Breaking News

‘मी त्यांची जागा हिसकावून…’ नितीश कुमार यांच्यावर ‘त्या’ अभद्र वक्तव्यावरून अमेरिकन गायिकेचे ताशेरे

Nitish Kumar Statment : बिहार (Bihar) विधानसभेत एका वक्तव्यामुळं मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी अनेकांचाच रोष ओढावला. ज्यानंतर अनेक वर्गांतून त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीसुद्धा नितीश कुमार यांना खडे बोल सुनावले. ज्यानंतर आता परदेशातूनही यावर प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. 

नुकतंच अमेरिकन गायिका आणि अभिनेत्री मेरी मिलबेननंही नितीश कुमार यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निशाणा साधत आपली भूमिका स्पष्ट केली. लोकसंख्या नियंत्रणाच्या बाबतीत बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी केलेलं वक्तव्य पाहता, महिलांसाठी त्यांना केलेलं वक्तव्य अपमाननास्पद असल्याचं ती म्हणाली. शिवाय बिहारच्या मुख्यमंत्रीपदासाठी आता एका योग्य व्यक्तीचीच गरज असल्याचंही ती म्हणाली. 

 

X वर पोस्ट लिहित तिनं लिहिलं, ‘तीश कुमार यांचं वक्तव्य पाहता मला असं वाटतं की महिलांनी धाडसानं पुढे येत आता बिहारच्या मुख्यमंत्रीपदावर आपली उमेदवारी घोषित करावी. मी जर भारतीय नागरिक असते तर मी थेट बिहारमध्येच गेले असते आणि बिहारच्या मुख्यमंत्रीपदासाठी निवडणूक लढले असते’. नितीश कुमार यांच्याकडे असणारं मुख्यमंत्रीपद हिसकावण्याचंच आव्हान या गायिकेनं दिलं आणि अनेकांच्या नजरा वळवल्या असं म्हणणं गैर ठरणार नाही. 

पंतप्रधान मोदींचं कौतुक

नितीश कुमार यांच्यावर ताशेरे ओढत असतानाच मिलबेननं पंतप्रधान मोदी यांची महिलांप्रती असणारी भूमिका, महिलांना असणारा त्यांचा पाठिंबा पाहता त्यांचं कौतुक केलं. देशातील नागरिकांच्या प्रतीच्या दृष्टीनं पंतप्रधान मोदी एक उत्तम नेता म्हणून जगापुढं आल्याच्या वक्तव्यावर तिनं जोर दिला. बिहारच्या महिलांना सशक्त करण्यासाठीसुद्धा त्यांनी अनेक पावलं उचलली असून, तिथं मोदींसारखाच नेता होणं गरजेचं आहे असंही ती म्हणाली. 

हेही वाचा :  Cidco Lottery 2023 : सिडकोकडून नवी मुंबईत मध्यमवर्गीयांसाठी आता घरे

नितीश कुमार असं काय म्हणाले, ज्यामुळं माजलं वादंग? 

लोकसंख्या नियंत्रणाबाबत वक्तव्य करत असताना महिलांमध्ये शिक्षणाचा प्रसार करण्याची गरज असल्याचं वक्तव्य त्यांनी बिहार विधानसभेत केलं. यावेळी एक शिक्षित महिलाच पतीला शरीसंबंध ठेवताना रोखू शकते असं म्हणत त्यांनी वापरलेली भाषा रोष ओढावण्यास कारणीभूत ठरली. 

दरम्यान, वरील वक्तव्यानंतर झालेला वाद आणि पंतप्रधानांसह अनेकांनीच ओढलेले जाशेरे पाहता नितीश कुमार यांनी जाहीर माफीही मागितली. करण्यात आलेल्या वक्यव्यामुळं कोणाच्याही भावना दुखावल्या गेल्यास त्यासाठी मी माफी मागतो अशी नरमाईची भूमिका त्यांनी घेतल्याचं पाहायला मिळालं. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘…तर हेतू साध्य होणार नाही,’ सुप्रीम कोर्टाचा अल्पवयीन मुलाला जामीन देण्यास नकार; पुणे अपघाताच्या पार्श्वभूमीवर निर्णय चर्चेत

पुण्यात बेदरकारपणे कार चालवत दोघांच्या मृत्यूला कारणीभूत ठरणाऱ्या अल्पवयीन चालकाला कोर्टाने जामीन दिल्यानंतर नाराजी व्यक्त …

प्रवाशांनो लक्ष द्या! मुंबई-पुणे दरम्यान 28 मे ते 2 जूनपर्यंत अनेक ट्रेन रद्द होणार, वाचा संपूर्ण लिस्ट

Mumbai-Pune Train cancelled List: मुंबई-पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. 28 …