33 वर्षं राबलेल्या कर्मचाऱ्याला Microsoft नं वाईट पद्धतीनं कामावरून काढलं; त्याच्या ‘त्या’ कृतीनं सर्वांनाच रडवलं…

Job News : एखाद्या ठिकाणी जेव्हा कोणा व्यक्तीची नोकरी सुरु होते तेव्हा त्या व्यक्तीची संस्थेप्रती असणारी एकनिष्ठा, समर्पकता आणि कामावर असणारं प्रेम या सर्व गोष्टी कर्मचारी म्हणून नकतळत त्या व्यक्तीला घडवत असतात. अनेकांसाठी नोकरीचं ठिकाण हे एखाद्या कुटुंबाप्रमाणे असतं. तिथं चांगले मित्र मिळतात, सुखदु:खाची आणि अनुभवांची देवाणघेवाण होते आणि यातूनच चांगलं काम करण्याची प्रेरणा मिळते. ओघाओघानं नोकरीच्या ठिकाणी प्रगती, पगारवाढ, पदोन्नती अशा रुपात कामाची पोचपावतीसुद्धा मिळते. 

प्रत्यक्षात वास्तवाचा सामना मात्र तेव्हा होतो जेव्हा ज्या संस्थेप्रती एकनिष्ठा दाखवत जे कर्मचारी जीवतोड काम करतात त्याच कर्मचाऱ्यांना Layoff  च्या नावावर कंपनी बाहेरचा रस्ता दाखवते. ‘कंपनी कोणाचीच नसते’, असं बऱ्याच मंडळींचं मत… हीच ओळख प्रत्यक्ष अनुभवलीये Jeff Bogdan नावाच्या माजी मायक्रोस़ॉफ्ट कर्मचाऱ्यानं. 

जवळपास 33 वर्षे मायक्रोसॉफ्टमध्ये (Microsoft Jobs) काम करणाऱ्या जेफ यांना फेब्रुवारी महिन्यात कामावरून काढण्यात आलं. नोकरकपातीच्या प्रक्रियेअंतर्गत त्यांनी नोकरी गमावली, ज्यानंतरचे दोन आठवडे त्यांनी या संस्थेचा निरोप घेण्यासाठी आणि त्यानंतरचा वेळ कुटुंबासोबतच्या खास क्षणांसह आत्मचिंतनासाठी व्यतीत केला. 

मायक्रोसॉफ्टचा एक कमाल कर्मचारी…

जेफ यांनी नोकरीला अलविदा केल्यानंतर सोशल मीडियावर एक भलीमोठी पोस्च लिहीत भावनांना वाट मोकळी करून दिली. ‘मायक्रोसॉफ्टमधील माझी कारकिर्द एक अविश्वसनीय प्रवास होती. या कंपनीच्या विंडोज फोन, ज्यूवन आणि विंडोज 95 या प्रोडक्टबाबत मला प्रचंड अभिमान वाटतो. पण, मागच्या दोन वर्षांनी खऱ्या अर्थानं मला खूप काही दिलं जिथं मी Learning and Development साठी प्रयत्न करत ते मिळवण्यात यशस्वी ठरलो.’

हेही वाचा :  Police Recruitment: पोलीस दलात भरतीचे तृतीयपंथींचे स्वप्न भंगणार?

microsoft layoffs employee who worked for 33 years his post went viral after removal

सर्वकाही शिका इथपासूनची कंपनीची मानसिकता आता सर्वकाही शिकवा, इथपर्यंत पोहोचवण्याची वेळ आली आहे. असं म्हणणाऱ्या जेफ यांना पुढे नोकरीवरून काढण्यात आलं. एकदोन नव्हे, तब्बल 33 वर्षे मायक्रोसॉफ्टसाठी सेवा करणाऱ्या जेफ यांनी ज्या कंपनीला कुटुंबाचा दर्जा दिला होता त्याच कंपनीतून त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. बदलतं तंत्रज्ञानि, जागतिक आर्थिक मंदी या आणि अशा अनेक घटकांचा परिणाम इथं पाहायला मिळाला. पण, या कंपनीप्रती जेफ यांनी व्यक्त केलेली भावना अनेकांच्यात मनात कालवाकालव करून गेली. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Maharastra Politics : मुख्यमंत्र्यांचा मुक्काम, विरोधकांना फुटणार घाम? 15 जागांवर कोण ठरणार सामनावीर?

Maharastra Loksabha Election 2024 : महायुतीच्या जागावाटपात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) लोकसभेच्या तब्बल 15 …

जगातील 50 श्रीमंत शहरांच्या यादीत भारतातील दोन प्रमुख शहरं; Washington DC लाही टाकलं मागे

Worlds 50 Wealthiest Cities: जगातील सर्वात श्रीमंत 50 शहरांची यादी जाहीर करण्यात आली आहे. सर्वाधिक …