majhinews

लता मंगेशकरांच्या अंत्यदर्शनावेळी थुंकल्याचा शाहरूख खानवर आरोप; नाना पटोले म्हणाले, “मुद्दामहून…”

शाहरूखने शिवाजी पार्कवर येऊन लता मंगेशकर यांच्यासाठी ‘दुवा’ केल्यानंतर त्याला ट्रोल करण्यात आलं. यावर नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली. भारतरत्न आणि ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांच्या निधनानंतर देशभरातून शोक व्यक्त करण्यात आला. अनेक दिग्गज मान्यवरांनी लता मंगेशकर यांचं अंत्यदर्शन घेत मंगेशकर कुटुंबाचं सांत्वन केलं. यात अभिनेता शाहरूख खानचाही समावेश होता. शाहरूखने शिवाजी पार्कवर येऊन लता मंगेशकर यांच्यासाठी ‘दुवा’ केल्या. मात्र, …

Read More »

राणेंना दुहेरी धक्का… नितेश राणेंच्या जामीन अर्जाची सुनावणी लांबली तर गोट्या सावंत यांना न्यायालयाने…

नितेश राणेंच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना कोल्हापूरला हलवण्यात आलं आहे. अशाचत आता राणे कुटुंबाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. शिवसैनिक संतोष परब यांच्यावर हल्ला प्रकरणातील संशयित असलेल्या आमदार नितेश राणे यांच्या जामीन अर्जावरील आजची सुनावणी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या दुखवट्याच्या सुट्टीमुळे एक दिवसांनी पुढे गेली आहे. ही सुनावणी उद्या म्हणजेच मंगळवारी होणार आहे. यामुळे …

Read More »

पत्नी तब्बल सहा वर्ष पतीला जेवणातून देत होती विष; कारण वाचून पतीसह पोलिसही चक्रावले

पत्नीने तब्बल सहा वर्ष पतीला जेवणातून विष दिल्याचं समोर आलंय. पती पत्नीचं भांडण आणि वाद तुम्ही ऐकले असतील. प्रत्येक जोडप्यात छोटे-मोठे वाद होतात. काही वाद विकोप्याला जातात आणि त्यातून काहीतरी वाईट घडल्याचं तुम्ही ऐकलं असेल. अशाच एका घटनेत पत्नीने तब्बल सहा वर्ष पतीला जेवणातून विष दिल्याचं समोर आलंय. पण तिचं विष देण्यामागचं कारण ऐकून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. केरळमधील …

Read More »

तुम्ही ह्या चिमुरडीला ओळखलंत ? आणखी एका सोशल स्टारची मराठी मालिकेत एन्ट्री – Bolkya Resha

bolkya 32 seconds ago जरा हटके 1 Views टिक टॉक स्टार असो किंवा रील व्हीडीओजच्या माध्यमातून अनेक कलाकारांना आजवर अभिनयाची संधी मिळाली आहे. या कलाकारांना मालिकांमधून मुख्य नायिकेच्या भूमिका साकारण्याची संधी देखील मिळताना दिसत आहे मग यात बालकलाकार कसे मागे राहतील. कारण हे बालकलाकार सध्या मराठी मालिकांमधील दुवा बनलेले पाहायला …

Read More »

संसदेत आजचा दिवस गाजण्याची चिन्हं; मोदी देणार आभार प्रस्तावाला उत्तर तर अमित शाह…

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज लोकसभेत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर देतील. संध्याकाळी पंतप्रधान मोदींचे भाषण होण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रपती कोविंद यांनी ३१ जानेवारी रोजी लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त अधिवेशनाला केलेल्या अभिभाषणाने झाली. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला भाग ३१ जानेवारी ते ११ फेब्रुवारी आणि दुसरा भाग १४ मार्च ते ८ एप्रिलपर्यंत चालणार आहे. …

Read More »

गलवान संघर्षातील शहीद नायक दीपक सिंह यांची पत्नी होणार लष्करी अधिकारी; पाच दिवसांच्या मुलाखतीनंतर परीक्षा उत्तीर्ण

शहीद दीपक सिंह बिहार रेजिमेंटच्या १६ व्या बटालियनमध्ये होते. गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांना हुसकावून लावताना ते शहीद झाले होते पूर्व लडाखच्या गलवान व्हॅलीमध्ये १५ जून २०२० रोजी चीनसोबत झालेल्या संघर्षात शहीद झालेले बिहारचे नाईक दीपक सिंह यांची २३ वर्षीय पत्नी रेखा देवी यांनीही आपल्या पतीच्या मार्गावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. रेखा देवी या मूळच्या मध्य प्रदेशातील रीवा येथील असून त्यांनी …

Read More »

लतादीदींच्या निधनाने नगरकर भावूक

नगर : स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनाने नगरकरही शोकाकुल झाले. शहरात अनेक भागात फलक लावून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सोनानगर भागातील महिला भजनी मंडळाने त्यांच्या अंतयात्रेसमयी भजने व त्यांची भक्तिगीते गाऊन श्रद्धांजली अर्पण केली. चित्रावरील सही राहिली.. जादूई आवाजाची दैवी देणगी लाभलेल्या स्वरसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर यांच्या गाण्यांनी जगभरातील श्रोत्यांचे भावविश्व समृद्ध केले. लताजी म्हणजे गान सरस्वतीच. एक कलाकार …

Read More »

Lata Mangeshkar : अजिंक्य स्वर

चंद्रकांत काळे स्वत:ला केवळ गायक म्हणवून घेणं अशी तुमची योग्यता नसतेच कारण ही योग्यता दहा-बारा गाण्यांनी मिळवताच येत नाही ना? स्वत:च्या मागे पंडित किंवा गायक लावणं ही मला मोठी तपस्या वाटते. पण कधी कधी नियती तुमच्याबरोबर कल्पनेपलीकडचे खेळ खेळते. तुमची मस्त थट्टा-मस्करी करते. कलावंत म्हणून तुमच्यावर वाकडे तिकडे फराटे मारण्याची आचरट लहर तिला येते. नियती तुमचं बोट धरून खेचत खेचत …

Read More »

“एकच संदेश, शेतकरी विरोधी भाजपाला शिक्षा द्या”, संयुक्त किसान मोर्चाचा हल्लाबोल

देशातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संयुक्त किसान मोर्चाच्या शेतकरी नेत्यांनी पत्रकार परिषद घेत भाजपाला शेतकरी विरोधी म्हटलंय. तसेच शेतकरी विरोधी भाजपा विरोधात मतदान करून त्यांना शिक्षा द्या, असं आवाहन केलंय. हन्नान मोल्ला, योगेंद्र यादव आणि राकेश टिकैत यांनी मेरठमध्ये पत्रकार परिषद घेत संयुक्त किसान मोर्चाची भूमिका स्पष्ट केली. योगेंद्र यादव यांनी म्हटलं, “आज (६ फेब्रुवारी) क्रांतीचं ठिकाण असलेल्या मेरठमध्ये संयुक्त …

Read More »

Pro Kabaddi League : पाटणा पायरेट्स सुसाट; बंगालला ३८-२९ असं हरवलं!

पाटणा पायरेट्सने प्रो कबड्डी लीगच्या (PKL 8) ९८व्या सामन्यात बंगाल वॉरियर्सचा ३८-२९ असा पराभव केला. या सामन्यातही पाटणा पायरेट्सने ८व्या हंगामातील आपला उत्कृष्ट फॉर्म कायम ठेवला आणि बंगाल वॉरियर्सला एकही संधी दिली नाही. मोहम्मदर्झा शादलूने सलग तिसऱ्या सामन्यात चमकदार कामगिरी करत हाय ५ पूर्ण केला. पूर्वार्धानंतर पाटणा पायरेट्सचा संघ २१-११ असा आघाडीवर होता. पायरेट्सने १८व्या मिनिटाला बंगाल वॉरियर्सला ऑलआऊट केले …

Read More »

तुम्ही ६४ हजार रूपयांमध्ये खरेदी करू शकता Nissan Magnite XE, जाणून घ्या काय आहेत फीचर्स आणि EMI

अलिकडच्या वर्षांत देशातील कार क्षेत्रात मध्यम आकाराच्या SUV ची मागणी प्रचंड वाढली आहे, ज्याच्या पार्श्वभूमीवर ऑटोमेकर्सनी SUV सेगमेंटमध्ये त्यांच्या कार लॉंच करण्यास सुरुवात केली आहे. SUV सेगमेंटमध्ये उपस्थित असलेल्या मध्यम आकाराच्या SUV मध्ये आज आम्ही Nissan Magnite बद्दल बोलत आहोत, जी आकर्षक डिझाइन आणि प्रीमियम वैशिष्ट्यांसह एक SUV आहे. Nissan Magnite च्या XE व्हेरिएंटच्या सुरुवातीची किंमत ५,७६,५०० रुपये आहे जी …

Read More »

खतरनाक सापाला वनविभागाच्या महिला अधिकाऱ्याने काही सेकंदात केलं कंट्रोल, पाहा हा VIRAL VIDEO

साप कुठलाही असो, त्याला बघून सर्वांची घाबरगुंडी उडते. मात्र वनविभागाच्या एका महिला अधिकाऱ्याने एका विषारी सापाला इतक्या सहजतेने कंट्रोल केलं आहे की, ते पाहून तुमचे डोळे विस्फारून जातील. भारतासह जगात असे विषारी साप आहेत, ज्यांना पाहून भल्या भल्यांना घाम फुटतो. कदाचित तुम्हाला माहिती नसेल की आपल्या आजूबाजूला असे अनेक साप आहेत जे अजिबात विषारी नसतात, म्हणजेच त्यांच्या दंशाने तुमची हानी …

Read More »

IND vs WI : विराट कोहलीने आठ धावांवर बाद होऊनही रचला इतिहास; सचिनला मागे टाकले

भारतीय संघाचा फलंदाज विराट कोहली वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्याच सामन्यात केवळ चार चेंडू खेळून पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. पण त्याआधीच त्याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. हा विक्रम करणारा विराट कोहली आता जगातील पहिला फलंदाज बनला आहे, ज्याने भारतातच ५००० एकदिवसीय आंतरराष्ट्रीय धावा केल्या आहेत. वेस्ट इंडिजविरुद्ध विराट कोहली चार चेंडूत आठ धावा करून बाद झाला, …

Read More »

“लता मंगेशकर मला फोन करून म्हणाल्या होत्या…” बाळासाहेब थोरातांकडून आठवणींना उजाळा

राज्याचे महसूल मंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांच्या निधानवर दुःख व्यक्त केलं. राज्याचे महसूल मंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांच्या निधानवर दुःख व्यक्त केलं. तसेच आपल्या आठवणींना उजाळा दिला. माझे आणि लता मंगेशकर यांचे घर जवळजवळ असूनही त्यांची भेट झाली नसल्याचं म्हटल्यानंतर त्यावर लता मंगेशकर यांच्या प्रतिक्रियेची आठवणही …

Read More »

अभिनेता अल्लू अर्जुनने लतादीदींना वाहिली श्रद्धांजली फोटो शेअर करत, म्हणाला…

अल्लू अर्जुनने शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. भारतरत्न आणि भारताच्या गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचं आज निधन झालं. वयाच्या ९२ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. लता मंगेशकर यांच्या निधनामुळे संपूर्ण भारतात शोककळा पसरली आहे. फक्त बॉलिवूड नाही तर सगळेच सोशल मीडियावरून त्यांना श्रद्धांजली देत आहेत. त्यात …

Read More »

खासदार ओवेसींच्या दीर्घायुष्यासाठी १०१ बकऱ्यांचा बळी; हैदराबादमधील धक्कादायक प्रकार

लोकसभा खासदार आणि एआयएमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी रविवारी हैदराबादच्या बाग-ए-जहानारा येथे एका व्यावसायिकाने १०१ बकऱ्यांचा बळी दिला. बकऱ्यांच्या बळी देण्यासाठी कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. त्याआधी उत्तर प्रदेशातील हापूर येथून नवी दिल्लीस जात असताना वाहनावर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर एमआयएमचे खासदार असादुद्दीन ओवेसी यांना केंद्र सरकारने दिलेली झेड दर्जाची सुरक्षा त्यांनी नाकारली होती. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, …

Read More »

‘ए मेरे वतन के…’ गाण्याचे लेखक कवी प्रदीप यांची जन्मतारीख आणि लता मंगेशकर यांचं निधन; अजब योगायोग

Lata Mangeshkar: लतादीदींना पहिली प्रसिद्धी कवी प्रदीप यांच्या ‘ए मेरे वतन के लोगों’ क्लासिक गाण्यातून मिळाली. आज देश रडत आहे. लता मंगेशकर यांनी नवीन गायिका म्हणून ए मेरे वतन के लोगों हे गाणे गायले होते त्या दिवशीही देश रडला होता. तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंच्या डोळ्यातही अश्रू आले होते. लतादीदींचे हे अजरामर गाणे कवी प्रदीप यांनी लिहिले आहे. कवी प्रदीप यांचे …

Read More »

“अगदी काही दिवसांपूर्वी आपण मला फोन केला…,” लतादीदींच्या आठवणी शेअर करत समीर चौगुलेने वाहिली श्रद्धांजली

लता मंगेशकर यांनी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कॉमेडी शो पाहून समीर चौगुलेला फोन केला होता. भारतरत्न आणि भारताच्या गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचं आज निधन झालं. वयाच्या ९२ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. लता मंगेशकर यांच्या निधनामुळे संपूर्ण भारतात शोककळा पसरली आहे. फक्त बॉलिवूड नाही तर सगळेच सोशल मीडियावरून त्यांना श्रद्धांजली देत …

Read More »

लता मंगेशकरांनी इशा अंबानीच्या लग्नासाठी रेकॉर्ड केलं होतं शेवटचं ‘हे’ गीत

लतादीदी यांनी शेवटचं गीत इशा अंबानीच्या लग्नासाठी रेकॉर्ड केलं होतं. भारताच्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे रविवारी निधन झाले. वयाच्या ९२व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृती ठिक नसल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून लता मंगेशकर यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. दरम्यान वय जास्त झाल्याने लतादीदी गाणी गात नव्हत्या. …

Read More »

जाणून घ्या, मेंदूच्या नसांमध्ये कमकुवतपणा का येतो? करू नका दुर्लक्ष

मेंदूला दुखापत झाल्याने शरीरातील काही पोषक घटकांची कमतरता आणि नसांवर दबाव यांमुळेही मेंदूला वेदना होतात. मानवी शरीरात सर्व अवयव आवश्यक आहेत, परंतु सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याचे मन. कारण याद्वारे संपूर्ण शरीर आज्ञा घेते आणि कार्य करते. अशा स्थितीत मन निरोगी ठेवणे खूप गरजेचे आहे. मेंदू सर्व मज्जातंतूंशी जोडलेला आहे आणि त्यात थोडासा अडथळा देखील संपूर्ण शरीराच्या कार्यावर परिणाम करू …

Read More »