किती बावळट बनवता? नव्या मालिका सुरू करुनही झी मराठी ट्रोल, प्रेक्षक संतापले

मुंबई, 14 सप्टेंबर : टेलिव्हिजन विश्वात एकेकाळी टॉप वनवर असणारी झी मराठी वाहिनी सध्या प्रेक्षकांची डोकेदुखी ठरत असल्याचं दिसत आहे. मधल्या काळात झी मराठीवर सुरू असलेल्या मालिकांमुळे प्रेक्षक हैराण झाले. प्रेक्षकांनी आपला मोर्चा स्टार प्रवाह वाहिनीकडे वळवल्याचं पाहायला मिळालं. परिणामी झी मराठीच्या मालिका टीआरपीमध्ये मागे पडल्या. झी मराठीनं पुन्हा प्रेक्षकांची मनं जिंकण्यासाठी वाहिनीवर नव्या मालिका सुरू केल्या. झी मराठीवर आपण पाहिलं तर सगळ्या टाइम स्लॉटला नव्या मालिका सुरू झाल्या आहेत. केवळ होममिनिस्टर हा जुना कार्यक्रम सुरू आहे. नव्या मालिका सुरू झाल्यानं प्रेक्षक पुन्हा झी मराठीकडे वळतील अशी अपेक्षा होती पण नव्या मालिका पाहूनही प्रेक्षकांनी झी मराठीला वाहिनीला चांगलेच खडे बोल सुनावत ट्रोल केलं आहे.

झी मराठीवर नुकतीच नवा गडी नवं राज्य, तू चालं पुढं, बस बाई बस, दार उघड बये, डान्स महाराष्ट्र डान्स या नव्या मालिका आणि कार्यक्रम सुरू झाले. त्यातील बस बाई बस हा कार्यक्रम लोकप्रिय होताना दिसत आहे. पण संध्याकाळच्या स्लॉटच्या बऱ्याच मालिका पाहून प्रेक्षक चांगलेच हैराण झाले आहेत.

हेही वाचा – Hemangi kavi : ‘कोणत्याही फिल्टरशिवाय स्वतःवर प्रेम करा!’; हेमांगी कवीचा चाहत्यांना सल्ला

रात्री 9 वाजता लागणाऱ्या नवा गडी नवं राज्य या मालिकेनं अल्पावधीत प्रेक्षकांची मनं जिंकली असं वाटतं होतं. पण काही दिवसात मालिकेचं कथानक पुढे सरकताच प्रेक्षकांनी मालिकेला ट्रोल करण्यास सुरूवात केली आहे. नवा गडी नवं राज्य या मालिकेत अभिनेत्री अनिता दाते रमाची भूमिका साकारत आहेत. रमाचा मृत्यू झाला आहे आणि ती तिच्या नवऱ्याच्या म्हणजेच राघवच्या दुसऱ्या बायकोला म्हणजेच आनंदीला दिसते. आनंदीच्या संसारात ती ढवळा ढवळ करण्याचा प्रयत्न करत असते. ती कधी बंद दारातून घरात शिरते. गणपती विशेष भागात आनंदी रमाचा ओवसा भरते असाही भाग दाखवण्यात आला होता. तर आता रामस्त्रोत्र म्हटल्यानंतर रमा घाबरते आणि पळून जाते असा भाग दाखवण्यात येणार आहे. या भागाता प्रोमो रिलीज झाला आहे. या प्रोमो पाहून प्रेक्षकांनी मात्र मालिकेला चांगलंच ट्रोल केलं आहे.

एका युझरनं मालिकेच्या लेखकाची अक्कल काढली आहे त्यानं म्हटलंय, ‘लेखक डोक्यावर पडलाय सगळी गोष्टच विसंगत आहे कश्याचा कशाला मेळ नाही’.


तर दुसऱ्या युझरनं म्हटलंय, ‘भूत सुहासिनीचा ओवसा. गणपती दर्शनाला येत आणि राम रक्षा म्हटल्यावर का भीत माहिती नाही. तर आणखी एका युझरनं म्हटलं आहे की, गणपतीच्या पाया पडली, पुजेला बसली तेव्हा काही झालं नाही आणि मंत्र बोल्ल्यावर काय झालं? कसं एवढं बावळट बनवता रे?

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.



Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

प्राजक्ता माळीने व्यक्त केली अजब इच्छा; म्हणाली ‘मला चंद्र, मंगळ अंतराळ…’

मुंबई, 14 सप्टेंबर : अभिनेत्री प्राजक्ता माळी एक गुणी अभिनेत्री आहे. ती कायम चर्चेत असते. …

शिर्डीनंतर प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिराच्या विश्वस्त मंडळावर लक्ष?

मुंबई, 14 सप्टेंबर :  उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानंतर प्रसिद्ध शिर्डीच्या साई बाबा मंदिराचं विश्वस्त …