Tag Archives: BJP

‘बृजभूषण सिंह जेव्हा संधी मिळेल तेव्हा विनयभंग करायचा’; दिल्ली पोलिसांचा धक्कादायक युक्तीवाद

Brijbhushan Sharan Singh Case : भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) माजी अध्यक्ष आणि भाजपा खासदार (BJP) बृजभूषण शरण सिंह (Brijbhushan Sharan Singh) यांच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता आहे. महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी (Harassment Case) शनिवारी दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) न्यायालयात युक्तिवाद केला. भाजपा खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात सापडलेले पुरावे आणि साक्ष हे आरोप निश्चित करण्यासाठी पुरेसे आहेत, असा युक्तीवाद दिल्ली पोलिसांनी …

Read More »

‘पवार साहेबांनी 3 वेळा कर्करोगाशी झुंज दिली अन्…’, शिवसेनेचा उल्लेख करत सुप्रिया सुळेंचा भाजपला टोला!

Supriya Sule On BJP : अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) फूट पडली अन् महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळी दिशा मिळाली. लोकसभेत सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी भाजपवर निशाणा लगावण्याची संधी सोडली नाही. त्यावेळी त्यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांना देखील टोला लगावला होता. अशातच आता सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा भाजपवर टीका करत भाजपला खडेबोल सुनावले आहेत. विरोधी पक्षांची आणि …

Read More »

PM नरेंद्र मोदी यांनी पाया पडणाऱ्या महिलेला रोखलं; नंतर स्वतः घेतला महिलांचा आशीर्वाद

महिला आरक्षण विधेयक लोकसभा आणि राज्यसभेत संमत झालं आहे. विधेयक संमत झाल्यानंतर दिल्लीमधील भाजपा कार्यालयात आनंद साजरा करण्यात आला. या सेलिब्रेशनमध्ये सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचले होते. येथे भाजपाच्या महिला कार्यकर्त्या आणि नेत्यांनी फुलांचा वर्षाव करत नरेंद्र मोदींचं स्वागत केलं. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महिला कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी भाजपाध्यक्ष जे पी नड्डादेखील हजर होते.  दरम्यान नरेंद्र मोदी भाजपा …

Read More »

Womens Reservation Bill : नव्या संसदेत महिला आरक्षणाचा ‘श्रीगणेशा’, पण 2010 ला नेमकं काय झालं होतं?

Womens Reservation Bill History : गणेशोत्सवामुळे आजचा दिवस सामन्यांसाठी उत्साहाचा आणि बाप्पाच्या स्वागताचा असला तरी देशाच्या राजकारणात हा दिवस महत्त्वाचा ठरलाय. केंद्र सरकारनं बोलावलेल्या संसदेच्या विशेष अधिवेशनाचा (Parliament Special Session) आजचा दुसरा दिवस आणि ऐतिहासिक अशा नव्या संसदेतला पहिला दिवस. नव्या संसदेतील पहिल्याच दिवशी देशातलं बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित महिला विधेयक गणेश चतुर्थीचा मुहुर्त साधत पुन्हा एकदा संसदेत आलं…काय घडलं नव्या …

Read More »

‘जवानने भ्रष्ट काँग्रेसचा पर्दाफाश केला’; भाजपाने मानले शाहरुख खानचे आभार

BJP On Jawan Movie : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या (shahrukh khan) ‘जवान’ (Jawan) चित्रपटाची सध्या सगळ्या जगात चर्चा सुरु आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून जवानने दमदार कमाई केली आहे. चित्रपटाने आतापर्यंत 300 कोटींचा गल्ला कमावला आहे. दुसरीकडे, भारतीय जनता पक्षाने (BJP) ‘जवान’ चित्रपटासाठी बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचे कौतुक केले आहे. तसेच भाजपाने काँग्रेसवरही (Congress) निशाणा साधला आहे. भाजपाने बुधवारी शाहरुखच्या जवान …

Read More »

‘अनेक वेळा नाकारलं तरी माझा…’; पंकजा मुंडेंची कार्यकर्त्यांना भावनिक साद

विष्णु बुरगे, झी मीडिया, बीड : भाजपाच्या (BJP) नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी 4 सप्टेंबरपासून शिवशक्ती परिक्रमा यात्रा (Shiv Shakti Parikrama Yatra) सुरू झाली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यातून ही यात्रा जात आहे. पंकजा मुंडे याच्या माध्यमातून आठ दिवस राज्यातील काही जिल्हे पिंजून काढत विविध धार्मिकस्थळे आणि शक्तीपिठांना भेट देत आहेत. शनिवारी रात्री पंकजा मुंडे यांची शिवशक्ती यात्रा बीडमधील (Beed) …

Read More »

10 दिवस सरकारला वेठीस धरणारा ‘मराठा’ आईच्या भेटीनं हळवा, मनोज जरांगेंचे पाणावले डोळे

Maratha Reservation: मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आतापर्यंत अनेक आंदोलने झाली. मूक मोर्चे निघाले. ही सर्व आंदोलने शिस्तबद्ध पद्धतीने, शांतता मार्गाने झाली. दरम्यान जालना येथील आंदोलनावर पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर राज्यभरातील मराठा समाज आक्रमक झाला. यावेळी मनोज जरांगे हे मराठा समाजाचा चेहरा बनून समोर आले. त्यांनी उपोषणाला बसून आंदोलनाची ताकद वाढवली. मागचे 10 दिवस त्यांनी सरकारला जेरीस आणले आहे. राज्यातील बड्या …

Read More »

Video: महिलेने काम मागितल्यावर मुख्यमंत्री म्हणाले, ‘तुला चांद्रयान-4 मध्ये बसवून चंद्रावर पाठवू’

Chandrayaan 3 : चांद्रयान – 3 मोहिमुळे जगभरात भारताचा कौतुक होत आहे. त्यानंतर आता देशाने सूर्याच्या जवळ जाण्याचाही प्रयत्न केला आहे. मात्र दुसरीकडे बेरोजगारीच्या मुद्द्यावरुन विरोधक सरकारला धारेवर धरत आहेत. विरोधकांप्रमाणे आता सामान्य जनताही बेरोजगारीच्या मुद्दयावरुन सरकारला जाब विचारत आहे. अशातच लोकांनी काम मागितल्या नंतर हरियाणाच्या (Haryana) मुख्यमंत्र्यांनी (Manohar Lal Khattar) दिलेल्या उत्तरामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. हरियानाचे मुख्यमंत्री …

Read More »

ISRO नाही BSRO, इंडिया गेट होणार भारत द्वार? INDIA नाव हटवल्यावर पाहा काय-काय बदलणार

INDIA VS BHARAT : देशात सध्या भारत नावावरुन महाभारत सुरु आहे. इंग्रजी भाषेत भारताचा उल्लेख इंडिया असा केला जातो.. त्याऐवजी भारत असाच उल्लेख असावा, यासाठी राज्यघटनेत सुधारणा करण्याच्या हालचाली सुरू झाल्यात. यावरुन विरोधक आक्रमक झाले आहेत. स्वतंत्र्याच्या 76 वर्षांनंतर देशात ‘इंडिया’ वरुन चर्चा सुरु झाली आहे. इंडिया की भारत याचे पडसाद आता राजकीय पटलावरही उमटू लागले आहेत. पण भारतीयांना प्रश्न …

Read More »

‘काही झालं तरी भाजपाला मत देणार नाही’; अख्ख्या गावानेच घेतली शपथ

विष्णु बुरगे, झी मीडिया, बीड : जालना (Jalna Maratha Protest) जिल्ह्यातल्या अंतरवली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर शुक्रवारी पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर लाठीचार्ज करण्यात आला होता. यानंतर हे आंदोलन पेटलं होतं. राज्यभरामध्ये या आंदोलनाचे लोण पेटलं आहे. मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज झाल्याने राज्यभरात बंदची हाक देण्यात आली आहे. या कारवाईविरोधात मराठा समाज चांगलाच आक्रमक झाला आहे. अशातच जोपर्यंत …

Read More »

मोदी पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवणार? भाजपाने स्पष्टच सांगितलं की…

BJP On PM Modi Contesting Pune Lok Sabha Election: केंद्र सरकारने 18 ते 22 सप्टेंबदरम्यान संसदेचं 5 दिवसांचं विशेष अधिवेशन बोलवण्यात येत असल्याची घोषणा गुरुवारी केली. केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून ही घोषणा केली असून या विशेष अधिवेशनामागचा हेतू स्पष्ट करण्यात आलेला नसल्याने चर्चांना उधाण आलं आहे. त्यातच ‘एक देश, एक निवडणूक’, समान नागरी संहिता त्याचप्रमाणे महिलांच्या …

Read More »

‘आपण गणपतीपेक्षा मोठे आहोत असं समजू नका’; विशेष अधिवेशावरुन आव्हाडांचा टोला

Parliament Special Session: 18 ते 22 सप्टेंबदरम्यान संसदेचं 5 दिवसांचं विशेष अधिवेशन बोलवण्यात येत असल्याची घोषणा केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी गुरुवारी सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून केली. या विशेष अधिवेशनामागचा हेतू स्पष्ट करण्यात आलेला नसल्याने चर्चांना उधाण आलं आहे. ‘एक देश, एक निवडणूक’, समान नागरी संहिता त्याचप्रमाणे महिलांच्या आरक्षणासंदर्भातील विधेयकं या अधिवेशनामध्ये मांडली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या …

Read More »

अजूनही 80 टक्के भारतीयांची पहिली पसंती पंतप्रधान मोदीनांच! पीईडब्ल्यूच्या सर्वेक्षण अहवालातून माहिती समोर

Pew Research Survey : लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election 2024) आणि जी-20 शिखर परिषदेपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत (PM Narendra Modi) एका परदेशी कंपनीचा एक महत्त्वाचा सर्वेक्षण अहवाला समोर आला आहे. हा अहवाल पीईडब्ल्यू संशोधन केंद्राने जारी केला आहे. या सर्वेक्षणात 24 देशांतील लोकांनी सहभाग घेतला होता. प्यू रिसर्च सेंटरच्या (PEW) सर्वेक्षणानुसार, जवळपास 80 टक्के भारतीयांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना अनुकूल मत …

Read More »

भाजपा नेत्याच्या घरात सापडला 10 वर्षाच्या मुलाचा मृतदेह, एकच खळबळ; खासदार म्हणाले ‘मीच त्याला….’

आसामच्या सिलचर येथे भाजपा खासदार राजदीप रॉय यांच्या निवासस्थानी 10 वर्षांच्या मुलाचा मृतदेह आढळला आहे. यानंतर एकच खळबळ उडाली आहे. कछारचे एसएसपी सुब्रत सेन यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतदेहाच्या गळ्याभोवती कपडा गुंडाळलेला होता. तसंच हा मुलगा खासदाराच्या घऱात घरकाम करणाऱ्या महिलेचा असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. गेल्या अडीच वर्षांपासून महिला खासदाराच्या घरात काम करत आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत मुलाची आई धोलाई …

Read More »

जोरात मार… शिक्षिकेच्या सांगण्यावरून मुस्लिम मुलाला इतर विद्यार्थ्यांकडून मार; राहुल गांधींची भाजपवर आगपाखड

UP Crime : उत्तर प्रदेशातील (UP News) मुझफ्फरनगरमधल्या (Muzaffarnagar) एका शाळेचा धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये शाळा चालवणारी महिला शिक्षिका एका मुस्लिम विद्यार्थ्याला वर्गातील इतर मुलांना मारहाण करायला सांगत असल्याचे दिसत आहे. शिक्षिका एक एक करून इतर विद्यार्थ्यांना बोलावते आणि तिच्या शेजारी उभ्या असलेल्या विद्यार्थ्याच्या गालावर चापट मारायला सांगत आहे. विद्यार्थी रडत असतानाही शिक्षिका …

Read More »

राजकारण्यांच्या सौभाग्यवतींचं भारीपण! सणासुदींच्या उधळणीत धरला फेर; पाहा Video

Maharastra politicians wife Mangalagaur Video : श्रावण म्हटलं की हिरव्यागार रंगाने नटलेला निसर्ग आणि ऊनपावसाचा खेळ डोळ्यासमोर उभा राहतो. महाराष्ट्रात नीज श्रावणाला सुरूवात झाली आणि त्यापाठोपाठ व्रत, सण, समारंभ साजरे करण्यासही सुरूवात झाल्याचं पहायला मिळतंय. महिला मंडळ आता जोरदार पद्धतीने सणासुदीची उधळण करताना दिसत आहेत. अशातच आता महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांच्या सौभाग्यवतींनी मंगळागौरच्या निमित्ताने फेर धरल्याचं पहायला मिळतंय. महाराष्ट्राच्या राजकारणात खो …

Read More »

अजित पवारांचे राष्ट्रवादीतील स्थान काय? सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितले

Position of Ajit Pawar in NCP: राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील फूट, कार्यकर्त्यांमधील संभ्रम, अजित पवारांचे पक्षातील स्थान, चोरडीयांच्या घरची बैठक अशा विविध मुद्द्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी भाष्य केले. पार्टीत विभाजन झाले आहे हे खरे आहे का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये कोणतीही फूट नाही. देशाचे अध्यक्ष शरद पवार आहेत आणि राज्याचे अध्यक्ष जयंत पाटील आहेत. …

Read More »

कांद्याचा प्रश्न पेटलाच कसा! शेतकऱ्यांच्या संपापापासून केंद्राच्या निर्णयापर्यंत; वाचा, नेमकं काय घडलं!

Onion Export Duty  : कांद्यावरील निर्यात शुल्क वाढवल्यामुळे तीव्र नाराज झालेल्या शेतकऱ्यांना (Farmer) दिलासा देण्यासाठी राज्य सरकारची चांगलीच धावपळ झाली. राज्याचे कृषी मंत्री थेट दिल्लीत व्यापार आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयलांच्या (Piyush Goyal) भेटीला गेले. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadanvis) थेट जपानमधून अमित शाहांशी या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी फोनवरून चर्चा केली. त्यानंतर तातडीनं सूत्र हलली आणि केंद्र सरकारनं नाफेडद्वारे …

Read More »

नितीन गडकरी म्हणतात जुने गिऱ्हाईक दिसेना, रोहित पवारांना शंका, म्हणाले ‘हा कट तर नाही ना?’

Rohit Pawar On Nitin Gadkari: कॅगच्या अहवाल समोर आल्यानंतर देशाच्या राजकारणात खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय. केंद्र सरकारच्या सहा योजनांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचं कॅगच्या अहवालात (CAG Reports) नमूद करण्यात आलं आहे. तर कॅगच्या अहवालात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या खात्यांवर देखील आरोप करत ताशेरे ओढण्यात आले आहेत. त्यामुळे आता नितीन गडकरी (Nitin Gadkari) चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. नितीन गडकरी यांचं राजकारण संपवायचं हा …

Read More »

‘आपल्या औकातीत राहा, जास्त स्मार्ट बनू नका’, रवींद्र जाडेजाची पत्नी रिवाबा संतापली, रस्त्यावरच भिडली; VIDEO व्हायरल

गुजरातच्या जामनगरमध्ये रस्त्यावरच राजकीय वाद झाल्याचा अजब प्रकार घडला आहे. येथे भाजपाच्या तीन मोठ्या महिला नेत्या रस्त्यावरच आपापसात भिडल्या. यामध्ये भारतीय क्रिकेटर रवींद्र जाडेजाची पत्नी रिवाबादेखील होत्या. रिवाबा यांचा सर्वात आधी महापौर बिना कोठारी यांच्याशी वाद झाला. यादरम्यान खासदार पूनम माडम (Poonam Madam) यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता रिवाबा यांनी त्यांनाही सुनावलं. या वादाचा व्हिडीओ सोशल मीडियवावर प्रचंड व्हायरल …

Read More »