Kirit Somaiya: मराठी भगिनींचे ब्लॅकमेलिंग, 8 तासांच्या क्लिप; अंबादास दानवेंचे खळबळजनक आरोप

Kirit Somaiya: किरीट सोमय्यांच्या कथित व्हायरल व्हिडीओवरुन विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे आक्रमक झाले आहेत. त्यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत. माझ्याकडे 8 तासांच्या क्लिप असून त्या सभापतींना पाठवणार आहे. यामध्ये मराठी भगिनींचं एक्स्टॉर्शन झाले आहे, असा आरोप दानवे यांनी केला आहे. 

किरीट सोमय्या यांची केंद्राने दिलेली सुरक्षा काढून घ्यावी अशी मागणी आमदार अनिल परब यांनी केली आहे.

दरम्यान या प्रकरणाची सखोल आणि वरिष्ठ स्तरावर चौकशी केली जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तक्रारी आल्या असतील तर तशी माहिती द्या, पोलीस त्याच्यावर योग्य ती कार्यवाही करतील, असे फडणवीस म्हणाले. 

भाजप नेते  सोशल मीडियात व्हायरल होणाऱ्या कथित व्हिडीओप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या आक्रमक झाले आहेत. त्यांनी यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना पत्र लिहिले आहे. मराठी वृत्तवाहिनीवर माझी व्हिडिओ क्लिप प्रदर्शित करण्यात आली, अशाप्रकारच्या अनेक व्हिडिओ क्लिप्स उपलब्ध आहेत, असेही सांगण्यात आले आहे. मी अनेक महिलांवर अत्याचार केले, अनेक महिलांच्या तक्रारी आल्या आहेत असेही दावे केले जात आहेत. असे या पत्रात लिहिले आहे.

हेही वाचा :  राहुल गांधींनी संसदेतून जाताना फ्लाईंग किस केल्याचा स्मृती इराणींचा आरोप... महिला खासदार करणार तक्रार

माझ्याकडून कोणत्याही महिलेवर असा अत्याचार झालेला नाही असे किरीट सोमय्या यांनी पत्रात लिहिले आहे. अशा सर्व आरोपांची व्हिडिओ क्लिप/क्लिप्स सत्यता तपासावी, चौकशीही करावी, अशी विनंती किरीट सोमय्या यांनी केली आहे. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, देशातील ‘या’ बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Loksabha Election 2024 : तिसऱ्या टप्प्यात म्हणजे 7 मे रोजी देशात 93 जागांवर मतदान होणार …

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …