ताज्या

कोकणात लोकसभेपूर्वीच मोठा राजकीय भूकंप? राणेंमुळे ‘हा’ नेता ठाकरेंची साथ सोडणार?

– कृष्णा पाटील लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपासंदर्भात महायुती आणि महाविकास आघाडीमधील घटक पक्षांमध्ये खलबत सुरु आहेत. एकीकडे जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी रस्सीखेच सुरु असतानाच उद्धव ठाकरेंच्या गटाला कोकणामध्ये मोठा धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कोकणातील एक प्रमुख आमदार आणि नेते भारतीय जनता पार्टीत असलेल्या राणे कुटुंबियांसंदर्भातील प्रकरणामुळे उद्धव ठाकरेंवर नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. हा बडा नेता उद्धव …

Read More »

‘शिवसेना-भाजपाचं अडीच-अडीच वर्ष CM पद ठरलेलं पण पवारांनी..’; खळबळजनक खुलासा

Uddhav Thackeray Went Against BJP Due To Sharad Pawar: शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीमध्ये 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर ज्या मुद्द्यामुळे फूट पडली त्यासंदर्भात आता शिंदे गटाने एक मोठा खुलासा केला आहे. भाजपा आणि शिवसेनेमध्ये मुख्यमंत्रीपद अडीच-अडीच वर्ष वाटून घेण्याचे ठरले होते. मात्र यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंना एक ऑफर दिल्याने त्यांची मती गुंग झाल्याचा दावा शिंदे …

Read More »

लग्नाच्या काही तास आधी बापानेच केली मुलाची हत्या; पत्नीला शिकवायचा होता धडा

Delhi Crime : मुलाचं लग्न अगदी थाटामाटातं व्हावं असं प्रत्येक बापाचं स्वप्न असतं. पण दिल्लीत एका पित्याने लग्नाच्या काही तासांआधीच मुलाची हत्या केली. चाकूने तब्बल 15 वार करुन पित्याने मुलाला संपवून पळ काढला. आरोपी पित्याला पोलिसांनी राजस्थानातून अटक केली आहे. हत्येनंतर पित्याने मला याचा कोणताही पश्चाताच नसल्याचे म्हटलं आहे. पोलिसांच्या चौकशीत आरोपी पित्याने आणखी धक्कादायक खुलासे केले आहेत. ज्यामुळे सर्वानाच …

Read More »

‘सरकार त्वरित बरखास्त करून सर्वोच्च न्यायालयाने…’; ठाकरे गटाचा आक्रमक पवित्रा

Supreme Court On Shivsena MLA Disqualification: सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी विधीमंडळातील बहुमताच्या आधारे दिलेला आमदार अपात्रतेसंदर्भातील निर्णयावर आक्षेप नोंदवला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 8 एप्रिल रोजी होणार आहे. मात्र न्यायालयाने नार्वेकरांच्या निकालाबद्दल शंका व्यक्त केल्याने आता ठाकरे गटाने याच मुद्द्यावरुन भाजपाबरोबरच शिंदे गटाला लक्ष्य केलं आहे.  पक्षांतराचा प्रदीर्घ अनुभव असलेले महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष… “पक्षांतराचा प्रदीर्घ अनुभव …

Read More »

Paytm, PhonePe आणि Google Pay ला टक्कर देणार मुकेश अंबानी! काय आहे Jio Pay Soundbox?

जिओने अल्पावधीतच भारतीय दूरसंचार बाजारपेठेत आपला ठसा उमटवला आहे. यासोबतच कंपनी नवनवीन बदलही करत असते. आता जिओ धमाकेदारपणे UPI पेमेंट मार्केटमध्ये प्रवेश करण्याचा विचार करत आहे. साधारणपणे तुम्ही पेटीएम साउंडबॉक्स फक्त दुकानांमध्येच पाहिला असेल. म्हणजेच, तुम्ही पेमेंट करताच, दुकान मालकाला आवाजाद्वारे कळवले जाते, परंतु आता Jio देखील त्यात प्रवेश करण्याचा विचार करत आहे. जिओ पे ॲप आधीच बाजारात उपलब्ध आहे …

Read More »

Weather Update: राज्यात पुढील 3-4 दिवसांत तापमानात होणार वाढ; हवामान विभागाचा इशारा

Weather Update : मार्च महिना सुरू झाला असून, थंडी कमी होऊन उकाडा जाणवू लागलाय. अशा स्थितीत अपेक्षेच्या विरुद्ध मुंबईच्या किमान तापमानात गेल्या काही दिवसांत घट झाली आहे. आता थंडी हळूहळू गायब होताना दिसत असून राज्यात येणाऱ्या काही दिवसांमध्ये राज्यातील तापमानात वाढ होताना दिसणार आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, पुढील 3-4 दिवसांत महाराष्ट्रात किमान आणि कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.  हवामान …

Read More »

सुनेचा सासुवर अत्याचार; सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही वृद्ध महिला असुरक्षित

Supreme Court : वृद्ध महिलांमधील सर्वेक्षणात, 16% ने उघड केले की त्यांना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांकडून कोणत्या ना कोणत्या स्वरुपात त्रास सहन करावा लागला आहे, शारीरिक शोषण हे अत्याचाराच्या शीर्ष प्रकारांपैकी एक आहे. 66% वयोवृद्ध स्त्रिया समाजात वृद्ध अत्याचार प्रचलित असल्याचे मानतात, ज्यांचे शोषण झाले, त्यापैकी फक्त 16% महिलांनी अत्याचाराची नोंद केली. गैरवर्तन मुख्यतः शारीरिक शोषण (52%), शाब्दिक अत्याचार (51%), अनादर …

Read More »

महाराष्ट्रच नाही तर देशातील एकमेव उभा नंदी; रायगड जिल्ह्यातील अनोखे शिव मंदिर

Shiva Temple In Raigad : नंदीचे दर्शन घेवून शिव मंदिरात दर्शनासाठी जावे लागते. सर्व शिव मंदिराबाहेर नंदीची मूर्ती दिसतेच.  रायगड जिल्ह्यात अनोखे शिव मंदिर आहे जिथे बसलेला नव्हे तर उभा नंदी आढळतो. महाराष्ट्रच नाही तर देशातील एकमेव  मंदिर आहे जिथे उभा नंदी आहे. महाशिवरात्री निमित्ताने या मंदिरात भाविकांची गर्दी पहायला मिळाली.  देशभरात महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असताना ग्रामीण …

Read More »

ना मुकेश, ना नीता..अंबानी परिवारातील ‘हा’ सदस्य रिलायन्सचा सर्वात मोठा मालक!

Reliance Industries Shares: मुकेश अंबानींची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज अनेक क्षेत्रात व्यवसाय करतेय. टेलिकॉमपासून ग्रीन सेक्टरपर्यंत विविध क्षेत्रात रिलायन्स आपल्या व्यवसायाचा विस्तार करत आहे. मुकेश अंबानी यांच्यापासून ईशा, आकाश आणि अनंत हे रिलायन्स समुहाचे वेगवेगळे व्यवसाय संभाळत आहेत. अंबानी परिवाराच्या नव्या पिढीकडे रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये खूप साऱ्या जबाबदाऱ्या आहेत.  गेल्यावर्षी शेअरहोल्डर्सने रिलायन्स इंडस्ट्रीजचे डायरेक्टर आकाश, ईशा आणि अनंत अंबानी यांना सहभागी करण्याच्या …

Read More »

मावळच्या जागेवरुन महायुतीत ओढाताण, राष्ट्रवादी आणि भाजपाचा दावा

चैत्राली राजापूरकर, झी मीडिया, मावळ : मावळ… अर्धा कोकणातल्या रायगड जिल्ह्यात, तर अर्धा पश्चिम महाराष्ट्रातल्या पुणे जिल्ह्यात (Pune) विभागलेला हा लोकसभा मतदारसंघ. उरणच्या सागरी किनाऱ्यापासून श्रीमंत महापालिका असलेल्या पिंपरी चिंचवडपर्यंत (Pimpri Chinchwad) विखुरलेला हा मावळचा मतदारसंघ. नव्यानं सुरू झालेला शिवडी न्हावाशेवा अटल सेतू इथल्या जनतेसाठी गेम चेंजर ठरणाराय. मात्र इथल्या अनेक समस्या अजूनही सुटलेल्या नाहीत. मावळ… समस्या पुष्कळ मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवे …

Read More »

काँग्रेसकडून उमेदवारांची यादी जाहीर, राहुल गांधी ‘या’ मतदारसंघातून लढणार निवडणूक

Loksabha Elections 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाकडून उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.  काही दिवसांपूर्वी भाजपकडून 195 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली होती. त्याबरोबर अनेक प्रादेशिक पक्षही त्यांच्या उमेदवारांच्या याद्या जाहीर करत आहेत. आता काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीसाठीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. यात 39 उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. यात राहुल गांधी, भूपेश बघेल यांसारख्या बड्या नेत्यांच्या …

Read More »

आतापर्यंत 35, रशिया-उक्रेन युद्धात भारतीय नागरिकांची तस्करी…अशी होतेय फसवणूक

Russia-Ukraine War : गलेलठ्ठ पगार आणि आकर्षक जीवनशैली असलेली नोकरी… अशी आमिषं दाखवून भारतीय तरुणांना रशिया-युक्रेन युद्धात ढकललं जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक भारतीय तरुणांना (Indians) आपल्याला रशियात युद्धात (War) पाठवलं जाणार असल्याचं माहित नव्हतं. रशियात पोहोचल्यानंतर त्यांच्याकडून एका करारावर (Contract) स्वाक्षरी घेण्यात येते. हा करार रशियन भाषेत असतो. या करारात रशियन सैन्याबरोबर मदतनीस म्हणून काम करत असल्याचं नमुद …

Read More »

महाशिवरात्रनिमित्त चाललेल्या शिव बारातमध्ये दुर्घटना, करंटमुळे 14 जण भाजले

Kota Accident: कोटामध्ये शिव बारात नावाच्या उत्सवाला गालबोट लागले आहे. यावेळी मोठी दुर्घटना घडून 14 जण भाजले. तर सर्व जखमींवर जवळच्या एमबीएस रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कुन्हाडी थर्मल येथे ही घटना घडली. कोटाच्या कुन्हाडी ठाणे क्षेत्रात महाशिवरात्र पर्व सुरु होतेय.यानिमित्ताने शिव बारात काढण्यात येत होती. पण अचानक करंट पसरला. यामध्ये 14 हून अधिकजण भाजल्याचे वृत्त आहे. लहान मुलांच्य हातामध्ये धार्मिक …

Read More »

येणारी लोकसभा निवडणूक ही ‘वाघ विरुद्ध लांडगे’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

Loksabha 2024 : मराठवाडा दौऱ्यावर असलेल्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी पुन्हा एकदा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(CM Eknath Shinde) यांच्यावर निशाणा साधला आहे. येणारी लोकसभा निवडणूक ही वाघ विरुद्ध लांडगे अशी होणार आहे, असं उद्धव ठाकरेंनी कळंबमधल्या सभेत म्हटलंय. ही लढाई गद्दार विरुद्ध इमानदार अशी आहे, राम राम करून नुस्त घंटा वाजवणारे आमचे हिंदूत्व नाही,  …

Read More »

खासदार झालेल्या सुधा मूर्ती कोण आहेत? ‘इन्फोसिस’च्या First Investor म्हणून गुंतवलेले ‘इतके’ रुपये

Sudha Murthy Nominated for Rajya Sabha : देशातली दुसरी मोठी आयटी कंपनी इंफोसिस उभी करण्यात मोलाचं योगदान असलेल्या सुधा मूर्ती (Sudha Murthy) यांना राज्यसभेचं नामांकन जाहीर करण्यात आलं आहे. इंफोसिसचे (Infosys) को-फाऊंडर एन आर नारायण मूर्ती यांनी इंफोसिस कंपनीची सुरुवात केली. यासाठी सुधा मूर्ती यांनी 10000 रुपये उधार घेतले होते. या पैशावर नारायण मूर्ती यांनी कंपनी उभारली आणि आज जगभरात …

Read More »

मोठी बातमी! सुधा मूर्तींवर राष्ट्रपतींनी सोपवली नवीन जबाबदारी; मोदींनी केली घोषणा

PM Modi Announcement About Sudha Murty: प्रसिद्ध लेखिका, ‘इन्फोसिस फाउंडेशन’च्या प्रमुख आणि आपल्या समाजकार्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या सुधा मूर्तींवर केंद्रात सत्तेत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने नवीन जबाबदारी सोपवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून यासंदर्भातील माहिती दिली आहे. मोदींनीच केली घोषणा पंतप्रधान मोदींनी आपल्या एक्स (ट्वीटर) अकाऊंटवरुन एका सोहळ्यातील जुना फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये ते …

Read More »

महिला धोरण जाहीर! ‘या’ महिलांना मासिक पाळीच्या दिवसांत मिळणार भरपगारी सुट्टी

Maharashtra Women’s Policy 2024: जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून आज राज्याचं महिला धोरण जाहीर करण्यात आलं आहे. आजच्या महिला दिनानिमित्त एक दिवस आधीच हे धोरण जाहीर करण्यात आलं आहे. या धोरणामध्ये महिलांना विशेष सूट देण्यापासून ते मासिक पाळीमध्ये सुट्टी देण्यापर्यंत अनेक गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तरावर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या समिती तसचे महिला …

Read More »

महिला दिनीच सरकारची खास भेट! मोदींनी केली घोषणा; होणार मोठा आर्थिक फायदा

Central Government Women’s Day Gift Announced by PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महिला दिनानिमित्त सर्व भारतीय महिलांना मोठी भेट दिली आहे. केंद्र सरकारने महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर एलपीजी गॅसच्या किंमतीमध्ये कपात केली आहे. आमच्या सरकारने एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत 100 रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे असं पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत. नारीशक्तीला होणार फायदा मोदींनी आपल्या अधिकृत एक्स म्हणजेच ट्वीटर अकाऊंटवरुन यासंदर्भातील …

Read More »

‘मोदी-शाहांना हवे तेच निकाल देणारे न्यायाधीश..’; ठाकरे गटाचा टोला! चंद्रचूड यांच्याकडून न्यायाची अपेक्षा

Calcutta High Court Judge Abhijit Gangopadhyay Joins BJP: कोलकाता हायकोर्टाचे न्यायाधीश अभिजित गंगोपाध्याय यांनी न्यायाधीश पदाचा राजीनामा दिल्यानंतर 2 दिवसांमध्येच भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. गुरुवारी गंगोपाध्याय यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर तृणमूल काँग्रेसविरोधात भाष्य केलं. “भ्रष्टाचारी तृणूल काँग्रेस पक्षाची राज्यातून हकालपट्टी करणे हेच आमचे ध्येय आहे,” असं गंगोपाध्याय म्हणाले आहेत. मात्र आता याच मुद्द्यावरुन अशाप्रकारे न्याय व्यवस्थेमधील व्यक्तीने राजकीय …

Read More »

शरद पवारांची तंबी, तरीही सुनील शेळकेंचा रोहित पवारांवर निशाणा, म्हणाले ‘अजितदादांना खलनायक…’

Maharastra Politics : लोकसभा निवडणुकीपुर्वी शरद पवारांनी (Sharad Pawar) पुन्हा एकदा आक्रमक रुप धारण केलंय. लोणावळ्यात झालेल्या राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळाव्यात पवारांचा हा रुद्रावतार पाहायला मिळाला. लोणावळ्याच्या कार्यक्रमाला येणाऱ्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मावळचे आमदार सुनील शेळकेंनी (MLA Sunil Shelke) धमकावल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला. तेव्हा आपल्या खास शैलीत पवारांनी आमदार शेळकेंना चांगलंच फैलावर घेतलं. मला शरद पवार म्हणतात, खबरदार इथल्या …

Read More »