इराण की इस्रायल? अधिक शक्तीशाली कोण? कोणाकडे किती अणूबॉम्ब, तोफा? 2,84,742 कोटी कनेक्शन

Israel Vs Iran War Military: इराणने इस्रायलवर 14 एप्रिल रोजी केलेल्या हल्ल्याला इराणने आज म्हणजेच 19 एप्रिल रोजी जशास तसं उत्तर दिलं आहे. पहाटेच्या सुमारस इराणने अण्विक केंद्र असलेल्या इस्फहान शहरावर हल्ला करण्यात आला. येथील एअरपोर्ट पहाटेच्या सुमारास अचानक बॉम्बस्फोटांनी हादरलं. या विमातळावरील सर्व उड्डाणे दुसरीकडे वळवण्यात आली आहे. तसेच या हल्ल्यानंतर इराणने इस्रायला तसेच इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना इशारा दिला आहे. याचे परिणाम भोगावे लागतील असं इराणने इशारा देताना म्हटलंय. मात्र या दोन्ही देशांमध्ये वाद कशामुळे झाला? या दोन्ही देशांच्या लष्करी सामर्थ्याची तुलना केली तर कोण कोणावर सरस आहे? दोन्ही देशांचं संरक्षण बजेट किती आहे? दोन्ही देशांतील सैन्याची संख्या किती आहे? हवाई, लष्करी आणि नौदल सामर्थ किती आहे हे जाणून घेऊयात…

नेमका वाद कशामुळे सुरु झाला?

सीरियामधील इराणच्या दूतावासावर इस्रायलने 1 एप्रिल रोजी एअर स्ट्राईक केला. या हल्ल्यामध्ये इराणी लष्करामधील 2 वरिष्ठ कमांडर्ससहीत 13 जणांनी प्राण गमावले. इराण इस्रायलमध्ये विद्रोह करणाऱ्या हमासच्या गटाला पाठिंबा देत असल्याचा दावा करत इस्रायलने हल्ला केल्याचं सांगण्यात आलं. इस्रायलने या हल्ल्याची जबाबदारी थेट स्वीकारली नाही. मात्र सदर हल्ल्यात मरण पावलेल्यांमध्ये इराणमधील प्रमुख लष्करी अधिकाऱ्यांपैकी एक असलेल्या ब्रिगेडियर जनरल मोहम्म रजा जहादींचा समावेश होता. अचानक झालेल्या या हल्ल्यानंतर इराण चांगलाच खवळला आणि इस्रायलला परिणामांना समोरे जाण्यासाठी तयार राहा असा इशारा दिला. इराणने इस्रायलवर 14 एप्रिल रोजी 200 हून अधिक क्षेपणास्त्रं डागली. इस्रायलच्या क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणांनी यापैकी बरीच क्षेपणास्रं निष्क्रीय केल्याचा दावा केला. मात्र इराणने हा हल्ला यशस्वी झाल्याचं म्हटलं. याच हल्ल्याचा बदला घेण्यासाठी आज म्हणजेच 19 एप्रिल रोजी हवाई हल्ला करत कावाई केल्याचं सांगितलं जात आहे. आता हे दोन्ही देश एकमेकांसमोर उभे ठाकले असून त्यांनी एकमेकांवर हल्लेही केले आहेत. पण या दोन्ही देशांचं समार्थ्य नेमकं कसं आहे पाहूयात..

हेही वाचा :  Maharashtra Politics : 'शिंदेंना पदावरून काढण्याचा अधिकार ठाकरेंना नाही', राहुल नार्वेकर असं का म्हणाले?

2 लाख 2 हजार 77 कोटी रुपयांचं सुरक्षा बजेट

‘द सन’ने दिलेल्या वृत्तानुसार, संरक्षण बजेटचा विचार केल्यास इराणपेक्षा इस्रायल बराच पुढे दिसतोय. मात्र लष्करी सैनिकांच्या संख्येचा विचार केल्यास इराणपुढे इस्रायलचा निभाव लागणार नाही असं चित्र दिसत आहे. ‘द सन’मधील आकडेवारीनुसार, इस्रायल आपल्या संरक्षणासाठी तब्बल 24.2 अब्ज अमेरिकी डॉलर्सची तरतूद केली आहे. म्हणजेच भारतीय चलनानुसार इस्रायल आपल्या संरक्षणासाठी 2 लाख 2 हजार 77 कोटी रुपये खर्च करतं तर इराणने अवघ्या 9.91 अब्ज अमेरिकी डॉलर्सची तरतूद संरक्षणासाठी केली आहे. भारतीय चलनानुसार इराणचा संरक्षणावरील खर्च 82 हजार 665 कोटी रुपये इतका आहे. दोन्ही देशांचं एकूण संरक्षण बजेट तब्बल 2 लाख 84 हजार 742 कोटी

एअरफोर्सची तुलना

दोन्ही देशांच्या एअरफोर्सची तुलना केल्यास इस्रायलकडे एकूण 612 विमानं आहेत. तर इराणकडे 551 विमानं आहेत.

नक्की वाचा >> इस्रायल-इराण युद्धामुळे गडबडणार भारतीयांचं मंथली बजेट? जाणून घ्या तुमच्यावर नेमका कसा होणार परिणाम

लष्करी तोफांची संख्या

लष्करी तोफांचा विचार केल्यास इस्रायलकडील तोफांची संख्या ही इराणपेक्षा अर्धी आहे. इस्रायलकडे 2200 तोफा आहेत तर इराणकडे तब्बल 4071 तोफा आहेत.

हेही वाचा :  कॉन्फिडंसची कमी व बोबडं बोलणं दूर करून 5 मिनिटांत सिंहासारखा करारा आवाज हवा? करा हा उपाय

दोन्ही देशांकडे युद्धनौका किती?

नौदल सामर्थ्याबद्दल बोलायचं झालं तर इराण इतेही इस्रायपेक्षा फार पुढे आहे. इस्रायलकडे 67 युद्धनौका आहेत. तर इराणकडे 101 युद्धनौका आहेत. त्याशिवाय इस्रायलकडे 43 हजार लष्करी वाहने आहेत. इराणकडील या गाड्यांची संख्या 65 हजार इतकी आहे. 

सैनिक किती?

लष्करी सैनिकांच्या आकड्याबद्दल बोलायचं झालं तर इथेही इराण इस्रायलवर भारी पडताना दिसत आहे. इस्रायलकडे एकूण 1.73 लाख लष्करी सैनिक आङेत. तर इराणकडील सक्रीय लष्करी सैनिकांची संख्या तब्बल 5.75 लाख इतकी आहे. तसेच इस्रायलकडे एकूण 4.65 लाख राखीव सैन्य आहे. इराणकडे 3.50 लाख राखीव सैन्य आहे.

कोणाकडे किती अणूबॉम्ब?

अंतरराष्ट्रीय स्तरावरील अहवालांनुसार. इस्रायलकडे सध्या एकूण 80 अणूबॉम्ब आहेत. दुसरीकडे इराणकडे अधिकृतपणे एकही अणूबॉम्ब नाही. अणूबॉम्बचा विचार केल्यास इराण आणि इस्रायलची तुलनाही होऊ शकत नाही अशी स्थिती आहे. अमेरिकी वृत्तपत्रांमधील दाव्यांनुसार इराणने मोठ्याप्रमाणात युरेनियमचा साठा जमा करुन ठेवला आहे. याचा वापर इराण अणूबॉम्ब तयार करण्यासाठी वापरत असल्याचा दावा केला जात आहे. तसेच आपल्याकडील आहेत ती शस्रही इराण यूरेनियमच्या माध्यमातून अपग्रेड करत असल्याचा दावा करण्यात आला आहे. 

हेही वाचा :  PM Modi Pune Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यातून पुणेकरांना काय मिळणार? वाचा तुमच्या फायद्याची गोष्ट!

इस्रायलची विशेष तयारी

आकाराने लहान असला तरी शक्तीशाली असलेल्या इस्रायची ताकद यापूर्वी अनेकदा वेगवेगळ्या संघर्षांमध्ये पाहायला मिळाली आहे. इस्रायलकडे आधुनिक लडाऊ विमाने, आर्यन डोमसारखी क्षेपणास्त्र रोखणारी यंत्रणा आहे. इस्रायकडे आयडीएफसारखं जगातील सर्वात शक्तीशाली लष्कर आहे. सायबर युद्धासाठीही इस्रायलने आपली तयारी पूर्णपणे केलेली आहे. तांत्रिकदृष्ट्या इस्रायल अधिक पुढारलेला आहे.

इराणनेही क्षमता वाढवली

दुसरीकडे इराणकडे लष्करी सैनिक आणि लष्करी समुग्री मोठ्याप्रमाणात आहे. इराण त्यांच्याकडील बॅलेस्टीक मिसाईल्सवर फार मोठ्याप्रमाणात अवलंबून आहे. संपूर्ण मध्य पूर्वी आशियामध्ये इराणचा दबदबा आहे. मागील काही वर्षांमध्ये इराणने ड्रोन हल्ले आणि सायबर सुरक्षेसंदर्भात बरंच काम केलं आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Maharastra Politics : मुख्यमंत्र्यांचा मुक्काम, विरोधकांना फुटणार घाम? 15 जागांवर कोण ठरणार सामनावीर?

Maharastra Loksabha Election 2024 : महायुतीच्या जागावाटपात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) लोकसभेच्या तब्बल 15 …

जगातील 50 श्रीमंत शहरांच्या यादीत भारतातील दोन प्रमुख शहरं; Washington DC लाही टाकलं मागे

Worlds 50 Wealthiest Cities: जगातील सर्वात श्रीमंत 50 शहरांची यादी जाहीर करण्यात आली आहे. सर्वाधिक …