महाकाल मंदिरात नतमस्तक झाला ‘ब्रह्मास्त्र’चा दिग्दर्शक; आलिया-रणबीरला नो एंट्री!
रंग माझा वेगळा मालिकेत कार्तिकीची भूमिका करणारी सायेशा आता प्रेक्षकांना भेटते ती ‘नवा गडी नवं राज्य’मधून. यातली चिंगी तिनं आधी साकारलेल्या कार्तिकीपेक्षा नक्कीच वेगळी उभी केलीय. तुझेच गीत मी गात आहे या मालिकेतली स्वराही तितकीच गोड मुलगी आहे. मालिकेत तिच्यावरच झोत आहे. बाकी मोठी नावं असूनही स्वरा सगळ्यांचं लक्ष वेधून घ्यायला यशस्वी ठरली आहे.
सोनीवर आता १२ सप्टेंबरपासून नवी मालिका सुरू होतेय. छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं. मालिकेचे प्रोमो आणि बयोकडे सगळ्यांचं लक्ष जात आहेच. ही बयो म्हणजे रुची नेरुरकर. कोकणातलीच आहे. पहिल्यांदाच ती मालिकेत पदार्पण करत आहे. सध्या मालिकेच शूटिंग सिंधुदुर्ग इथे देवगडला निसर्गरम्य ठिकाणी सुरू आहे.
Video : अरुंधतीच्या घरी बाप्पाचं आगमन, ‘आई’नंच घडवली मूर्ती
शिक्षणाच्या जिद्दीचा अनोखा प्रवास, बयोच्या प्रयत्नांना शिक्षणाची आस, असं वाक्य प्रोमोमधून समोर येतं. या छोट्या बयोला डाॅक्टर व्हायचं आहे. त्यासाठी ती सतत अभ्यास करताना दाखवली आहे. या मालिकेत विक्रम गायकवाड, वीणा जामकर, नम्रता पावस्कर आणि शरद सावंत असे कलाकार आहेत. प्रोमोमध्ये हिरवाईनं नटलेलं कोकण दिसतंय. प्रेक्षकांना मालिकेची उत्सुकता आहे.
‘जहां चार यार’च्या प्रमोशनमध्ये अभिनेत्री स्वरा भास्कर बिझी
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या