गौरी खाननं शेअर केला आर्यनचा Photo, तो पाहून शाहरुख म्हणाला- अगदी माझ्यावर गेलाय ना!

मुंबई : बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख गेल्या तीन दशकांहून अधिक काळ अभिनयाच्या क्षेत्रात कार्यरत आहे. दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, कुछ कुछ होता है, देवदास,चैन्नई एक्स्प्रेस यांसारख्या अनेक हिट सिनेमे शाहरुखने दिले आहेत. सुपरस्टार असलेला शाहरुख उत्तम कुटुंबवत्सल व्यक्ती देखील आहे. सोशल मीडियावरदेखील शाहरख कुटुंबाचं कौतुक करण्याची एकही संधी सोडत नाही. अलिकडेच इन्स्टाग्रामवर आर्यन खान बरोबर मजेशीर पद्धतीनं त्यानं संवाद साधला होता. आता त्यानंतर शाहरुखनं बायको गौरी खान हिनं केलेल्या एका ट्वीटवर रंजक उत्तर दिलं आहे.

बापरे! सुपरस्टार अभिनेता देहविक्री करणाऱ्यांना ठेवायचा कामाला

गौरीनं ट्विटरवर आर्यनचा फोटो शेअर केला. या फोटोमध्ये तो उडी मारताना दिसत आहे. हा फोटो शेअर करत गौरीनं लिहिलं की, ‘माझ्या मुला आणखी पुढं आणि वर…’ गौरीचं हे ट्वीट शाहरुखनं रिट्विट करत त्याला मजेशीर उत्तर दिलं आहे. शाहरुखनं त्याचा ‘मै हूं ना’ सिनेमातील फोटो शेअर करत लिहिलं, ‘माझा मुलगा अगदी माझ्यावर गेला.’

अर्थात शाहरुखनं अशाप्रकारचं मजेशीर उत्तर पहिल्यांदा दिलेलं नाही. याआधीही शाहरुखनं त्याच्या चाहत्यांबरोबर हास्यविनोद करत गंमतीशीर उत्तर दिली आहेत. शाहरुख आणि आर्यननं कभी खुशी कभी गम सिनेमात काम केलं आहे. या सिनेमात शाहरुखनं राहुल रायचंद ही भूमिका साकारली होती. तर आर्यन यानं लहानग्या राहुलची भूमिका साकारली होती. तसंच आर्यननं शाहरुखबरोबर द इनक्रेडिबल्स आणि द लायन किंग या अॅनिमेटेड सिनेमांसाठी डबिंग केलं आहे.

Poll- TRP लिस्टमध्ये झी मराठीला दिसणार का सुगीचे दिवस?

दरम्यान, शाहरुखच्या कामाबद्दल सांगायचं तर अलिकडेच रिलीज झालेल्या ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमात त्यानं पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. त्याची ही भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडली आहे. या सिनेमात आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. लवकरच त्याचा पठाण हा सिनेमा रिलीज होमार आहे. तसंच तो जवान आणि डंकी सिनेमाचं चित्रीकरण करत आहेत. त्याचे चाहते या सिनेमांची आतुरतेनं वाट बघत आहेत.

महाराष्ट्राची लाडकी जोडी रितेश जेनेलिया वांद्रयात जिम बाहेर स्पॉट

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

दिल्ली पोलिसांकडून जॅकलिन फर्नांडिसची तब्बल आठ तास चौकशी

मुंबई,14  सप्टेंबर : बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आज दिल्लीत चौकशीसाठी हजर झाली होती. दिल्लीतील मंदिर …

रणवीर सिंगपासून अक्षयपर्यंत कोण कोण झळकणार महाभारतात घ्या जाणून!

मुंबई, 14 सप्टेंबर :  बॉलिवूडमध्ये सध्या ऐतिहासिक सिनेमे बनवायचा ट्रेंड आला आहे. आतापर्यंत फक्त एका …