Tag Archives: BJP

‘फडणवीस नागपूरला कलंक’ उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, तर पलटवार करत फडणवीस म्हणाले…

Uddhav Thackeray vs Devendra Fadanvis : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर होते.  आज अमरवातीत (Amaravati) झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावर जहरी टीका केली. सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही, अशी देवेंद्र फडणवीसांची अवस्था आहे. ते नागपूरला कलंक आहेत, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांवर हल्लाबोल …

Read More »

मध्यप्रदेश लघुशंका प्रकरणातील पीडित तरुणाने अखेर दिली प्रतिक्रिया; म्हणाला “ज्याने चूक केली, त्याला…”

Madhya Pradesh Urination Case: सिधी लघुशंका प्रकरणावरुन मध्य प्रदेश सरकारवर (Madhya radesh Government) सध्या जोरदार टीका केली जात आहे. याप्रकरणी सरकार सध्या डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत आहे. दुसरीकडे, पीडित दशरम रावत (Dashram Ravat) याने यावर प्रतिक्रिया दिली आहे. आपली बाजू मांडताना त्याने सांगितलं आहे की, ही घटना 2020 मधील आहे. त्यावेळी मी दुकानाबाहेर बसलो होते. तेव्हा आरोपी प्रवेश शुक्ला …

Read More »

Maharashtra Politics: नितीन गडकरी स्पष्टच म्हणाले, ‘मंत्री बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना हे माहिती नाही की….’

Maharashtra Politics: महाराष्ट्रात काका-पुतण्यातील वादानंतर राष्ट्रवादीत उभी फूट पडली. गेल्यावर्षी शिवसेनेत बंड झाल्यानंतर ही दुसरी धक्कादायक घटना राज्याच्या राजकारणात घडली. प्रभावी विरोधी पक्षनेते अशी ओळख असलेले अजित पवार राष्ट्रवादी पक्षासह भाजप-शिवसेनेच्या सत्तेत वाटेकरी बनले आहेत. राष्ट्रवादीच्या आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर अनेक आमदारांना मंत्री होण्याचे वेध लागले आहेत. या सर्व घटनेवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट भाष्य केलं आहे.  …

Read More »

“पत्नीशिवाय पंतप्रधानांनी राहू नये”; लालू प्रसाद यादव यांचा खोचक टोला; पण रोख कुणाकडे?

Lalu Prasad Yadav : 23 जून रोजी विरोधी पक्षांच्या (Opposition Meeting) सर्वसाधारण बैठकीनंतर राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) फुल फॉर्ममध्ये आहेत. 23 जूनच्या सर्वसाधारण बैठकीनंतर लालूप्रसाद यादव यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेतली आहे. त्यानंतर लालूप्रसाद यादव यांनी राजदच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींवर (PM Modi) निशाणा साधला आहे. आता मी फिट …

Read More »

Video: ‘ज्याचा पैसा त्याची सत्ता’; कवीवर्य विंदा करंदीकर यांचे शब्द सध्याच्या राजकीय धुमश्चक्रीवर करतायेत मार्मिक भाष्य

Maharashtra Political Crisis : साधारण वर्षभरापूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात एक वादळ आलं. मुळात याआधीही अशी लहामोठी वादळं आली होती. पण, मागील वर्षी शिवसेनेत बंड करत शिंदे गट वेगळा झाला आणि त्यांनी भाजपशी हातमिळवणी करत सत्ताही स्थापन केली. या सत्तानाट्याला एक वर्ष पूर्ण होत नाही, तोच आणखी एका राजकीय धुमश्चक्रीनं राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघालं. यावेळी हे वादळ आलेलं राष्ट्रवादीमध्ये.  अजित पवारांचं …

Read More »

Praful Patel: भाजपसोबत जाण्याचा निर्णय कधी झाला? प्रफुल्ल पटेल यांचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले…

Praful Patel Interview: अजित पवार (Ajit Pawar) यांनी शरद पवार यांच्याविरुद्ध दंड थोपटले आणि राष्ट्रवादीमध्ये (NCP) मोठी फूट पडल्याचं पहायला मिळालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी पक्षातील बंडखोरीनंतर अजित पवारांसह 9 आमदारांना अपात्र करण्याचं पत्र विधानसभा अध्यक्षांकडे दिलंय. अशातच आता अजित पवार यांच्या बाजूने उभे राहिलेल्या प्रफुल्ल पटेल यांनी झी 24 तासला दिलेल्या ब्लॉक अँड व्हाईटमध्ये …

Read More »

“आता फडणवीस कोणत्या तोंडाने राष्ट्रवादीच्या…”; राजकीय भूकंपानंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

Maharashtra Political Crisis : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. राष्ट्रवादीच्या (NCP) आमदारांना सोबत घेत अजित पवार यांनी राज्यातील शिंदे फडणवीस सरकारला (Shinde Fadnavis Government) पाठिंबा दिला आहे. विरोधकांकडून आता अजित पवार यांच्या या निर्णयावर टीका केली जात आहे. महाराष्ट्र काँग्रेसनेही (Congress) याबाबत आपली पहिली प्रतिक्रिया दिली …

Read More »

समान नागरी कायद्याला ठाकरे गटाचा पाठिंबा? संजय राऊत स्पष्टच बोलले, म्हणाले “हिंदू, मुस्लीम….”

Sanjay Raut on Uniform Civil Code: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पुन्हा एकदा समान नागरी कायद्यावर (Uniform Civil Code) जोर दिला असल्याने चर्चेला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी शुक्रवारी आपली भूमिका मांडल्यानंतर आता ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनीही पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी मध्य …

Read More »

सत्तेसाठी हापापलेले म्हणणाऱ्या शरद पवारांना फडणवीसांनी दिलं उत्तर, म्हणाले “आपल्याच पुतण्याची विकेट….”

Devendra Fadnavis on Sharad Pawar: पहाटेच्या शपथविधीवरुन सध्या शरद पवार (Sharad Pawar) आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये (Devendra Fadnavis) कलगीतुरा रंगला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीसंबंधी गौप्यस्फोट केल्यानंतर शरद पवार यांनी उत्तर देताना फडणवीस माझ्या गुगलीवर बाद झाले असा टोला लगावला आहे. त्यावर आता फडणवीसांनीही प्रत्युत्तर दिलं असून माझ्यामुळे त्यांच्या तोंडी अर्ध सत्य आलं असून, उर्वरितही लवकर बोलायला लावू असा इशारा …

Read More »

“माझ्या गुगलीवर फडणवीस बाद झाले”, पहाटेच्या शपथविधीवर शरद पवार थेट बोलले

Sharad Pawar on Morning Oath Ceremony: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  (Devendra Fadnavis) यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत नुकताच मोठा गौप्यस्फोट केला आहे. शरद पवारांना (Sharad Pawar) पहाटेच्या शपथविधीची कल्पना होती आणि त्यांनी ऐनवेळी माघार घेतली असा फडणवीसांचा दावा आहे. दरम्यान, आता शरद पवार यांनी त्यांच्या दाव्यावर भाष्य केलं आहे. ते मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. मी क्रिकेटचा अध्यक्ष होतो. त्यामुळे क्रिकेट खेळत नसलो तरी …

Read More »

आदित्य ठाकरेंच्या कारला दुचाकीने ठोकल्यानंतर नितेश राणेंचा गंभीर आरोप, म्हणाले “राऊतांप्रमाणे बनाव…”

Nitesh Rane on Aditya Thackeray: ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या कारला दुचाकीने धडक दिल्यानंतर भाजपा नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी गंभीर आरोप केला आहे. आपली सुरक्षा वाढवण्यासाठी आदित्य ठाकरेंचा प्रयत्न तर नाही ना? याची चौकशी पोलिसांनी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. सिंधुदूर्गात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला.   “आजच्या …

Read More »

“पवारांबरोबरच्या बैठकीत BJP आणि NCP चं सरकार स्थापन करण्याचं ठरलं, पण…”; पहाटेच्या शपथविधीवर फडणवीसांचा गौप्यस्फोट

Pawar Agreed To Form Government Then Backed Off: महाराष्ट्रातील 2019 च्या विधानसभा निवडणुकींनंतरच्या अभुतपूर्व सत्तासंघर्षादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) आणि भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अचानक पहाटेच्या वेळी राजभवनात उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याने एकच खळबळ उडाली होती. याच पहाटेच्या शपथविधीसंदर्भात आता विद्यमान उपमुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी नवीन खुलासा केला आहे. हा …

Read More »

तीची ओवाळणी आणि देवेंद्र फडणवीसांच्या डोळ्यात पाणी! टिळा लावला पण तो ही…

जळगाव : राज्याचे उपमु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे आज जळगाव (Jalgaon) जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी जळगावमधल्या दिव्यांग शाळेला भेट दिली. यावेळी त्यांचं अनोख्या पद्धतीन औक्षण करण्यात आलं. उपमुख्यमंत्री फडणवीसांना एका दिव्यांग मुलीनं पायानं टिळा लावला. तसंच पायानं ताट धरत त्यांचं औक्षणही केलं. त्यानंतर फडणवीसांनी शाळेची पाहणी करुन तिथल्या मुलांशी संवादही साधला. या अनुभवाने देवेंद्र फडणवीस यांच्या डोळ्यातही पाणी …

Read More »

Maharastra Politics: ‘…मग एकनाथ शिंदेंनी गद्दारी कशी काय केली?’, फडणवीसांचा शरद पवारांना टोला!

Devendra fadanvis On Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात सध्या आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळत आहे. दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर टोलेबाजी केल्याचं दिसतंय. अशातच आता देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना प्रत्युत्तर दिल्याचं पहायला मिळतंय. शरद पवारांनी केली ती मुसद्देगिरी मग शिंदेंची बेईमानी कशी? असा सवाल शरद पवार यांनी विचारला आहे. त्यावेळी त्यांनी देश महात्मा गांधी …

Read More »

“एका फोटो सेशननेच भाजपाच्या 100 जागा कमी”; ‘फोटो सेशन’ म्हणत हिणवणाऱ्या शाहांना टोला

Thackeray Group Slams BJP: सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात एकत्र आलेल्या 17 पक्षांमुळे (Opposition Parties Meet) सत्ताधाऱ्यांना भीती वाटत असल्याचा दावा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गटाने केला आहे. तसेच विरोधी पक्षांची बैठक ही केवळ फोटो सेशनसाठी झाल्याची टीका करणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या विधानाचा समाचार घेताना पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Modi) टोला लगावण्यात आला आहे. तसेच …

Read More »

“देवेंद्रजी कुटुंब तुम्हालाही आहे हे लक्षात ठेवा, अन्यथा नुसतं शवासन…”; उद्धव ठाकरेंची जाहीर धमकी

Uddhav Thackeray on Fadnavis: देंवेद्रजी तुमचाही परिवार आहे. परिवारावर बोलू नका. काही व्हॅाटसअप चॅट बाहेर येत आहेत. मी त्यावर बोलणार नाही. अनेक गोष्टी आमच्याकडेही आहेत अशा शब्दांत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना इशारा दिला आहे.  मुंबईतील पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली आहे. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी कोविड सेंटर घोटाळा प्रकरणी सुरु …

Read More »

“आम्ही सर्व एकत्र मिळून भाजपला हरवणार”; पाटण्यातून राहुल गांधींचा सत्ताधाऱ्यांना इशारा

Patna Opposition Unity Meeting : 2024 च्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) भाजपविरोधात (BJP) जोरदार मोर्चेबांधणी करण्यासाठी पाटण्यात (Patna) पहिल्यांदाच विरोधी पक्ष जोरदार मोर्चेबांधणी करणार आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi), राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी, सपा प्रमुख अखिलेश यादव, उद्धव ठाकरे, संजय राऊत हे या बैठकीला उपस्थित राहणार आहे. …

Read More »

ठाकरेंच्या निकटवर्तीयाच्या घरी ED ने धाड टाकल्यानंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “ज्यांचे संबंध…”

Devendra Fadnavis on ED Raid: कोव्हिड सेंटर कथित घोटाळा (Covid Centre Scam) प्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने (Enforcement Directorate) आज 10 ठिकाणी छापेमारी केली आहे. यामध्ये ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण (Sooraj Chavan) यांचाही समावेश आहे. दरम्यान यावर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भाष्य केलं आहे. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी कोणताही अनुभव नसणाऱ्या कंपन्या तयार …

Read More »

गडकरींना मिळाली होती काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची ऑफर; उत्तर देत म्हणाले होते “तुमच्या पक्षात येण्यापेक्षा…”

Nitin Gadkari on Congress: भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी काँग्रेस (Congress) पक्षासंबंधी एक मोठं विधान केलं आहे. काँग्रेसच्या एका नेत्याने आपल्याला त्यांच्या पक्षात प्रवेश करण्याची ऑफर दिली होती असा खुलासा त्यांनी केला आहे. पण त्यांनी ही ऑफर स्वीकारण्यास नकार दिला होता. काँग्रेसचा सदस्य होण्याऐवजी मी विहिरीत उडी मारेन असं नितीन गडकरी यांनी त्या …

Read More »

मोदींच्या मंत्रिमंडळातील तुमचा आवडता चेहरा कोणता? शरद पवारांनी दिलेलं उत्तर ऐकून भुवया उंचावतील

Sharad Pawar Praise Nitin Gadkari: राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार (Sharad Pawar) यांनी मोदींच्या मंत्रिमंडळातील नितीन गडकरी (Nitin Gadkari) हे त्यांचे आवडते नेते असल्याचं जाहीरपणे सांगितलं आहे. दरम्यान यावेळी त्यांनी राज्यात होणाऱ्या दंगली तसंच देशात चर्चवर होणार हल्ले यावर चिंता व्यक्त करत राज्य आणि केंद्र सरकारवर टीका केली आहे. दंगली रोखणं राज्य सरकारची जबाबदारी असताना तेच प्रोत्साहन देत असल्याची टीका त्यांनी …

Read More »