सावधान, कोरोनाचा ब्लास्ट, महाराष्ट्र-गुजरातमध्ये 754 लोक आजारी, 9 लक्षणांवर ठेवा बारीक नजर

Corona Virus पुन्हा एकदा भारतात डोके वर काढत आहे. गेल्या 24 तासांत भारतात कोरोनाचे 754 नवीन रुग्ण आढळले असून, एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. यावेळी, कोरोनाच्या XBB व्हेरिएंटचे नवीन सब-वेरिएंट XBB 1.16 (XBB 1.16) च्या प्रकरणांमध्ये झालेली वाढ यामागचे मुख्य कारण असल्याचे सांगितले जात आहे. चिंतेची बाब म्हणजे, या सब-वेरिएंटची प्रकरणे ब्रुनेई, यूएसए आणि सिंगापूरमध्ये देखील आढळली आहेत. असे मानले जाते की, या सब-व्हेरिएंटमुळे कोरोनाची नवीन लाट येऊ शकते. TOI च्या एका अहवालानुसार, महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरात सारख्या राज्यांमध्ये कोविड पॉझिटिव्ह दरात वाढ झाली आहे.

महाराष्ट्रात कोरोनामुळे दोन मृत्यू झाले आहेत तर एकाच दिवसात 155 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तेलंगणामध्ये मंगळवार आणि बुधवारी 100 हून अधिक प्रकरणे नोंदवली गेली. राजस्थान, मध्य प्रदेश, तामिळनाडू, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीर या राज्यांमध्ये पॉजिटिविटी रेट 5% आणि 10% दरम्यान आहे. नवीन केसेस वाढण्यामागे XBB 1.16 हे कारण आहे का, त्याची लक्षणे काय असू शकतात आणि ते टाळण्यासाठी काय केले पाहिजे हे जाणून घेऊया. (फोटो सौजन्य :- iStock)

हेही वाचा :  Ex-AIIMS चे डायरेक्टर म्हणतात Omicron BF.7 ला ही एकच गोष्ट देऊ शकते मात

XBB.1.16 आणि XBB.1.5 मुळे प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे का?

xbb-1-16-xbb-1-5-

कोवस्पेक्ट्रम के अनुसार, XBB.1.16 भारतामध्ये महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये वेगाने रुग्णांमध्ये वाढ होत आहे. हे XBB चे सब-वेरिएंट आहेत आणि कोरोनाचे हे प्रकार भारतात आधीपासूनच डोकेदुखी वाढवत आहेत. कोरोनाचे XBB.1.5 नावाचे सब-वेरिएंट आधीपासून धुमाकूळ घालत आहे. या दोन्ही सब-वेरिएंटमुळे नवीन प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याचे मानले जात आहे. मात्र, आणखी काही नमुन्यांचे अहवाल आल्यानंतरच खरे चित्र स्पष्ट होणार आहे.
(वाचा :- Weight Loss Cancer या पद्धतीने वेटलॉस करणं खूप लाभदायक व सुरक्षित, नाहीतर ब्लड सेल्समध्ये कॅन्सर बनवतो लठ्ठपणा)​

ही COVID XBB 1.16 प्रकाराची लक्षणे असू शकतात

-covid-xbb-1-16-

XBB 1.16 सब-वेरिएंटच्या लक्षणांबद्दल बोलायचे झाले तर आतापर्यंत या सब-वेरिएंटच्या कोणत्याही विशिष्ट लक्षणांची पुष्टी झालेली नाही. ह्या सब-वेरिएंटची लक्षणे देखील कोविडच्या क्लासिक लक्षणांसारखी असू शकतात असा अंदाज वर्तवला जात असला तरी डोकेदुखी, स्नायू दुखणे, थकवा, घसा खवखवणे, सर्दी, खोकला ही लक्षणे प्रामुख्याने दिसू शकतात. याशिवाय अनेक रुग्णांना पोटदुखीचा त्रास होतो. अस्वस्थता आणि अतिसार सारखी लक्षणे देखील जाणवू शकतात.
(वाचा :- 95% ब्लॉकेजेसमुळे आला हार्ट अटॅक, सुष्मिता सेनच्या Cardiologist चे हे 5 उपाय नैसर्गिकरित्या टाळतात जीवाचा धोका)​

हेही वाचा :  Maharashtra Board HSC Result 2023 : 154 पैकी 23 विषयांचा निकाल 100 टक्के; पाहा कोणत्या विभागानं खाल्ली गटांगळी

COVID XBB 1.16 किती घातक आहे?

covid-xbb-1-16-

असे सांगितले जात आहे की हा नवीन सब-वेरिएंट वेगाने पसरत आहे आणि त्याकडे आधीच एक धोका म्हणून पाहिले जात आहे. कोरोनाचे नवीन रूपे रोगप्रतिकारशक्तीला चकवण्यात पटाईत आहेत हे खुद्द जाणकारांनी सुद्धा मान्य केले आहे. XBB 1.16 सह ओमिक्रॉन कुटुंबाचे सब-वेरिएंट तर अत्यंत वेगाने पसरण्यासाठी ओळखले जातात. तुम्हाला माहित असेल की 2021 पासून, Omicron ने जगभरात खळबळ उडवून दिली आहे. तथापि, हे सब-वेरिएंट नक्की किती गंभीर आहेत हे आताच सांगणे कठीण आहे. पण आपण खबरदारी बाळगली पाहिजे.

(वाचा :- Anti Aging: वयाच्या 60 नंतरही येणार नाही म्हातारपण, कायम दिसाल अनिल कपूरसारखे तरूण-फिट, खायला घ्या हे 5 पदार्थ)​

कोरोनापासून बचाव म्हणून काय करावे?

कोरोनापासून बचाव म्हणून काय करावे?

कोरोनापासून बचाव करण्याचे उपाय आता सर्वांनाच माहीत आहेत. पण लक्षात ठेवा की आजकाल इन्फ्लूएंझा विषाणू असणाऱ्या ‘H3N2’ विषाणूनेही खळबळ उडवून दिली आहे. त्याची लक्षणे देखील कोरोना विषाणू सारखीच आहेत. अशा परिस्थितीत तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे संसर्गाची लक्षणे आढळल्यास घराबाहेर पडणे टाळा. संसर्गाची लक्षणे असलेल्या लोकांच्या संपर्कात जाणे टाळा. मास्क न लावता गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा. जर एखाद्याला कोरोना झाला असेल तर त्याला लहान मुले आणि वृद्धांपासून दूर ठेवा. घरामध्ये हवेचा संचार चांगला राहील याची काळजी घ्या. साबणाने हात धुत रहा किंवा सॅनिटायझर वापरा.

हेही वाचा :  Honey for weight loss : आठवड्याभरात मेणासारखी वितळेल पोट, कंबर व मांड्यांवरची चरबी, मधात मिक्स करून खा ‘हे’ 6 पदार्थ!

(वाचा :- Anti Cancer Vegetables: कॅन्सरच्या कट्टर दुश्मन आहेत या 10 भाज्या, कॅन्सर पेशींचा जन्म घेण्याआधीच करतात खात्मा)
टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

राणेंनी मंत्रीमंडळात काय दिवे लावले? राऊतांचा सवाल; राज ठाकरेंना म्हणाले, ‘वकिली करणाऱ्यांनी..’

Sanjay Raut Slams Narayan Rane Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी नारायण राणेंसाठी …

‘राज ठाकरेंचे देव बदलू शकतात, ते नकली अंधभक्त! त्यांनी वेळ काढून..’; राऊतांचा टोला

Sanjay Raut On Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्मा सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे नकली अंधभक्त आहेत, असा टोला …