Video: जबरदस्तीने सेल्फी घेणाऱ्या चाहत्यासोबत हृतिक रोशनची अशी वागणूक; त्या फॅनला सर्वांसमोर सुनावलं

मुंबई: अभिनेता हृतिक रोशन हा अशा स्टार्सपैकी आहे ज्याच्याभोवती नेहमीच चाहत्यांचा (Hrithik Roshan Video Viral With Fan) गराडा असतो. चाहत्यांसोबत त्याचं संभाषण अनेकदा व्हायरलही झालं आहे. त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी अनेकदा फॅन्स उत्सुक असतात, तोही त्यांच्यासोबत फोटो काढताना दिसतो. मात्र सध्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये हृतिकचा संतापही पाहायला मिळाला.

हृतिक चक्क त्याच्या चाहत्यावर यावेळी भडकला आहे. ‘ब्रह्मास्त्र’च्या स्क्रिनिंगनंतर ही घटना घडली. त्याठिकाणी त्याच्या एका चाहत्याने अभिनेत्यासोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला. ही बाब काही हृतिकला रुचली नाही. ब्रह्मास्त्र पाहिल्यानंतर हृतिक आणि त्याची मुले हृहान आणि हृधन थिएटरमधून बाहेर पडत होते, त्यावेळी चाहत्याने असा प्रयत्न केल्याने हृतिकचा संताप झाल्याचे दिसले.

हे वाचा-Video: रणबीरनंतर ‘द कश्मीर फाइल्स’च्या दिग्दर्शकाचं ‘बीफ प्रेम’; विवेक अग्निहोत्री ट्रोल

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर स्टारर ‘ब्रह्मास्त्र’ हा सिनेमा हृतिकने त्याच्या मुलांसोबत पाहिला. त्यानंतर मुंबईतील चित्रपटगृहातून तो बाहेर पडत होता. त्यावेळी एका चाहत्याने धावत येत त्याच्यासोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला. यावेळचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. विविध पॅपाराझी पेजद्वारे शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये हृतिकची नाराजी स्पष्ट दिसत आहे.


या व्हिडिओमध्ये हृतिक त्याच्या कारजवळ येऊन उभा राहतो आणि आपल्या मुलांना कारमध्ये बसवतो आहे. त्यावेळी एक चाहता जबरदस्तीने अभिनेत्याजवळ जाऊन सेल्फी घेताना दिसतो. त्यानंतर नाराज हृतिकच्या टीममधील व्यक्तीदेखील त्या संबंधित चाहत्याला ओरडताना दिसत आहेत. त्याला हृतिकपासून दूर हटवले जाते. तर कारमध्ये बसण्यापूर्वी हृतिकही त्याला चिडून सुनावतो की, ‘क्या कर रहा रहा है?’

हे वाचा-अंगात ताप होता, बसताही येत नव्हतं तरी… ‘आई कुठे काय करते’ फेम आप्पांचं होतंय कौतुक

काही आठवड्यांपूर्वी अभिनेता शाहरुख खान मुंबई विमानतळावरून बाहेर पडत असताना त्याच्यासोबतही अशीच एक घटना घडली होती. एका चाहत्याने शाहरुखसोबत जबरदस्तीने सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला, ज्यानंतर तोही नाराज दिसला होता. त्‍याच्‍यासोबत मुलगा आर्यन खानही होता.

हृतिक लवकरच दिसणार ‘विक्रम वेधा’मध्ये

गेल्या अनेक दिवसांपासून विक्रम वेधा (Vikram Vedha Trailer Release) सिनेमाची खूप चर्चा आहे. सैफ अली खान आणि हृतिक रोशन यांची ॲक्शन या सिनेमामध्ये पाहायला मिळणार आहे. त्यांच्यासोबत राधिका आपटेही वेगळ्या अंदाजात या सिनेमामध्ये आहे. हा तमिळ सिनेमा ‘विक्रम वेधा’चा हिंदी रिमेक आहे. तमिळ सिनेमात आर माधवन आणि विजय सेतुपथी यांनी भूमिका केल्या होत्या.



Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

‘वन लायनर गोष्ट ऐकल्यावर मी सुन्न झालो!’; किरणच्या आयुष्यात असा आला ‘देवमाणूस’

मुंबई,  10 सप्टेंबर : झी मराठीवरील अशा फार कमी मालिका आहेत ज्या अनेक वर्ष प्रेक्षकांच्या …

रस्त्यावरच रॅम्प वॉक करतेय सई ताम्हणकर; म्हणाली- स्वप्न कधीतरी खरी होतातच!

मुंबई: अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar Video) चा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. …