Tag Archives: BJP

मणिपूरमध्ये भारतमातेची हत्या झाली आहे, राहुल गांधी संतापले; लोकसभेत अभुतपूर्व गदारोळ

Rahul Gandhi in Lok Sabha: लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरु असून, राहुल गांधी (Rahul Gandhi) आज या चर्चेत सहभागी झाले. सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) पुन्हा एकदा खासदारकी बहाल केल्यानंतर राहुल गांधी सभागृहात दाखल झाले. राहुल गांधी यांनी यावेळी केंद्र सरकारवर टीका केली. तसंच भारत जोडो यात्रेतील अनुभव सांगितले. दरम्यान, भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी आज आपण अदानीवर बोलणार नाही असा टोला त्यांनी …

Read More »

Narayan Rane: तुमची ‘औकात’ काढेल म्हणणाऱ्या राणेंचा Video व्हायरल; प्रियंका चतुर्वेदींचा जोरदार हल्लाबोल!

Narayan Rane On Arvind Sawant: लोकसभेत मोदी सरकारविरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावावरुन (No Confidence Motion) जोरदार घमासान पहायला मिळालं. चर्चा सुरू असताना महाराष्ट्राचे दोन खासदारांच्या हमरीतुमरी पहायला मिळाली. केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांचं राज्यसभेत रौद्ररूप पाहायला मिळालं. विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना नारायण राणे चांगलेच बरसले. त्यावेळी त्यांनी शिवसेना खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांना चांगलंच फटकारलं. औकात शब्दांचा उल्लेख …

Read More »

PM Modi Pune Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यातून पुणेकरांना काय मिळणार? वाचा तुमच्या फायद्याची गोष्ट!

PM Narendra Modi Pune Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या म्हणजे 1 ऑगस्ट रोजी पुणे दौऱ्यावर (Narendra Modi In Pune) येणार आहेत. पंतप्रधानांचा हा दौरा पुणेकरांसाठी महत्त्वाचा असेल. विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटनक्रम आणि मेट्रोला (Pune Metro) हिरवा कंदिल देखील मोदींच्या हस्ते दाखवण्यात येणार आहे. त्याचबरोबर लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टतर्फे देण्यात येणारा ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ यंदा (Lokmanya tilak award 2023) पंतप्रधान …

Read More »

Maharastra Politics: ‘राज ठाकरे महायुतीत येणार नसतील तर…’; सुधीर मुनगंटीवार यांची सडकून टीका!

MNS Chief Raj Thackeray: सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघाल्याचं पहायला मिळतंय. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर (Maharastra Politics) मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी चांगलेच आसूड ओढले. पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना राज ठाकरे यांनी भाजपशी युती करण्याच्या शक्यतेला राज ठाकरे यांनी केराची टोपली दाखवली. त्यावर आता भाजप नेते आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) …

Read More »

टोलची तोडफोड केल्याने अमित ठाकरेंवर टीका करणाऱ्या भाजपाला राज ठाकरेंचं सडेतोड उत्तर, म्हणाले “हे बोलण्यापेक्षा…”

Raj Thackeray on BJP: अमित ठाकरे (Amit Thackeray) यांना अडवण्यात आल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी समृद्धी महामार्गावरील (Samruddhi Highway) टोलनाक्याची तोडफोड केली. यानंतर भाजपाने (BJP) अमित ठाकरेंवर टीका केली आहे. टोलनाका फोडणं राजकारण नाही, कधीतरी बांधायलाही शिका अशी टीका भाजपाने केली आहे. त्यातच आता राज ठाकरेंनीच त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरेंनी भाजपावर जोरदार टीका केली. तसंच …

Read More »

‘जर मुलगी झाला तर…’, जन्माआधीच ठरलं होतं पंकजा मुंडेंचं नाव, पण वडिलांची इच्छा अपूर्णच

Pankaja Munde Birthday: भाजपा नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा आज वाढदिवस आहे. दिवंगत भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे यांना पक्षातील दिग्गज नेत्यांमध्ये स्थान आहे. त्यांचे कार्यकर्ते तर त्यांच्याकडे राज्याच्या भावी मुख्यमंत्री म्हणून पाहतात. एमबीए केलेल्या पंकजा लग्न झाल्यानंतर कुटुंबात व्यस्त होत्या. त्यानंतर मुलगा झाल्यानंतर त्या राजकारणात पुन्हा परतल्या. वडिलांच्या निधनानंतर पंकजा मुंडे यांच्यासाठी राजकीय प्रवास तसा …

Read More »

‘हिंमत असेल तर…’; टोलनाका फोडल्यावरुन अमित ठाकरेंना भाजपाचं चॅलेंज! म्हणाले, ‘कोणत्याही…’

BJP Slams Amit Thackeray: भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरेंवर कठोर शब्दांमध्ये निशाणा साधला आहे. सिन्नरमधील टोलनाक्यावर अमित ठाकरेंची कार थांबवल्याने टोलनाका फोडल्याच्या विषयावरुन भाजपाने टीका केली आहे. भाजपाने संपूर्ण घटनाक्रमाचा व्हिडीओ पोस्ट करत, “कोणा एका नेत्यासाठी किंवा त्याच्या मुलासाठी इथे वेगळे नियम पाळले जाणार नाहीत,” असं म्हणत अमित ठाकरेंना लक्ष्य केलं आहे. दादागिरी …

Read More »

Kirit Somaiya: मराठी भगिनींचे ब्लॅकमेलिंग, 8 तासांच्या क्लिप; अंबादास दानवेंचे खळबळजनक आरोप

Kirit Somaiya: किरीट सोमय्यांच्या कथित व्हायरल व्हिडीओवरुन विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे आक्रमक झाले आहेत. त्यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत. माझ्याकडे 8 तासांच्या क्लिप असून त्या सभापतींना पाठवणार आहे. यामध्ये मराठी भगिनींचं एक्स्टॉर्शन झाले आहे, असा आरोप दानवे यांनी केला आहे.  किरीट सोमय्या यांची केंद्राने दिलेली सुरक्षा काढून घ्यावी अशी मागणी आमदार अनिल परब यांनी …

Read More »

आदित्य ठाकरेंमुळेच 2014 मध्ये शिवसेना-भाजपा युतीत मिठाचा खडा; आशिष शेलारांचा मोठा खुलासा

Ashish Shelar Black and White: महाराष्ट्रात सध्या जे काही सुरु आहे त्याची सुरुवात उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेनेने केली असा आरोप भाजपा नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केला आहे. तसंच सध्याचं राजकारण परिस्थितीला अनुसरून योग्य आहे असंही ते म्हणाले आहे. याशिवाय अजित पवार (Ajit Pawar) यांना सत्तेत घेणं हा कृष्णनितीचा भाग असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. ‘झी 24 तास’च्या ‘Black …

Read More »

किरीट सोमय्यांचे उपमुख्यमंत्र्यांना पत्र, व्हायरल व्हिडीओच्या चौकशीची केली मागणी

Kirit Somaiya: भाजप नेते  सोशल मीडियात व्हायरल होणाऱ्या कथित व्हिडीओप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या आक्रमक झाले आहेत. त्यांनी यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना पत्र लिहिले आहे.  मराठी वृत्तवाहिनीवर माझी व्हिडिओ क्लिप प्रदर्शित करण्यात आली, अशाप्रकारच्या अनेक व्हिडिओ क्लिप्स उपलब्ध आहेत, असेही सांगण्यात आले आहे. मी अनेक महिलांवर अत्याचार केले, अनेक महिलांच्या तक्रारी आल्या आहेत असेही …

Read More »

दिल्लीच्या पुरामागे मोठे षडयंत्र; ‘आप’चा भाजपवर गंभीर आरोप

Delhi Flood : यमुना नदीची (yamuna river) पाणी पातळी वाढल्याने संपूर्ण दिल्ली पाण्याखाली गेली आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून राजधानी दिल्लीतील अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत. पुराचे पाणी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रवेशद्वारापर्यंत (supreme court) पोहोचले. वर्दळीचा आयटीओ परिसर तसेच राजघाटही जलमय झाला आहे. अशातच दिल्लीत राजकारण सुरु झालं आहे. दिल्ली सरकारमधील मंत्री आणि आम आदमी पक्षाचे (AAP) नेते सौरभ भारद्वाज …

Read More »

बिहारमध्ये पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये भाजपा नेत्याचा मृत्यू

बिहार विधानसभेत (Bihar Assembly) गोंधळ घातल्यानंतर आंदोलनसाठी बाहेर पडलेल्या भाजपा (BJP) नेत्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. या गोंधळात एका भाजपा नेत्याचा मृत्यू झाला आहे. पाटण्याच्या डाकबंगला येथे पोलिसांनी बळाचा वापर केल्याचं भाजपा नेत्यांचं म्हणणं आहे. पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये जहानाबाद नगर येथील भाजपाचे महामंत्री विजय कुमार सिंह (Vijay Kumar Singh) यांचा मृत्यू झाला आहे.  बिहारमध्ये (Bihar) शिक्षकांच्या नियुक्तीवरुन भाजपाकडून आंदोलन केलं जात …

Read More »

उद्धव ठाकरेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; ‘कलंक’ टिकेवरुन फडणवीसांचं टीकास्त्र, म्हणाले “फारच विपरित…”

Devendra Fadnavis on Uddhav: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका करताना ‘कलंक’ शब्दाचा वापर केल्याने भाजपा नेत्यांकडून जोरदार हल्लाबोल केला जात आहे. देवेंद्र फडणवीस नागपूरला लागलेला कलंक आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. दरम्यान आता देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरेंची मानसिक स्थिती योग्य नाही असा टोला त्यांनी लगावला आहे.  “मला या …

Read More »

काजोलचे काय चुकले? मोदींच्या शिक्षणाचा उल्लेख करत ठाकरे गटाचा सवाल; म्हणाले, “धर्माचा गांजा..”

Thackeray Group Slams Modi Supporters Over Kajol Comment: अभिनेत्री काजोलने (Kajol) देशातील राजकीय नेत्यांच्या शिक्षणासंदर्भात केलेल्या विधानावरुन (uneducated political leaders comment) रान उठलेलं असतानाच उद्धव ठाकरे गटाने काजोलची बाजू घेतली आहे. थेट पंतप्रधान मोदींच्या शैक्षणिक पात्रतेचा उल्लेख करत ठाकरे गटाने “काजोल महाराष्ट्र कन्या असल्याने परखडपणा तिच्या स्वभावात असणारच,” असं म्हणत ती बोलली त्यात चुकले काय?” असा सवाल या विषयावरुन टीका …

Read More »

‘फडणवीस नागपूरला कलंक’ उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, तर पलटवार करत फडणवीस म्हणाले…

Uddhav Thackeray vs Devendra Fadanvis : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर होते.  आज अमरवातीत (Amaravati) झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावर जहरी टीका केली. सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही, अशी देवेंद्र फडणवीसांची अवस्था आहे. ते नागपूरला कलंक आहेत, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांवर हल्लाबोल …

Read More »

मध्यप्रदेश लघुशंका प्रकरणातील पीडित तरुणाने अखेर दिली प्रतिक्रिया; म्हणाला “ज्याने चूक केली, त्याला…”

Madhya Pradesh Urination Case: सिधी लघुशंका प्रकरणावरुन मध्य प्रदेश सरकारवर (Madhya radesh Government) सध्या जोरदार टीका केली जात आहे. याप्रकरणी सरकार सध्या डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत आहे. दुसरीकडे, पीडित दशरम रावत (Dashram Ravat) याने यावर प्रतिक्रिया दिली आहे. आपली बाजू मांडताना त्याने सांगितलं आहे की, ही घटना 2020 मधील आहे. त्यावेळी मी दुकानाबाहेर बसलो होते. तेव्हा आरोपी प्रवेश शुक्ला …

Read More »

Maharashtra Politics: नितीन गडकरी स्पष्टच म्हणाले, ‘मंत्री बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना हे माहिती नाही की….’

Maharashtra Politics: महाराष्ट्रात काका-पुतण्यातील वादानंतर राष्ट्रवादीत उभी फूट पडली. गेल्यावर्षी शिवसेनेत बंड झाल्यानंतर ही दुसरी धक्कादायक घटना राज्याच्या राजकारणात घडली. प्रभावी विरोधी पक्षनेते अशी ओळख असलेले अजित पवार राष्ट्रवादी पक्षासह भाजप-शिवसेनेच्या सत्तेत वाटेकरी बनले आहेत. राष्ट्रवादीच्या आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर अनेक आमदारांना मंत्री होण्याचे वेध लागले आहेत. या सर्व घटनेवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट भाष्य केलं आहे.  …

Read More »

“पत्नीशिवाय पंतप्रधानांनी राहू नये”; लालू प्रसाद यादव यांचा खोचक टोला; पण रोख कुणाकडे?

Lalu Prasad Yadav : 23 जून रोजी विरोधी पक्षांच्या (Opposition Meeting) सर्वसाधारण बैठकीनंतर राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) फुल फॉर्ममध्ये आहेत. 23 जूनच्या सर्वसाधारण बैठकीनंतर लालूप्रसाद यादव यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेतली आहे. त्यानंतर लालूप्रसाद यादव यांनी राजदच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींवर (PM Modi) निशाणा साधला आहे. आता मी फिट …

Read More »

Video: ‘ज्याचा पैसा त्याची सत्ता’; कवीवर्य विंदा करंदीकर यांचे शब्द सध्याच्या राजकीय धुमश्चक्रीवर करतायेत मार्मिक भाष्य

Maharashtra Political Crisis : साधारण वर्षभरापूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात एक वादळ आलं. मुळात याआधीही अशी लहामोठी वादळं आली होती. पण, मागील वर्षी शिवसेनेत बंड करत शिंदे गट वेगळा झाला आणि त्यांनी भाजपशी हातमिळवणी करत सत्ताही स्थापन केली. या सत्तानाट्याला एक वर्ष पूर्ण होत नाही, तोच आणखी एका राजकीय धुमश्चक्रीनं राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघालं. यावेळी हे वादळ आलेलं राष्ट्रवादीमध्ये.  अजित पवारांचं …

Read More »

Praful Patel: भाजपसोबत जाण्याचा निर्णय कधी झाला? प्रफुल्ल पटेल यांचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले…

Praful Patel Interview: अजित पवार (Ajit Pawar) यांनी शरद पवार यांच्याविरुद्ध दंड थोपटले आणि राष्ट्रवादीमध्ये (NCP) मोठी फूट पडल्याचं पहायला मिळालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी पक्षातील बंडखोरीनंतर अजित पवारांसह 9 आमदारांना अपात्र करण्याचं पत्र विधानसभा अध्यक्षांकडे दिलंय. अशातच आता अजित पवार यांच्या बाजूने उभे राहिलेल्या प्रफुल्ल पटेल यांनी झी 24 तासला दिलेल्या ब्लॉक अँड व्हाईटमध्ये …

Read More »