ईडी चौकशीत मिळालेल्या माहितीनुसार आणि त्यांच्याकडे असलेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं नोराला एका खास इव्हेंटबद्दल प्रश्न विचारले. 2020मध्ये चेन्नई येथे झालेल्या या इव्हेंटमध्ये नोरा सहभागी झाली होती. त्याचप्रमाणे सुकेश बरोबरच्या पर्सनल चॅट्स देखील नोराला यावेळी दाखवाव्या लागल्या.
हेही वाचा – Jacqueline Fernandez : दिल्ली पोलिसांकडून जॅकलिन फर्नांडिसची तब्बल आठ तास चौकशी
या चौकशीवेळी नोरा बरोबर सुकेशची पत्नी लीना मारिया पॉसही होती. तिला देखील त्या इव्हेंटबाबत प्रश्न विचारले गेले. नोरा या प्रश्नावर उत्तर देत म्हणाली, चेन्नईमध्ये एक इव्हेंट झाला होता. एक्सीड एंटरटेनमेंट प्राइव्हेट लिमिटेड एजंसीकडून हा इव्हेंट आयोजित करण्यात आला होता. लीनाने या इव्हेंटमध्ये मला गूची ब्रँडची बॅग आणि आयफोन दिला होता. माझा नवरा तुमचा मोठा फॅन आहे. त्यांना तुला भेटायचं आहे. पण आता तू त्याच्याशी फोनवर बोल असं म्हणून तिने फोन लावला आणि स्पीकरवर ठेवला. तेव्हा फोनवर सुकेशने मला थँक्यू म्हटलं होतं. त्यावेळी लीनाने मला BMW कार गिफ्ट करण्याची ऑफर दिली होती.
नोरा पुढे म्हणाली, सुकेशने एका अनोळखी माणसाच्या फोनवर मला फोन केला. माझे पुढचे डिटेल्स देण्यासाठी मी त्याला माझ्या बहिणीच्या नवऱ्याचा बॉबचा नंबर दिला. त्यानंतर मी बॉबला सांगितलं होत की सुकेशला सांगा मला BMWची गरज नाही. माझ्याकडे एक BMW आहे. बॉबने सुकेशला ही गोष्ट सांगितल्यानंतरही त्याने बॉबला BMW ऑफर केली. त्याला डिलचे टोकन दिले होते. बॉबच्या नावावर BMW कार बुक केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या