आयव्हरी, पांढऱ्या साडीची ट्रेंडिंग फॅशन, असे दिसा अधिक स्टायलिश!

व्हाईट रंगामध्येही शेड्स असतात हे तुम्हाला माहीत आहे का? हे वाचून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटलं असेल. ऑफव्हाईट, चॉकव्हाईट अथवा आयव्हरी असा कोणताही रंग सध्या अधिक ट्रेंडमध्ये दिसून येतोय. खरं तर हे रंग वेस्टर्न कपड्यांपेक्षा साडी आणि इंडियन वेअरमध्ये अधिक दिसून येतात. काही वर्षांपूर्वी सफेद अथवा व्हाईट रंग घालणे चांगले मानले जात नसे. पण आता ही गोष्ट फारच जुनी झाली आहे आणि फॅशन स्वरूपात आणि फॅशन जगतात आता व्हाईट रंग अधिक चांगल्या पद्धतीने स्वीकारला जात आहे. हा हॉट ट्रेंड तुम्हालाही ट्राय करायचा असेल तर तुम्ही ही स्टाईल कॅरी करण्यासाठी कोणत्या टिप्स वापरायला हव्यात हे जाणून घ्या आणि दिसा अधिक आकर्षक!

मोनोटोन मॅजिक

व्हाईट अथवा आयवरी साडीची स्टाईल करण्यासाठी सर्वात सोपी, बेसिक आणि फुलप्रूफ पद्धत म्हणजे मोनोटोन अर्थात पूर्ण लुक एकाच रंगात करणे. डोक्यापासून पायापर्यंत एकसमान रंग ठेवणे. पांढऱ्या अथवा ऑफव्हाईट रंगाची साडी जर तुम्ही स्टाईल करणार असाल आणि ही साडी एम्ब्रॉईडेड असेल तर तुम्ही त्यासह एक व्हाईट थ्री क्वार्टर स्लीव्ह्ज ब्लाऊज घालावा. तसंच यावर दागिने अगदी भरभरून न घालता केवळ चांदीचे कानातले घालावेत. जेणेकरून साडीवर लक्ष हटणार नाही आणि तुमचा लुक अधिक उठावदार दिसून येईल. अशी साडी असेल तर गळ्यात भरजरी दागिने घालू नका आणि मोठे कानातले घाला.

हेही वाचा :  या साड्यांची निवड कराल तर दिसाल अधिक तरूण आणि आकर्षक, फॉलो करा स्टाईल

(वाचा – व्हाईट जॅकेट डीपनेक ग्लॉसी ड्रेसमध्ये मलायकाचा हॉट अंदाज, फोटो पाहून चाहत्यांना थंडीत फुटला घाम)

सिक्वेन व्हाईट साडीसह लुक

ऑल व्हाईट आयव्हरी लुक थोडा कंटाळवाटा दिसू शकतो असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही सिक्वेन साडीची निवड करा. होलग्राफिक सिक्विन वर्कच्या साडीमुळे एक वेगळा आणि इंटरेस्टिंग लुक निर्माण होतो. तुम्हाला जर यासह मिसमॅच करायचे असेल तर तीदेखील तुमची आवड आहे. मात्र याचाही लुक तुम्ही मोनोटोन ठेवलात तर अधिक सुंदर दिसेल. सिक्विन साडी असेल तर तुम्हाला अधिक ग्लॅमरस आणि लक्षवेधी लुक मिळतो आणि सर्वांच्या नजरा तुमच्यावर खिळून राहतात.

(वाचा – गोल्डन डीपनेक ड्रेस घालून देसी गर्लचा जलवा, इंटरनॅशनल इव्हेंटमध्ये भारताचा डंका)

स्टेटमेंट ब्लाऊज

साडी अगदी साधी असेल तर त्यासाठी तुम्ही स्टेटमेंट ब्लाऊजचा वापर करू शकता. स्टेटमेंट म्हणजे अशा सफेद साडीसह तुम्ही मल्टीकलर ब्लाऊज अथवा गडद रंगाचा भरजरी ब्लाऊज वापरलात तर अधिक सुंदर दिसेल. तुम्हीदेखील जर प्लेन व्हाईट वापरणार असाल तर तुमचा ब्लाऊज हा अप्रतिम असायला हवा. या साडीसह तुम्ही कमीत कमी प्लॅटिनम दागिन्यांचा वापर करावा. हातात ब्रेसलेट, मोठे कानातले अथवा कानातले नसल्यास नाजूक डिझाईनचा नेकलेस तुम्ही वापरल्यास, हा लुक अधिक उठावदार आणि आकर्षक दिसतो.

हेही वाचा :  '....हे राजकारण भाजपाला परवडणारं नाही', राज ठाकरेंनी दिला इशारा

(वाचा – शिमरी साडीत प्रार्थना बेहरेचा हॉट अंदाज, या वेडिंग सिझनला हे ५ लूक ट्राय करुन पाहा,कोणाची नजर तुमच्यावरुन हटणार नाही)

कलर पॉप

ऑल व्हाईट लुक बरेचदा कंटाळवाणा वाटू शकतो. त्यामुळे हा लुक अधिक उत्तम आणि आकर्षक करण्यासाठी तुम्ही थोडा कलर पॉप करण्याची गरज आहे. पण बरेचदा पांढऱ्या रंगासह नक्की कोणता रंग वापरावा हे अनेकांना कळत नाही. तर चुकीचा रंग निवडल्यास, लुकही खराब होतो आणि पांढऱ्या साडीवरून नजर हटू शकते. त्यामुळे कोणतीही जोखीम न घेता मोनोटनी लुक ब्रेक करून गडद लिपस्टिकचा वापर करू शकता. ही लिपस्टिक तुम्हाला वेगळाच लुक मिळवून देते.

(वाचा – ट्रान्सपरंट गाऊनमध्ये हिऱ्यांत नखशिखांत सजली नोरा फतेही,अतरंगी अवतार पाहून चाहते म्हणतात हा ड्रेस आहे की पडदा?)

क्लासी लुक

साडीबरोबर सहसा ब्लाऊज हा खिशाला परवडतो पण वेगळा स्टेटमेंट ब्लाऊज असेल तर मात्र अगदी आपल्या जीवावर येतं कारण बजेट नसतं. पण तुमच्या खिशाला असा ब्लाऊज परवडणार असेल तर क्लासी लुक तुम्ही नक्कीच करू शकता. साडीसह मिसमॅच ब्लाऊज अधिक सुंदर दिसतो. त्यातही कॉटनची पांढरी साडी असेल तर तुम्ही कोणत्याही स्टाईलचा ब्लाऊज घातला तर तो अधिक स्टायलिश दिसतो. यासह तुम्ही साडी आणि ब्लाऊजप्रमाणे दागिने घाला आणि आपला लुक पूर्ण करा.

हेही वाचा :  Sharad Pawar : ... तर शरद पवार पंतप्रधान होतील; गोपीचंद पडळकर यांची टीका

तुम्हीही कोणत्या लग्नात अथवा समारंभाला जाण्यासाठी पांढऱ्या, आयव्हरी अथवा ऑफ-व्हाईट रंगाची निवड करत असाल तर या टिप्स नक्की लक्षात ठेवा.

(फोटो क्रेडिटः Instagram)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Maharashtra Weather: राज्यातील ‘या’ भागांमध्ये पावसाचा इशारा; पाहा मुंबईत कसं असेल हवामान?

Maharashtra Weather : सध्या देशभरात नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागतोय. याशिवाय राज्यात उन्हाचा चटका …

पंकजा मुंडे बीडमध्ये भाजपचा बालेकिल्ला राखणार का? जनतेचा कौल कोणाला?

Beed Loksabha Constituency Special Report : राज्यात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील दोन …