राखीच्या आयुष्यात आदिल आल्यानंतर तिच्या आयुष्यामध्ये अनेक बदल घडून आले आहेत. त्यातला सर्वात मोठा बदल आहे तो म्हणजे की, राखी आता पूर्वीसारखे बोल्ड आउटफिट्स घालत नाही. ती साध्याच ड्रेसमध्ये दिसते. राखी आदिलवरील प्रेमामुळे बोल्ड कपडे घालत नसल्याचं सांगितलं जातं आहे.
हे वाचा-सिनेविश्वात धमाकेदार एण्ट्रीनंतर हृताने घेतला ब्रेक! एन्जॉय करतेय सेकंड हनीमून
राखीच्या शॉर्ट कपड्यांबाबत काय म्हणाला आदिल?
अलिकडेच तू मेरे दिल में रहने के लायक नाही या गाण्याच्या लाँचिंग कार्यक्रमात राखी आणि आदिल सहभागी झाले होते. यावेळी राखीच्या कपड्यांविषयी विचारल्यानंतर आदिलनं उत्तर दिलं की, ‘मी कधीही राखीला बुरखा अथवा हिजाब घालायला सांगितलेलं नाही. वेगळे कपडे घातल्यानं राखीमध्ये काही बदलणार नाही. मी राखीला कधीही कपड्यांवरून फोर्स केलेला नाही. परंतु एक नक्की की मी तिला योग्य पद्धतीनं कपडे घालत जा हे पटवून देण्याचा नक्की प्रयत्न केला. त्यानं पुढं असंही सांगितलं की, आम्ही दोघं भेटण्याआधी राखी खूपच बोल्ड कपडे घालायची. ती माझ्या आयुष्यात आली असली तरी त्याचा अर्थ असा नाही की मी माझा धर्म विसरलोय. मी मुस्लिम कुटुंबातून आलो आहे. मला माझ्या कुटुंबाचाही विचार करायचा आहे.’ सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
हे वाचा-हुंडा प्रथेला अक्षयकडून प्रोत्साहन? नितीन गडकरींनीही शेअर केलेला Video
लहान ड्रेस घातलेल्या मुलींना पाहून राखी येतं रडू
याचवेळी राखीनं सांगितलंकी, मी जेव्हा शॉपिंगला जाते तेव्हा शॉर्ट ड्रेस पाहून मला रडू येतं. केवळ इतकंच नाही तर शॉर्ट ड्रेस घातलेल्या मुलींना बघितलं तरी मला त्यांच्याबद्दल असूया वाटते. परंतु त्याचवेळी राखी हे देखील स्पष्ट करते की तिला आदिलला कोणत्याही परिस्थितीमध्ये गमवायचं नाहीये. तसंच त्याच्या कुटुंबालाही दुखवायचं नाहीये. त्यामुळे तो जे सांगतो ते मी आनंदानं ऐकते.’
दरम्यान, आदिल आणि राखीची जोडी तू मेरे दिल में रहने के लायक नही या म्युझिक व्हिडिओमध्ये दिसणार आहे. त्याचा टीझर लाँच झाला आहे. प्रेक्षकांना त्यांची जोडी खूपच आवडली आहे.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या