तुम्हालाही आई म्हणून क्रांती रेडकर सारखा अनुभय आलाय? मुलं, आजी-आजोबा आणि त्यांचा गोंधळ…

मुलं म्हटलं की, धम्माल मस्ती ही आलीच. आणि जुळ्या मुली म्हटलं तर काय? डबल आनंद. हा आनंद मराठमोळी अभिनेत्री क्रांती रेडकर. क्रांती रेडकर आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर या धम्मालचे फोटो शेअर करते. या सगळ्या व्हिडिओतून आपल्या फॅन्ससोबत पॅरेंटिंग टिप्स देखील शेअर करत असते.

मुलं म्हटलं की, त्यांचं सर्वोत्तम संगोपन आलं. या संगोपनात आजी-आजोबांचा खूप महत्वाचा वाटा असतो. प्रत्येक आजी-आजोबांसाठी त्यांच नातवंड म्हणजे दुधावरची साय असते. त्यामुळे अनेकदा आजी-आजोबा आणि नातवंडांमध्ये असंख्य किस्से घडत असतात. यामधून देखील आपण बऱ्याच गोष्टी शिकत असतो. आजी – आजोबा आणि नातवंडांचा गोंधळ जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Kranti Redkar Wankhede इंस्टाग्राम / टाइम्स ऑफ इंडिया)

क्रांती रेडकरच्या मुलींची नावे

  • क्रांती रेडकर यांच्या मुलींची नावे अनुक्रमे झायदा (Zayda) आणि झिया (Ziya) असे आहे. या दोन्ही नावांचे अर्थ आहेत.
  • झायदा हे अरबी वंशाच्या मुलीचे नाव आहे. झैदाचा एक प्रकार, या ठळक आणि सुंदर नावाचा अर्थ “समृद्ध” किंवा “भाग्यवान” आहे.
  • झिया हे तुर्की मूळचे नाव आहे. याचा अर्थ “प्रकाश” आणि “वैभव”. झिया आणि झायदा असं क्रांतीच्या जुळ्या मुलींची नावे आहेत.
हेही वाचा :  एकमेकांना गर्विष्ठ समजायचे, बरेच दिवस अजिबात बोलले नाही, चित्रपटापेक्षा कमी नाही बुमराह आणि संजनाची लव्ह स्टोरी

(वाचा – मुलीचं नाव ठरवायला ऐश्वर्या आणि अभिषेकने लावले इतके दिवस, बच्चन कुटुंबियांपासूनही का लपवलं नाव?)

​क्रांती रेडकर जुळ्या मुलींची आई

अभिनेती क्रांती रेडकरने एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्याशी 29 मार्च 2017 रोजी लग्न झालं. या दोघांना जुळ्या मुली आहेत. क्रांती रेडकर सोशल मीडियावर खूप ऍक्टिव असते. क्रांती रेडकर अनेकदा मुलींचे किस्से, आई-वडिलांचे किस्से सोशल मीडियावर शेअर करते.

(वाचा – आक्रमक Virat Kohli मध्ये लपलाय संवेदनशील आणि भावनिक ‘बाप’, लेक Vamika साठी असा आहे तिचा ‘विराट बाबा’)

​मुलींच्या केसावर आजीची प्रतिक्रिया

मुलं आणि आईचं नातं तर खास आहेच. पण यासोबत आजी आणि नातीचं नातं आणखी खास असतं. आजी आपल्या नातींवर खूप प्रेम करते. त्यामुळे हे नातं खास असतं. क्रांती रेडकरने एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यामध्ये क्रांतीच्या आईला मुलींचे कपाळावरील केस पटत नव्हते. त्यामुळे ती नाराज होती. असा अनुभव अनेक महिलांना आपल्या घरी येत असेल. नातवंडांवर आजीचं विशेष प्रेम असल्यामुळे त्यांना त्या आपल्या पद्धतीने बाळांना वाढवायचं असतं.

(वाचा – मुलांनी उत्तम यश संपादन करावं असं वाटतंय? सद्गुरू वामनराव पै यांनी सांगितलेल्या उत्कर्षाच्या 7 पायऱ्या फॉलो करा)

हेही वाचा :  chapati For Skin : शिळ्या चपातीचा करा असा वापर, एका वापरात चेहरा आरशासारखा लख्ख चमकेल व सुरकुत्याही नाहीशा होतील..!

क्रांतीच्या मुलींचे केस आणि त्यावर आजीची प्रतिक्रिया

​पेपा पिगचे परिणाम

ज्या घरात लहान मुलं आहेत तेथे पेपा पिग आवर्जुन पाहिलं जातं. कायम पालकांना मुलांना यूट्यूब दाखवावे की नाही हा प्रश्न पडतो. अशावेळी क्रांती रेडकरचा हा अनुभव खूप भन्नाट आहे. पेपा पिगमधून लहान मुलं सुंदर आणि चांगल इंग्रजी शिकत असतात. हा अनुभव अनेक पालकांचा असेल. यामध्ये क्रांतीची मुलगी गोदो तिला इंग्रजीत उत्तर देते. याचा हा किस्सा जरूर पाहा.

(वाचा – अभिनेत्री Urmila Nimbalkarच्या ‘आईपण’ चा अनुभव, बाळाची तुलना करण्यावर बोलली उर्मिला, वाचा ७ टिप्स)

पेपा पिगचे परिणाम

​मुलांच प्रत्येक बोलणं आजी-आजोबा मनावर घेतात का?

क्रांती रेडकर अनेकदा तिच्या आई- वडिलांचे किस्से शेअर करत असते. क्रांती आपल्या आई वडिलांची मुलींच्या संगोपनात खूप मदत होते. मुलींच्या बोबड्या बोलण्याचे आजी – आजोबांवर काय परिणाम होतो? हे यातून कळतं. विक्सची गोळी गोदोला म्हणायचं होतं पण क्रांतीचे वडिल मात्र विष समजतात. अशावेळी काय गंमत घडते ही अनेकांनी आपल्या घरी अनुभवली आहे. ही किस्से प्रत्येकालाच आनंद देणारे असतात.

हेही वाचा :  Porn University : या विद्यापीठात दिलं जातं Adult चित्रपटांमध्ये अभिनय करण्याचं प्रशिक्षण, पाहा कुठे आहे

(वाचा – Alia Bhatt ने लेकीचं नाव आणि जन्माची तारीख आधीच ठरवली होती? ६ नोव्हेंबर आणि ‘हे’ नाव बाळासाठी ठरेल खास))

क्रांतीच्या पप्पांचा किस्सा

​आजी आजोबांचा बाळांवर संस्कार

नातवंडांवर आजी – आजोबा कळत नकळत संस्कार करत असतात. एवढंच नव्हे तर या जगात आपल्यावर निःस्वार्थी प्रेम करणारी दोन व्यक्तीमत्व आहेत. हा विश्वास मुलांना आजी-आजोबांकडून मिळत असतो. हाच विश्वास क्रांतीच्या मुलींना त्यांच्या आजीआजोबांकडून मिळत असतो.

(वाचा – ‘मुलीच्या जन्मापेक्षा जगात दुसरा कोणताच आनंद नाही’ अक्षयची भावूक पोस्ट, मुलीला बाबाकडून हव्या असतात या 6 गोष्टी))

क्रांतीच्या आईचा भन्नाट व्हिडीओ



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘आनंद दिघेंच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांच्या संपत्तीची…’, CM एकनाथ शिंदेंचा गौप्यस्फोट

Eknath Shinde on Uddhav Thackeray: धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या निधनानंतर मी उद्धव ठाकरेंना …

Video: दाभोसा धबधब्यावर स्टंटबाजी, 120 फुटावरुन दोन तरुणांची उडी, एकाचा मृत्यू

Palghar News Today: मे महिन्यात शाळ- कॉलेजना सुट्ट्या लागतात. त्यामुळं अनेकजण पर्यटनासाठी बाहेर पडतात. पालघर …