तर मी बाकी खेळाडूंनाही संधी देणार, श्रीलंकेविरुद्धच्या पराभवानंतर रोहित शर्माचं मोठं वक्तव्य

दुबई : आशिया चषक २०२२ च्या सुपर-४ फेरीत भारतीय क्रिकेट संघाला सलग दुसऱ्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. अटीतटीच्या सामन्यात श्रीलंकेने भारताचा ६ विकेट्सने पराभव करुन आशिया चषकातील भारताचं आव्हान जवळपास संपुष्टात आणलं. पुढील महिन्यांत ऑस्ट्रेलियामध्ये टी ट्वेन्टी विश्वचषक करंडक स्पर्धा होत आहे. त्यादृष्टीने सध्याच्या आशिया कपमधील सामन्यांना वेगळं महत्त्व आहे. मात्र आशिया चषकातल्या सुपर-४ फेरीतील लागोपाठ २ पराभवांनी भारतीय संघाला विचार करावा लागणार आहे. खरंच भारतीय संघाच्या खेळाडूंची टी ट्वेन्टी वर्ल्डकपमध्ये खेळण्याची तयारी झालीये का? असा प्रश्न उपस्थित होतो आहे. तत्पूर्वी भारतीय संघ दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाविरोधात टी ट्वेन्टी मालिका खेळणार आहे. या दौऱ्यात अनेकानेक खेळाडूंना संधी दिली जाईल, त्यांना परफॉर्मन्स दाखवण्याची संधी असेल, अनेकांना आम्ही ट्राय करु, असं मोठं विधान रोहित शर्माने केलं आहे.

श्रीलंकेविरोधातल्या पराभवानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्माने माध्यमांशी संवाद साधला. ‘करो या मरो’ अशा महत्त्वाच्या सामन्यात फलंदाजांनी दाखवलेला निष्काळजीपणावर बोट ठेवत कर्णधार रोहित शर्माने सामन्यानंतर फलंदाजांना झापलं. एवढ्या महत्त्वाच्या सामन्यात आपण कोणते फटके खेळायला हवेत, हे फलंदाजांना समजायलं हवं होतं, अशा शब्दात त्याने आपली नाराजी व्यक्त केली. यावेळी त्याला आगामी वर्ल्डकपविषयी देखील प्रश्न विचारण्यात आले. त्यानेही विविध प्रश्नांना रोखठोक उत्तरं दिली.

“टी ट्वेन्टी विश्वचषकासाठी आमचा संघ जवळपास निश्चित झाला आहे. भारतीय संघातील सध्याच्या खेळाडूंपैकी हे ९०-९५ टक्के हेच खेळाडू असू शकतात. त्यात कमीअधिक बदल होऊ शकतात. पण आशिया चषकानंतर आम्हाला ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका खेळायची आहे, जोपर्यंत टी-२० विश्वचषकासाठी संघ जाहीर होत नाही तोपर्यंत आम्ही ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी ट्वेन्टी मालिकेत विविध खेळाडूंना आजमावू. सध्याचा संघ विश्वचषक खेळण्यासाठी ९०-९५ टक्के पूर्णपणे तयार असला तरी आम्हाला फक्त काही बदल करावे लागतील”, असं रोहित शर्मा म्हणाला.

आम्ही खूप सारे सामने खेळतोय. लागोपाठ आम्ही चांगले रिझल्टही दिले आहेत. त्यामुळे आशिया चषकातील २ सामन्यांत झालेल्या पराभवानंतर लगेच चिंता करण्याची गोष्ट नाही. पण असे पराभव गरजेचे देखील असतात. यातून खूप काही शिकायला मिळतं. निश्चित संघातील खेळाडू कालच्या पराभवानंतर खूप गोष्टी शिकतील, असंही रोहित शर्मा म्हणाला.

श्रीलंकेचा भारतावर रोमहर्षक विजय

सामन्यात श्रीलंकेच्या संघाने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने २० षटकांत १७३ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल श्रीलंकेच्या संघाने ६ विकेट्स आणि एक चेंडू शिल्लक राखून भारताला पराभवाचा धक्का दिला. यामुळे टीम इंडियाची फायनलमध्ये पोहोचण्याची शक्यता बरीच कमी झाली असून भारत आशिया कपमधून जवळपास बाहेर पडला आहे.

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

क्रिकेटरचा ‘डर्टी गेम’, 16 व्या वर्षी IPLमध्ये एन्ट्री, आता बलात्काराचा आरोप

मुंबई : क्रीडा विश्वातील एक बातमीने खळबळ उडाली आहे. आयपीएल खेळलेल्या एका स्टार खेळाडूवर गंभीर …

आमच्या बॅट्समनना कळत नाही की… रोहित शर्माने सुनावलं, पराभवाची ३ कारणे सांगितली

मुंबई : आशिया चषक २०२२ च्या सुपर-४ फेरीत भारतीय क्रिकेट संघाला सलग दुसऱ्या सामन्यात पराभवाला …