प्रेक्षकांच्या दबावापुढे वाहिनी झुकली, ‘माझी तुझी रेशीमगाठ’ आता नव्या वेळेत

मुंबई : ‘दार उघड बये’ या नव्या मालिकेचा प्रोमो झी मराठीवर प्रदर्शित झाला आणि त्याचवेळी चर्चा होऊ लागली ती माझी तुझी रेशीमगाठ मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार. खरं तर श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरे, मायरा वायकुळ असेल संकर्षण कऱ्हाडे असेल, प्रत्येक व्यक्तिरेखेशी प्रेक्षक गुंतत गेला. त्यामुळे मालिका बंद होणार हे काही प्रेक्षकांना आवडलं नाही.

आपल्या प्रेमापासून दूर जाऊन पाहा, उर्वशी रौतेलानं शेअर केली पोस्ट; नेटकऱ्यांना आठवला ऋषभ पंत

‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेच्या शेवटच्या टप्प्यातले शूटिंग केल्याची पोस्ट कलाकारांनी सोशल मीडियावर शेयर केल्या. या पोस्टनंतर अनेक प्रेक्षकांनी मालिका बंद होण्याबाबत प्रश्न विचारले. ही मालिका सुरू झाल्यापासून त्यातील कलाकार मंडळी कायम चर्चेत होती. मग तो यशवर्धन, समीर असुदे, नेहा किंवा छोटी परी. पण अचानक मालिका बंद होण्याचा निर्णय घेण्यात आल्याने मालिकेचे चाहते नाराज झाले आणि सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटू लागल्या.

या सगळ्याची दखल वाहिनी आणि निर्मात्यांनी घेतली आणि मालिका बंद न करण्याचा निर्णय घेतलाय. हो हे खरं आहे, प्रेक्षकांची आवडती ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिका बंद होणार नसून या मालिकेची वेळ बदलण्यात आली आहे. आता ही मालिका सोमवार ते शनिवार संध्याकाळी ६.३० वाजता पाहता येणार आहे.

राखी सावंतच्या रोमँटिक सीनवरून भडकला आदिल, मारामारीपर्यंत गेलं प्रकरण

प्रार्थना असेल, श्रेयस असेल, संकर्षण असेल प्रत्येकानंच मालिका संपणार म्हणून पोस्ट शेअर केल्या होत्या. अगदी शेवटच्या भागाचं शूटिंग झाल्याच्या बातम्याही आल्या. तसे व्हिडिओही शेअर केले गेले. पण आता निर्माते आणि वाहिनीनं निर्णय बदलल्यानं सूत्रांच्या माहितीनुसार उद्यापासून शूटिंग सुरू होत आहे. पुन्हा एकदा यश आणि नेहाचं प्रेम, समीरची मैत्री, परीची धमाल आणि सिम्मीचे कारनामे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.

चित्रपटगृहात १६ सप्टेंबरला अनलिमिटेड कल्ला करायला येतोय ‘भाऊबळी’ चित्रपट

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

Money Laundering प्रकरणी नोरा फतेहीला दाखवावे लागले पर्सनल चॅट्स

मुंबई,  15 सप्टेंबर : महाठग सुकेश चंद्रशेखर मनी लाँड्रिंग प्रकरणात दिल्ली पोलीस आणि ईडीच्या हालचालींना …

केबीसी’च्या सेटवर आले जुळे भाऊ; ओळख पटण्यासाठी बिग बींनी केलं असं काही

मुंबई, 15 सप्टेंबर : टेलिव्हिजनचा सर्वात प्रसिद्ध शो कौन बनेगा करोडपतीचा 14 वा सीझन प्रेक्षकांच्या …