New year festival calender: रक्षाबंधन, गणपती, नवरात्र, दिवाळी आणि… जाणून घ्या 2023 वर्षातील मोठ्या सणांच्या तारखा

New Year Calender: आता आपण लवकरच नव्या वर्षांत (new year 2023) पदार्पण करणार आहोत. आपलं हे नवं वर्ष सुखी-समृद्धीचं जावं अशीच सगळ्यांची आशा आहे. सगळेच आपल्या मित्र-परिवाराला आत्तापासूनच शुभेच्छा देत आहेत. नववर्षांसाठी आपण सगळेच उत्सुक आहोत. नवं वर्ष आपल्या सर्वांसाठी काय आनंद घेऊन येईल याकडे आपले सर्वांचे लक्ष आहे. तेव्हा आपण सगळेच एक्सायटेड आहोत. परंतु आपण त्यापेक्षा अजून एका गोष्टीची वाट पाहत असतो ती म्हणजे पुढच्या वर्षी (new year 2023 festival calender) कोणते सण कधी येणार आहेत. त्यानुसार आपण लग्नाचे मुहूर्त असतील ते ठरवतं अथवा पंचांग बघतो. तेव्हा यंदाही येणाऱ्या 2023 वर्षात कोणते सण कधी आहेत, याची माहिती जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. तेव्हा चला तर मग जाणून घेऊया येत्या वर्षात मोठे सण कोणत्या दिवशी आहेत. (
New Year 2023 Calendar Know The List of Date of Biggest Indian Festivals and Holidays Calendar in Marathi) 

हे वर्ष लवकरच संपणार आहे, आणि आपण नवीन वर्षात पदार्पण करणार आहोत. आतापासून लोकांमध्ये नवीन वर्षातील त्यांचे प्रमुख उपवास, सणांचे दिवस आणि तारखा जाणून घेण्याची उत्सुकता दिसून येऊ लागली आहे. नवीन वर्षात होळी, दिवाळी, दसरा, धनत्रयोदशी, करवा चौथ असे मोठे सण कधी येतात हे प्रत्येकाला जाणून घ्यायचे असते. काही लोकांना मोठ्या वीकेंड (weekend and government holiday) आणि सरकारी सुट्ट्यांबद्दल देखील जाणून घ्यायचे आहे. 2023 सालातील सगळ्यात मोठे सण कोणत्या तारखेला येत आहेत ते या लेखातून जाणून घेऊया. 

हेही वाचा :  एकाच वेळी चीन आणि पाकिस्तानवर ठेवणार नजर; हवाई दलाला मिळाले हेरॉन मार्क-2 ड्रोन

वर्ष 2023 चे मुख्य सण आणि त्यांच्या तारखा 

जानेवारी 2023 
14 जानेवारी – लोहरी
15 जानेवारी – मकर संक्रांती / पोंगल 
26 जानेवारी – वसंत पंचमी  

फेब्रुवारी 2023
5 फेब्रुवारी – गुरु रविदास जयंती
18 फेब्रुवारी – महाशिवरात्री  

मार्च 2023 
8 मार्च – होळी
22 मार्च – चैत्र नवरात्री
30 मार्च – राम नवमी

एप्रिल 2023 
4 एप्रिल – महावीर जयंती
7 एप्रिल – गुड फ्रायडे 
9 एप्रिल – इस्टर
14 एप्रिल- बैसाखी 
22 एप्रिल- अक्षय तृतीया
22 एप्रिल- ईद-उल-फित्र

मे 2023
5 मे – बुद्ध पौर्णिमा

जून 2023 
20 जून- जगन्नाथ रथयात्रा
29 जून – बकरी ईद

जुलै 2023
3 जुलै – गुरु पौर्णिमा
28 जुलै – मोहरम

ऑगस्ट 2023 
21 ऑगस्ट- नागपंचमी
29 ऑगस्ट – ओणम
30 ऑगस्ट – रक्षा बंधन

सप्टेंबर 2023
7 सप्टेंबर – जन्माष्टमी                    
19 सप्टेंबर – गणेश चतुर्थी

ऑक्टोबर 2023 
15 ऑक्टोबर – शारदीय नवरात्री
23 ऑक्टोबर- महानवमी 
24 ऑक्टोबर- दसरा 
28 ऑक्टोबर- वाल्मिकी जयंती

हेही वाचा :  आयोगाची तयारी अंतिम टप्प्यात; घटनात्मक जबाबदारीनुसार सज्जता

नोव्हेंबर 2023
1 नोव्हेंबर – करवा चौथ                
10 नोव्हेंबर – धनत्रयोदशी                    
12 नोव्हेंबर – दिवाळी
14 नोव्हेंबर – गोवर्धन पूजा
14 नोव्हेंबर – भाई दूज
19 नोव्हेंबर – छठ पूजा
19 नोव्हेंबर – गुरु नानक जयंती

डिसेंबर 2023
25 डिसेंबर – ख्रिसमस 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, देशातील ‘या’ बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Loksabha Election 2024 : तिसऱ्या टप्प्यात म्हणजे 7 मे रोजी देशात 93 जागांवर मतदान होणार …

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …