Tag Archives: maharashtra news in marathi

नवाब मलिकांच्या अटकेची बातमी कळताच ममता बॅनर्जींचा शरद पवारांना फोन; पाच मिनिटांच्या चर्चेत म्हणाल्या….

मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना आज अटक केली आहे. त्यामुळे आता राज्यातलं वातावरण चांगलंच तापलं आहे. दरम्यान, राज्याबाहेरही हे प्रकरण पोहोचल्याचं दिसून येत आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही या प्रकरणात उडी घेतली असून त्यांनी शरद पवार यांना फोन करत राष्ट्रवादीला पाठिंबा दर्शवला आहे. नवाब मलिक यांच्या अटकेमुळे राज्याच्या राजकारणात मोठी …

Read More »

“ज्या ज्या मंत्र्यांना अटक होईल, त्यांना…”, नवाब मलिक यांच्या अटकेनंतर चंद्रकांत पाटील यांचा सूचक इशारा!

नवाब मलिक यांना अटक झाल्यानंतर भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. जवळपास ८ तास चौकशी केल्यानंतर ईडीनं राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना अटक केली. त्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षांकडून या अटकेचा तीव्र शब्दांत निषेध केला जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाकडून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील …

Read More »

“२०१९ मध्ये माझ्यावरही भाजपामध्ये जाण्यासाठी दबावतंत्र वापरले, पण…”, नवाब मलिकांच्या अटकेनंतर जयंत पाटलांचा गंभीर आरोप

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर भाजपावर गंभीर आरोप केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर भाजपावर गंभीर आरोप केला आहे. २०१९ मध्ये माझ्यावरही भाजपामध्ये जाण्यासाठी दबावतंत्र वापरले गेले, असा आरोप …

Read More »

“आता ईडीसमोर बोला, तुमच्या हातात…”; नवाब मलिकांवरील कारवाईनंतर नारायण राणेंची प्रतिक्रया

महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली आहे. बुधवारी सकाळी ईडीचे अधिकारी नवाब मलिक यांच्या घरी पोहोचले होते. त्यानंतर काही कागदपत्रे घेऊन अधिकाऱ्यांनी मलिक यांनी ईडीच्या कार्यालयात नेले. त्यांनर नवाब मलिक यांची चौकशी करण्यात आली. हे प्रकरण अंडरवर्डशीही संबंधित असल्याचे ईडीच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यानंतर नवाब मलिक यांनी ईडीने अटक केली आहे. यावर केंद्रीय मंत्री …

Read More »

Video : भंगारवाला ते महाराष्ट्राच्या कॅबिनेटमधील मंत्री… असा आहे नवाब मलिक यांचा राजकीय प्रवास

राज्याच्या कॅबिनेटमध्ये अल्पसंख्यांक मंत्री असणाऱ्या नवाब मलिक यांना ईडीने अटक केलीय. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना आठ तासांच्या चौकशीनंतर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडीने) अटक केली आहे. जुन्या मालमत्ता व्यवहार प्रकरणी नवाब मलिक यांची अंमलबजावणी संचालनालय (ईडी)कडून चौकशी केल्यानंतर ईडीने ही कारवाई केलीय. पहाटेच ईडीचं पथक नवाब मलिक यांच्या घरी धडकलं होतं. त्यानंतर सकाळी सात वाजल्यापासून नवाब मलिक यांची मुंबईतील …

Read More »

“सत्तेच्या माडीसाठी ईडीची शिडी…”; अमोल कोल्हेंनी कविता शेअर करत दिला नवाब मलिकांना पाठिंबा

या कवितेतून अमोल कोल्हेंनी भाजपावर टीका केली आहे. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची आज ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे. सकाळी सहा वाजता ईडीचे अधिकारी नवाब मलिक यांच्या घरी पोहोचले होते. तिथे त्यांची सुमारे तासभर चौकशी करण्यात आली. त्यानंतर अधिकारी नवाब मलिक यांना सकाळी साडेसातच्या सुमारास ईडी कार्यालयात घेऊन गेले. सकाळी साडेआठ वाजल्यापासून ईडी कार्यालयात मलिकांची …

Read More »

“समलैंगिकता हा एक आजार आहे”, मानसोपचार तज्ज्ञाचा वादग्रस्त दावा, चौकशीचे आदेश!

समानतेच्या तत्वावर गेल्या काही वर्षांमध्ये वारंवार चर्चा होताना पाहायला मिळाल्या आहेत. स्त्री-पुरुष समानतेसोबतच LGBTQ व्यक्तींना देखील समान वागणूक आणि व्यक्ती म्हणून सन्मान मिळावा, यासाठी अनेक सामाजिक संघटना देखील काम करत आहेत. समाजाच्या मुख्य प्रवाहात त्यांना सामावून घेण्यासाठी प्रयत्न होताना दिसत असताना आता एका मानसोपचार तज्ज्ञानंच केलेल्या वादग्रस्त विधानामुळे खळबळ उडाली आहे. “समलैंगिकता हा एक आजार आहे, मी त्यावर उपचार करून …

Read More »

आणखी तीन वाघांना पकडण्यासाठी पथक तैनात

ऊर्जानगर, दुर्गापुरात कडकडीत बंद, मोर्चा; भटारकर यांच्या उपोषणाची सांगता चंद्रपूर : महाऔष्णिक वीज केंद्रातील एका वाघाला बेशुद्धीकरणाचे इंजेक्शन देऊन जेरबंद करण्यात सोमवारी रात्री उशिरा वन खात्याला यश आले. जेरबंद वाघाला गोरेवाडा नागपूर येथे स्थलांतरित करण्यात येणार आहे. दरम्यान, वीज केंद्र परिसरात भ्रमण करणाऱ्या एक मादी व दोन नर अशा ३ वाघांना पकडण्याची मोहीम वन खात्याच्या वतीने सुरू आहे. तर एक …

Read More »

जादूटोण्याच्या संशयावरून दाम्पत्यावर जीवघेणा हल्ला ; घरही पेटवून दिले; उमरखेड तालुक्यातील घटना

यवतमाळ : उमरखेड तालुक्यातील तरोडा येथील एका दाम्पत्यावर ते जादूटोणा करीत असल्याच्या संशयावरून जीवघेणा हल्ला करून त्यांचे घर पेटवून देण्यात आले. ही घटना सोमवारी रात्री घडली. विनायक भोरे व त्यांची पत्नी उर्मिला भोरे असे या हल्ल्यात जखमी झालेल्या दाम्पत्याचे नाव आहे. तरोडा येथे भोरे दाम्पत्य वास्तव्यास आहे. सोमवारी रात्री हे दाम्पत्य घरात असताना सहा ते सात जण तोंडावर कापड बांधून …

Read More »

२५ फेब्रुवारीला ओबीसी आरक्षणाचा फैसला होणार; राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर!

ओबीसी आरक्षणावर येत्या २५ फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असून स्थानिक निवडणुकांचं भवितव्य ठरणार आहे. राज्यातील ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून बराच खल सध्या सुरू असताना आता थेट सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाचा फैसला होणार आहे. येत्या २५ फेब्रुवारी रोजी ओबीसी समाजासाठी राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असून त्यावर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं भवितव्य अवलंबून असेल. ओबीसी आरक्षणाशिवाय राज्यातील …

Read More »

चारीमुंड्या चीत केल्याशिवाय नाव लावणार नाही म्हणणाऱ्या गुलाबराव पाटलांना खडसेंनी दिलं उत्तर; म्हणाले “तुमच्या नावाची…”

जो शक्तिमान असतो त्याच्याविरोधातच सगळे एकत्र येतात; एकनाथ खडसेंचा टोला जळगाव जिल्ह्याचे राजकारण सध्या चांगलंच तापलं आहे. एकनाथ खडसे, गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांच्या निमित्ताने सध्या राष्ट्रवादी, भाजपा आणि शिवसेना आमने-सामने आले आहेत. तिन्ही नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. नुकतंच एकनाथ खडसे यांनी शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे राष्ट्रवादी …

Read More »

सोलापुरातील राजकीय प्रवेशाची राज्यात चर्चा; रात्री १२ वाजता भाजपा नेत्याचा जयंत पाटलांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश

सोलापुरात नुकतंच एका भाजपा नेत्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र या राजकीय प्रवेशाची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. याचं कारण म्हणजे रात्री १२ वाजता हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. पक्षप्रवेश करण्यासाठी या भाजपा नेत्याला तब्बल पाच तास वाट पहावी लागली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. आगामी सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सोलापूर भाजपाचे शहर सरचिटणीस …

Read More »

“मत खाण्याच्या राजकारणाने दलित समाजाचं भलं होणार नाही, प्रकाश आंबेडकरांनी…”; रामदास आठवलेंचं मोठं वक्तव्य

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दलित पँथरचा उल्लेख करतानाच थेट प्रकाश आंबेडकरांचंही नाव घेतलं. रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सोमवारी औरंगाबादमध्ये रिपब्लिक ऐक्याचा पुन्हा एकदा उल्लेख केला. उत्तर प्रदेशमध्ये भाजपाची सत्ता येईल असा विश्वास व्यक्त करतानाच आमचा भाजपाला पाठिंबा असल्याने आम्ही उमेदवार उभे केले नाहीत असं आठवले यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं. याचवेळी त्यांनी दलित मतांसंदर्भात …

Read More »

“सरकार पाडण्याचा आमचा मानस नाही, त्यामुळे…”; संजय राऊतांचा उल्लेख करत आठवलेंचा टोला

रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सोमवारी औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यामध्ये महाविकास आघाडीवर कठोर शब्दांमध्ये टीका केली. येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी महाविकास आघाडीवर टीका करता प्रशासनाचं मॅनेजमेंट करण्यापेक्षा महाविकास आगाडी एकमेकांना मॅनेज करण्यात व्यस्त असल्याचा टोला आठवलेंनी लगावला. “हे सरकार प्रशासनाचं मॅनेजमेंट चांगलं करण्यापेक्षा एकमेकांना मॅनेज करण्यात व्यस्त आहे. सरकारकडून विकास कामांबाबत योग्य आढावा घेतला जात …

Read More »

मराठीच्या अभिजात दर्जासाठीचा राजकीय स्टंट; संजय राऊतांच्या भाषेमुळे महाराष्ट्र होतोय बदनाम – विनोद तावडे

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणं हे मराठी भाषेचं क्रेडिट असेल, असंही ते म्हणाले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना राज्य सरकारने चार हजार पोस्टकार्ड पाठवली. याबद्दल भाजपा नेते विनोद तावडे यांनी सरकारला खोचक टोला लगावला आहे. २७ फेब्रुवारी जवळ आल्यावर मराठी भाषा …

Read More »

नारायण राणेंना मोदी सरकारचा दणका; चिवला बीचवरील निलरत्न बंगल्यावर पडणार हातोडा? कारवाईचा आदेश

बंगला बांधताना सीआरझेड कायद्याचे उल्लंघन झाल्याची तक्रार राज्यात सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात असताना भाजपाकडून किरीट सोमय्यांसोबत नारायण राणेही आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. दरम्यान एकीकडे मुंबईत नारायण राणेंच्या घरावर मुंबई महापालिका कारवाई करण्याची तयारी करत असल्याने भाजपा नेत्यांकडून टीका केली जात असताना आणखी एक मोठी घडामोड समोर आली आहे. नारायण राणेंना थेट केंद्र सरकारने दणका दिला …

Read More »

“सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन आघाडी केल्यास एनडीएला….;” उद्धव ठाकरे आणि केसीआर भेटीवर रामदास आठवलेंची प्रतिक्रिया

देशात सुरू असलेल्या तिसऱ्या आघाडीच्या तयारीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निमंत्रणावरून तेलंगणचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी मुंबईत ठाकरे यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. याशिवाय राव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीही त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. राव यांनी सध्या भाजपाच्या विरोधात आघाडी उघडली असून, बिगरभाजपा आणि काँग्रेस आघाडीचे नेतृत्व …

Read More »

तृतीयपंथीयांनी सन्मानाने जगण्यासाठी पोलीस आयुक्त हरीश बैजल यांचे पाऊल; पेट्रोल पंपावर दिली नोकरीची संधी

सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयामार्फत कार्यरत असलेल्या अशोक चौकातील पेट्रोल पंपावर दोन तर सहायक पोलीस आयुक्त (विभाग १) यांच्या कार्यालयात एक अशा तीन तृतीयपंथीयांना पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी नोकरीत रूजू करून घेतले आहे. या निमित्ताने बैजल यांनी तृतीयपंथीयांना सन्मानाने जीवन जगण्याची संधी देत आपण त्यांच्याबरोबर आहोत, असा संदेश दिला आहे. पोलीस आयुक्त बैजल हे गेल्या आॕक्टोबरमध्ये शहरात रूजू झाल्यापासून दैनंदिन …

Read More »

“…तर भविष्यात गंभीर प्रश्न निर्माण होतील”; पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी व्यक्त केली चिंता

तापमान वाढ ही जागतिक समस्या निर्माण झाली असून यामुळे अवेळी पाऊस, गारपीट, दुष्काळ, ढगफुटी इत्यादी घटना वारंवार पाहायला मिळत आहेत. तापमान वाढीवर वेळीच नियंत्रण मिळवले नाही तर भविष्यात गंभीर प्रश्न निर्माण होतील, अशी चिंता राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. वाहतुकीची साधने कमी प्रमाणात वापरणे किंबहुना सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणे, इलेक्ट्रिकल वाहने वापरणे, सोलर एनर्जी, गोबर गॅसचा …

Read More »

VIDEO : आश्रमात गायिकांवर लाखो रुपयांची उधळण; सामाजिक कार्यासाठी पैसे वापरत असल्याची आयोजकांची माहिती

या कार्यक्रमासाठी परवानगी दिली नव्हती असे पोलिसांनी म्हटले आहे. विरारमधील एका आश्रमशाळेत झालेला ‘डायरो’ हा धार्मिक कार्यक्रम वादात सापडला आहे. या कार्यक्रमात पहाटेपर्यंत गायिकांवर लाखो रुपये उधळल्याची व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. आयोजकांनी मात्र हा आरोप फेटाळताना डायरो हा पारंपरिक कार्यक्रम असून गोशाळेच्या निधीसंकलनासाठी पोलिसांच्या परवानगीनेच तो आयोजित केला होता,असे म्हटले आहे. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी चौकशी करून नियमांचे …

Read More »