ताज्या

बारामतीत नणंद विरुद्ध भावजय, अजित पवारांचा सुप्रिया सुळेंवर थेट हल्लाबोल

Loksabha Election 2024 : बारामती लोकसभा मतदारसंघात (Baramati Loksabha Constituency) यंदा नणंद विरुद्ध भावजय अशी लढत पाहायला मिळणार आहे. सुप्रिया सुळेंविरोधात (Supriya Sule) सुनेत्रा पवार (Sunetra Pawar))निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. सुप्रिया सुळेंच्या विकास कामाचा रथ आधीपासूनच मतदारसंघात फिरतोय. मात्र, आता बारामती परिसरात सुनेत्रा पवार यांच्या माहिती आणि कार्याचा आढावा घेणारा प्रचार रथ फिरू लागलाय. सूनेत्रा पवार खासदारकी लढवणार असल्याची चर्चा …

Read More »

‘मनोज जरांगे यांच्या घातपाताची शक्यता, त्यांनी ज्यूस पिताना….’, प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा

Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी सध्या उपोषणावर बसलेले मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्यावर विषप्रयोग होऊ शकतो असा खळबळजनक दावा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar ) यांनी केला आहे. मनोज जरांगे यांना दिली जाणारी औषधं, सलाईन, इंजेक्शन आणि जेवण तपासून द्या असा सल्लाही त्यांनी दिला आहे. मनोज जरांगे यांच्यामुळे अनेकांचं राजकीय भवितव्य धोक्यात आल्याने त्यांच्या घातपाताची शक्यता असल्याचंही ते …

Read More »

दरमहा 55 रुपये भरा अन् महिन्याला 3000 मिळवा, शेतकऱ्यांसाठी केंद्राची महत्त्वाची योजना, कसा लाभ घ्याल?

PM Kisan Mandhan Yojana: शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकार नव्या नव्या योजना राबवत आहे. यातीलच एक योजना म्हणजे किसान मानधन योजना. या योजनेअंतर्गंत 60 वर्षांवरील शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते. वृद्धावस्थेत जेव्हा शेतकऱ्यांना शेती करणे कठिण होऊन जाते. तेव्हा आर्थिकदृष्ट्या त्यांना दुसऱ्यांवर अवलंबून राहावे लागते. या गोष्टी लक्षात ठेवून केंद्र सरकारने शेतकरी मानधन योजनेची सुरुवात केली आहे.  पंतप्रधान शेतकरी मानधन योजना …

Read More »

Paytm FASTag बंद होणार? पैसे कसे ट्रान्सफर करायचे? जाणून घ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर

Paytm FASTag Update: पेटीएम पेमेंट बँक लिमिटेडवर आरबीआयने निर्बंध लागू केले आहेत.  NHAI च्या रोड टोलिंग ऑथॉरिटी IHMCL ने वाहन चालकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी पेटीएम पेमेंट्स बँक व्यतिरिक्त 32 अधिकृत बँकांकडून FASTags खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 31 जानेवारीला पेटीएम पेमेंट बँकेला (PPBL) 29 फेब्रुवारीनंतर कोणत्याही ग्राहकाच्या खात्यात, वॉलेट किंवा फास्टॅगमध्ये पैसे जमा करुन …

Read More »

डायरेक्ट शिरच्छेदः एका हातात कोयता दुसऱ्या हातात… पत्नीची हत्या करून असा हायवेवर फिरला, पोलिसही चक्रावले

Crime News Today: पती-पत्नीतील वाद नेहमीच होत असतात. मात्र, पती-पत्नीच्या क्षुल्लक वादातून धक्कादायक घटना घडली आहे. राजधानी लखनऊ येथील बाराबंकी येथे ही हृदयद्रावक घटना घडली आहे. पतीने पत्नीची गळा चिरुन हत्या केली. इतंकच नव्हे तर पत्नीचे मुंडके तो रस्त्यावर फिरत होता. हे धक्कादायक चित्र पाहून सर्वांच्या अंगावर भितीने काटा उभा राहिला होता.  उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यातील ही घटना घडली आहे. …

Read More »

‘सरकारी कर्मचाऱ्यांच्या रिटायर्टमेंटचे वय वाढवल्यास नव्या बेरोजगारांना संधी मिळणार नाही’

Retirement age of Government Employees:  शासकीय सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करण्याचा अन्यायकार निर्णय घेऊ नये अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून आपला विरोध दर्शवला असून असा निर्णय न घेण्याचे आवाहन केले आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय वाढवल्याचा इतरांवर कसा परिणाम होईल? यामुळे भविष्यात काय अडचणी येऊ शकतात, याचा …

Read More »

म्युनिशन्स इंडिया लिमिटेडमध्ये विविध पदांची भरती, काय आहे पात्रता? जाणून घ्या.

MIL Job: चांगल्या पद आणि पगाराची नोकरी शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. पुण्यात  म्युनिशन्स इंडिया लिमिटेडमध्ये मोठी भरती सुरु असून येथे तुम्हाला नोकरीची संधी मिळणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार,अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. उमेदवारांकडून ऑफलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत.  म्युनिशन्स इंडिया …

Read More »

VIDEO: नवरदेवाला लग्नात मिळालं 1.25 किलो सोने, मर्सिडीज कार अन् 1 कोटी रुपये रोख; पाहुणे पाहतच बसले

Viral Video : देशात हुंडाप्रथा थांबवण्यासाठी सरकारने कडक कायदा केलेला असला तरी त्याचा धाक लोकांना राहिलेला दिसत नाही. अद्यापही अनेक ठिकाणी हुंडाप्रथा सर्रासपणे सुरु आहे. हुंडा प्रथा संपवण्यासाठी देशात अनेक मोहिमा राबविण्यात आल्या. मात्र आजही ही प्रथा समाजातून गेलेली नाही. अनेकजण त्याचे उघडपणे समर्थन करत असल्याचेही दिसत आहे. या प्रकाराचे व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल केले जात आहेत. याच हुंडा प्रथेशी …

Read More »

‘चार दिवस उपोषण करुन दाखवावं ‘ मनोज जरांगेंचं नारायण राणे यांना आव्हान

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या आंदोलनाचा आजचा सातवा दिवस आहे. मनोज जरांगे आपल्या आंदोलनावर ठाम असून मराठ्यांना हवं ते सरकार देत नसल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला आहे. सग्यासोयऱ्याची अंमलबजावणी करावी, सरकारने फक्त अधिसूचना (GR) काढली पण कायदा केला नाही. आता 20 तारखेपर्यंत कायदा कला असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे. सगेसोयऱ्यांच्या …

Read More »

हीच ती वेळ, मालामाल होण्याची! लोकसभा निवडणुकीआधी सातव्या वेतन आयोगासंदर्भात मोठा निर्णय

7th Pay Commission Latest News : देशातील अतिशय महत्त्वाच्या लोकसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असतानाच मोदी सरकारच्या वतीनं समाजातील प्रत्येक वर्गावर प्रभाव पाडण्याच्या हेतूनं काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात येत आहेत. त्यातलाच एक निर्णय घेत सध्या केंद्राच्या वतीनं सरकारी कर्मचाऱ्यांची मनं जिंकण्याचा प्रयत्न शासनाकडून करण्यात आला आहे. थोडक्यात केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी (Government Jobs) ही आनंदाची बातमी आहे.  केंद्र सरकारच्या अख्तयारित येणाऱ्या संस्था …

Read More »

4 कोट्यधीश, 2 अब्जाधीश; एकाची संपत्ती तर तब्बल 450 कोटी! पाहा, राज्यसभेच्या सर्व उमेदवारांची नेटवर्थ

Rajya Sabha Election: राज्यसभेच्या सहा जागांसाठी बिनविरोध निवडणूक होत आहे हे जवळपास स्पष्ट झाले आहे. एक अपक्षासह सात उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. भाजपकडून अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि डॉ. अजीत गोपछडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर, शिंदेसेनेकडून मिलिंद देवरा आणि अजित पवार गटाकडून प्रफुल्ल पटेल यांनी अर्ज दाखल केला आहे. काँग्रेसकडून माजी मंत्री चंदक्रांत हंडोरे यांनी राज्यसभेसाठी …

Read More »

बारामतीत नणंद विरुद्ध भावजय? सुप्रिया सुळेंना सुनेत्रा पवार आव्हान देण्याची शक्यता

Baramati Loksabha Election 2024: लोकसभा निवडणूक 2024 साठी आत्तापासूनच सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेत दोन गट पडल्याने आता लोकसभा निवडणूकही अटीतटीची होणार आहे. बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळेंना टक्कर देण्यासाठी अजित पवारांकडून मोठी खेळी खेळण्यात येणार आहे. बारामतीत लोकसभेमध्ये नणंद-भावजयीत लढत होण्याची चिन्हे आहेत.  बारामती मतदारसंघातून सुनेत्रा पवारही लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची चर्चा आहे. सुप्रिया सुळेंना सुनेत्रा पवार …

Read More »

मराठा आरक्षणाची धग वाढली; मनोज जरांगेंची प्रकृती खालावताच राज्याच्या ‘या’ भागांत कडकडीत बंद

Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा मुद्दा आता पेटला असून, विशेष अधिवेशनाआधी सरकारच्याही हालचालींना वेग आला आहे. शुक्रवारीच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या मराठा आरक्षणसंबंधीच्या सर्वेक्षणाचा अहवाल सादर करण्यात आला. यावेळी सरकार सध्या योग्य तो निर्णय घेत असून, आता मनोज जरांगे यांनी उपोषण करणं उचित नसल्याची बाब अधोरेखित करत हे …

Read More »

वर्क फ्रॉम होमच्या नावाखाली ISISमध्ये करायचा भरती; छत्रपती संभाजीनगरमधून आयटी इंजिनिअरला अटक

विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रीय तपास यंत्रणेने गुरुवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी कारवाई केली आहे. दहशतवादी कृत्यात काही जण सहभागी होत असल्याची माहिती मिळताच एनआयएच्या पथकाने ही कारवाई केली. मिळालेल्या माहितीवरून छत्रपती संभाजीगनर शहरात नऊ ठिकाणी एनआयएच्या पथकाने छापे मारले. या छाप्यात एनआयएच्या हाताला महत्त्वाची व्यक्ती हाती लागली आहे. त्याच्या घरातून अनेक आक्षेपार्ह इलेक्ट्रॉनिक गॅझेट, तसेच गुन्हेगारीशी संबंधित …

Read More »

Bharat Bandh Today: भारत बंदमुळं आज बँकांनाही टाळं? शाळा आणि कार्यालयांचं काय? पाहा मोठी बातमी

Bharat Bandh Today Latest News: विविध मागण्यांसाठी देशातील शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा ‘चलो दिल्ली’चा नारा दिला आणि देशाच्या राजधानीच्या दिशेनं कूच केली. यामध्ये पंजाब प्रांतातील हजारो शेतकऱ्यांचा समावेश असून त्यांच्या देशव्यापी आंदोलनाचा हा चौथा दिवस. संयुक्त किसान मोर्चाकडून याच आंदोलनाच्या धर्तीवर आज ग्रामीण भारत बंद पुकारण्यात आला आहे. सकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी 4 वाजेपर्यंत हा बंद लागू असले. या बंद दरम्यान …

Read More »

भाजप नेते माधव भंडारी यांना 12 वेळा उमेदवारी नाकारली; वडिलांसाठी मुलाची पोस्ट

Madhav Bhandari  : काँग्रेसचे बडे नेते तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर भाजपमध्ये नाराजीनाट्य रंगल्याचे चित्र पहायला मिळत आहे. भाजपचे वरिष्ठ नेते आणि प्रवक्ते माधव भंडारी यांना 12 वेळा उमेदवारी नाकारली आहे.  माधव भंडारींच्या मुलानं X या सोशल मीडियावर ट्विट करून आपल्या मनातली खदखद व्यक्त केली आहे. वडिलांसाठी मुलाची पोस्ट जवळपास 12 वेळा माधव भंडारींचं नाव उमेदवार म्हणून …

Read More »

महाराष्ट्राच्या ‘या’ गावातील विहीरीत आहे गुप्त राजवाडा; मराठ्यांच्या इतिहासाची साक्ष देणारे स्थळ

Maharashtra Tourism: महाराष्ट्राला ऐतिहासिक आणि नैसर्गिक वारसा लाभला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची स्थापना केली. शिवरायाच्या पराक्रमाची साक्ष देणारे अनेक गड-किल्ले आहेत. महाराष्ट्राच्या समृद्ध इतिहासाची साक्ष देणारी अनेक ठिकाणे आहेत. सातारा या शहरालाही ऐतिहासिक वारसा लाभला आहे. पूर्वी हे शहर मराठ्यांची राजधानी होते. जिल्ह्याला ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. साताऱ्यातच एक प्रेक्षणीय स्थळ आहे. शिवकालीन स्थापत्य शैलीचा अद्भूत नमूना पाहायला …

Read More »

सर्वसामान्यांना मोफत वीज मिळणार, मोदी सरकारची महत्त्वकांक्षी योजना लाँच; असा घ्या लाभ!

 PM Surya Ghar Yojana: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य नागरिकांना 300 युनिटपर्यंत मोफत वीजेचा लाभ घेता यावा यासाठी सर्वोदय योजना राबवण्यात आली आहे. या योजनेमुळं फक्त मोफत वीजच नव्हे तर कमाईची संधीदेखील मिळणार आहेत. या योजनेअंतर्गंत रोजगारदेखील मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, 75000 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक या योजनेत केली आहे.  22 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी …

Read More »

‘प्रेम असेल तर पाठवा पिझ्झा,’ Valentine Day ला तरुणीच्या मेसेजनंतर Swiggy ने काय केलं पाहा

बुधवारी संपूर्ण देशभरात व्हॅलेंटाइन डे साजरा करण्यात आला. जगभरातील प्रेमी युगूलांनी आपापल्या पद्धतीने हा दिवस साजरा करत पुन्हा एकदा प्रेमाच्या आणाभाका घेतल्या. प्रेमाचा हा दिवस साजरा करताना प्रियकर, प्रेयसी एकमेकांना गिफ्ट देत तो क्षण जगत असतात. दुसरीकडे या दिवसाचा फायदा घेणाऱ्यांचा कंपन्यांचा प्रयत्न असतो. म्हणूनच कपल्ससाठी वेगळ्या ऑफर, डिस्काऊंट जाहीर केले जातात. अनेक अॅप्सवरुन युजर्सना मोबाइल नोटिफिकेशन पाठवत ऑफरची माहिती …

Read More »

हक्काच्या घराच्या प्रतिक्षेत असलेल्या गिरणी कामगारांसह त्यांच्या वारसांना मोठा दिलासा; म्हाडाने घेतला मोठा निर्णय

Mhada Mill Worker Lottery : हक्काच्या घराच्या प्रतिक्षेत असलेल्या गिरणी कामगारांसह त्यांच्या वारसांना मोठा दिलासा  देमारा निर्णय म्हाडाने घेतला आहे.  मुंबईतील 58  बंद गिरण्यांमधील म्हाडाकडे नोंदणीकृत झालेल्या तसेच यापूर्वी झालेल्या सोडतीमध्ये यशस्वी न झालेल्या एकूण 1,50,484 गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांची पात्रता निश्चितीकरिता ‘म्हाडा’तर्फे ऑफलाइन व ऑनलाइन पद्धतीने कागदपत्रे स्वीकारण्यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या कालबद्ध विशेष अभियानाला 15 मार्च 2024 पर्यंत …

Read More »