Photos- ‘वर्षा’वरील गणपतीचं दर्शन घ्यायला पोहोचले रणवीर- दीपिका आणि सारा अली खान

मुंबई : गणेशोत्सवाचा आज शेवटचा दिवस. गणपती बाप्पाच्या आगमनानं गेल्या दहा दिवसांपासून वातावरणात उत्सवाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या वर्षा या सरकारी निवासस्थानी गणपतीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी बसलेल्या गणपतीचं दर्शन घ्यायला रणवीर सिंग (Ranveer Singh), दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि सारा अली खान (Sara Ali Khan) हे बॉलिवूड कलाकार आले होते.

‘वर्षा’बंगल्याविषयी पहिल्यापासूनच जाम कुतूहल वाटत आलयं…प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत

यावेळी रणवीरनं लाल आणि पांढऱ्या रंगाचा प्रिंटेड कुर्ता-पायजमा घातला होता. तर दीपिकानं लाल आणि हिरव्या रंगाच्या पारंपरिक पोशाख घातला होता. तर सारानं पिवळ्या रंगाचा सलवार कमीज घातला होता. त्यात ती खूप सुंदर दिसत होती.

मुख्यमंत्री शिंदे यांच्या घरच्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी बॉलिवूडमधील अनेक कलाकार आले होते. त्याचे काही फोटो-व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. काही दिवसांपूर्वी रणवीर आणि दीपिकानं अंबानी कुटुंबाच्या गणपती विसर्जनाला हजेरी लावली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या घरच्या गणपतीचं दर्शन घ्यायला हे दोघंजण गेले होते.

कितीही सिनेमे होऊ देत फ्लाॅप,अक्षय कुमारचं कधीच होणार नाही नुकसान, एकूण संपत्तीबद्दल इथे वाचा

दीपिका हिच्या कामाबद्दल सांगायचं तर ती लवकरच अमिताभ बच्चन आणि प्रभास यांच्याबरोबर ‘प्रोजेक्ट के’मध्ये दिसणार आहे.तसंच ती ‘फाइटर’ सिनेमात ती पहिल्यांदा हृतिक रोशनबरोबर दिसणार आहे. त्याशिवाय ती शाहरुख खानच्या ‘पठाण’ आणि अमिताभ बच्चन यांच्याबरोबर ‘द इंटर्न’ सिनेमाच्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार आहे.


रणवीरच्या कामाबद्दल सांगायचं तर तो करण जोहर दिग्दर्शिन असलेल्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ सिनेमात दिसणार आहे. त्यात त्याच्याबरोबर आलिया भट्ट दिसणार आहे. रोहित शेट्टीच्या ‘सर्कस’मध्ये तो दिसणार आहे. त्यात त्याच्याबरोबर जॅकलीन फर्नांडिस, पूजा हेगडे दिसणार आहेत.

अचानक असं काय झालं की लाडाची बॉस आता नव्या वेळेत भेटणार

सारा अली खान (Sara Ali Khan) च्या कामाबद्दल सांगायचं तर ती लवकरच विक्रांत मैसी आणि चित्रांगदा सिंह यांच्याबरोबर ‘गैसलाईट’ सिनेमात दिसणार आहे. अलिकडेच तिनं एका सिनेमाचं चित्रीकरण पूर्ण केलं आहे. या सिनेमाचं नाव अजून ठरलेलं नाही. या सिनेमात ती विकी कौशल दिसणार आहे.



Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

महेश मांजरेकरांनी केली नव्या चित्रपटाची घोषणा ; लेकीसह झळकणार ‘हे’ मराठी कलाकार

मुंबई, 09 सप्टेंबर :मराठी चित्रपटसृष्टीतील प्रयोगशील अभिनेता, दिग्दर्शक म्हणून महेश मांजरेकर ओळखले जातत्. सतत काहीतरी …

ऋतुजा बागवेनं वाढदिवशी स्वतःलाच दिलं खास गिफ्ट; चाहत्यांकडून होतयं कौतुक

मुंबई, 09 सप्टेंबर : मराठी मनोरंजन विश्वात लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये ऋतुजा बागवे हिचा देखील समावेश होतो. …