MHT CET Result 2022: महाराष्ट्र कॉमन एन्ट्रन्स टेस्टचा निकाल जाहीर

MHT CET Result 2022: महाराष्ट्र स्टेट कॉमन एन्ट्रन्स टेस्ट सेलने नुकताच महाराष्ट्र कॉमन एंट्रन्स टेस्ट (MHT CET) चा निकाल जाहीर केला आहे. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स (PCM) आणि फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी (PCB) ग्रुपचे निकाल ( MHT CET Result 2022) अधिकृत वेबसाइट cetcell.mahacet.org वर पाहता येणार आहे. उमेदवाांना वेबसाइटवर जाऊन निकाल पाहू शकतील. सीईटी निकाल २०२२ (MHT CET Result 2022) सोबत, अंतिम उत्तरतालिका देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे.

एमएचटी सीईटी २०२२ (MHT CET 2022) परीक्षा पीसीएम ग्रुपसाठी ५ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट आणि पीसीबी ग्रुपसाठी १२ ऑगस्ट ते २० ऑगस्ट २०२२ दरम्यान घेण्यात आली. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्राने २८ ऑगस्ट रोजी पीसीएम आणि पीसीबी गटासाठी पुनर्परीक्षा घेतली होती.

NABARD मध्ये बंपर भरती, पदवीधर असाल तर ‘येथे’ पाठवा अर्ज
Irrigation Department Job: राज्याच्या पाटबंधारे विभागात भरती, जाणून घ्या तपशील
MHT CET Result 2022: असा तपासा निकाल
स्टेप १: सर्वप्रथम cetcell.mahacet.org च्या अधिकृत वेबसाइटवर जा.
स्टेप २: त्यानंतर वेबसाइटवर दिलेल्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
स्टेप ३: आता विनंती केलेली माहिती सबमिट करा.
स्टेप ४: तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
स्टेप ५: भविष्यातील संदर्भासाठी त्याची प्रिंट काढा.

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा सेल, महाराष्ट्रने एमएचटी सीईटी २०२२ साठी नॉर्मलायझेशन प्रक्रिया तयार केली आहे. सीईटी स्कोअर ० ते १०० पर्यंत पर्सेंटाइल म्हणून घोषित केले आहे. सीईटी २०२२ पात्र उमेदवार समुपदेशन प्रक्रियेस उपस्थित राहतील. समुपदेशनात शासकीय महाविद्यालये, विद्यापीठे, शासकीय अनुदानित खासगी महाविद्यालये, खासगी विनाअनुदानित महाविद्यालये यांचा समावेश असेल.

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

MHT CET Result 2022: महाराष्ट्र सीईटी एलएलबीचा निकाल जाहीर

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

शाळा, महाविद्यालयातील तरुणाई अडकतेय ‘इलेक्ट्रॉनिक सिगरेट’च्या जाळ्यात

Addiction to electronic cigarettes: सिगरेट ओढणे आरोग्यास अपायकारक आहे. यामुळे तुम्हाला कर्करोगा सारखा गंभीर आजार …

विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी सहशालेय उपक्रम

Co curricular activities: करोना प्रादुर्भावामुळे मागील दोन वर्षांमध्ये झालेला अध्ययन नुकसान भरून काढण्यासाठी आणि गुणवत्तेसाठी …