झोपताना उशी घेण्याचे फायदे आणि नुकसान तुमच्या झोपण्याच्या पोझिशनवर अवलंबून असतात. जर तुम्ही पाठीवर झोपत असाल किंवा एका कुशीवर झोपत असाल तर तुमच्यासाठी उशी डोक्याखाली घेणे फायदेशीर आहे. पण जर तुम्ही पोटावर झोपत असाल तर उशीची काहीही आवश्यकता नाही. किंवा अतिशय पातळ उशी घेणे फायदेशीर ठरते. जाणून घेऊया उशी न घेता झोपण्याचे फायदे. (फोटो सौजन्य – टाइम्स ऑफ इंडिया)
मान आणि कंबरेचे दुखण्यापासून मिळेल सुटका
पोटावर झोपत असल्यास उशीशिवाय झोपणे फायद्याचे ठरते. कारण असे झोपल्यास मान आणि पाठदुखीपासून आराम मिळतो. उशीशिवाय झोपल्याने झोपेच्या वेळी मणक्याचे संरेखन होते. ज्यामुळे दिवसभरात होणारी पाठ किंवा मानदुखी कमी होण्यास मदत होते. अगदीच सवय असेल तर अतिशय अतिशय पातळ उशी वापरणे देखील फायदेशीर ठरू शकते.
(वाचा – लोखंडी कढईत जेवण न बनवण्याचा का दिला जातो सल्ला? जाणून घ्या या मागचं वैज्ञानिक कारण)
सुरकुत्या कमी होतात
अभ्यासातून असे दिसून आले आहे की, झोपेच्या वेळी उशा त्वचेला संकुचित करू शकतात, विशेषत: जे लोक त्यांच्या पोटावर झोपतात त्यांना याचा फायदा दिसून येतो. यामुळे सुरकुत्या येऊ शकतात आणि तुम्ही वयापेक्षा मोठे दिसू लागतात. अशा परिस्थितीत, उशीशिवाय झोपणे तुम्हाला तरुण दिसण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.
(वाचा – रात्री दोनपेक्षा अधिक वेळा लघवीला जावं लागतं? असू शकतात हे 7 गंभीर आजार, याप्रकारे करा स्वतःचा बचाव)
शरीराची ठेवण देखील राहील सरळ
जेव्हा तुम्ही खूप जाड उशीवर झोपता तेव्हा तुमची मान एका वक्र किंवा कर्वमध्ये ढकलली जाते. जी कालांतराने कायमस्वरूपी होते. त्याचा तुमच्या शरीराच्या ठेवणीवर परिणाम होतो. उशीशिवाय झोपल्याने तुमची मुद्रा सुधारू शकते. त्यामुळे उशीचा वापर न करणेच फायदेशीर ठरते.
(वाचा – Diabetes Myths: डायबिटीज कधीच बरा होत नाही असं तुम्हाला पण वाटतं? तर 5 मधुमेहासंबंधातील गैरसमज जाणून घ्या)
झोपेची समस्या असल्यास फायदेशीर
उशीशिवाय झोपल्याने तुमच्या झोपेची गुणवत्ता सुधारू शकते. जर तुम्ही मध्यरात्री उठत असाल किंवा निद्रानाश झाला असेल तर उशीशिवाय झोपण्याचा प्रयत्न करा. यामुळे झोप येण्यास मदत होऊ शकते.
(वाचा – फक्त डाएट आणि वर्कआऊटच नाही तर अतुल कुलकर्णीची ‘ही’ गोष्ट अतिशय खास, ज्यामुळे 57 व्या वर्षी दिसतो चिरतरूण)
स्ट्रेस देखील होतोय कमी
उशी घेऊन झोपल्याने तुमची झोप खराब होऊ शकते कारण तुम्ही तुमची शारीरिक स्थिती सतत बदलत राहता. आणि जर तुम्हाला रात्री चांगली झोप लागली नाही तर तुम्ही दिवसा चिडचिड करता. दिवसभर तणावग्रस्त वाटू शकतं. पण उशीशिवाय चांगली झोप येऊ लागली तर तुमच्या झोपेची गुणवत्ता सुधारते. झोप चांगली लागली तर तुम्ही स्ट्रेस फ्री राहता. आणि छान झोप लागते.
(वाचा – Low Blood Pressure ला 2 मिनिटांत नॉर्मल करेल आयुर्वेदिक डॉक्टरांचा ‘हा’ सल्ला, स्वस्त आणि अतिशय प्रभावी उपाय)
टीप : हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हा कोणत्याही प्रकारचा पर्याय असू शकत नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या तज्ञांशी संपर्क साधावा.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या