवडली असेल तर यावर भरजरी ब्लाऊजची निवड करा. स्टायलिश लुक देण्यासाठी तुम्ही कंबरपट्ट्याऐवजी बेल्टचा वापर करू शकता. गोल्डन बॉर्डर असल्यास, गोल्डन बेल्टचा वापर केल्यास स्टायलिश दिसण्यास मदत मिळते. तसंच प्लेन कांजीवरम साडीवर तुम्ही ग्लॉसी मेकअप ट्राय करा. जो तुम्हाला इतरांपेक्षा वेगळे दिसण्यासाठी फायदेशीर ठरतो.

(फोटो क्रेडिटः Instagram)

(वाचा – लग्नाच्या सीझनमध्ये वेगळं दिसण्यासाठी वापरा ट्रेंडिंग पेस्टल कलर, अशी करा स्टाईल)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Maharastra Politics : मुख्यमंत्र्यांचा मुक्काम, विरोधकांना फुटणार घाम? 15 जागांवर कोण ठरणार सामनावीर?

Maharastra Loksabha Election 2024 : महायुतीच्या जागावाटपात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) लोकसभेच्या तब्बल 15 …

जगातील 50 श्रीमंत शहरांच्या यादीत भारतातील दोन प्रमुख शहरं; Washington DC लाही टाकलं मागे

Worlds 50 Wealthiest Cities: जगातील सर्वात श्रीमंत 50 शहरांची यादी जाहीर करण्यात आली आहे. सर्वाधिक …