Electricity Saving : उन्हाळ्यात विजेच्या बिलाने त्रस्त आहात? ही तीन उपकरणं हटवताच होईल मोठी बचत

नवी दिल्ली : How to Electricity bill in Summer : उन्हाळ्यात बहुतेक सर्वांच्याच घरी वीज बिल भरमसाठ येऊ लागतं आणि यामागील मुख्यकारण म्हणाल तर उन्हाळ्याच्या हंगामात प्रत्येक इलेक्ट्रॉनिक उपकरणं अधिक वापरली जातात. खासकरुन पंखा, एसीतर दिवसभर सुरु असतो. आता तुम्हीही जर उन्हाळ्यात भरमसाठ वीज बिलाने त्रस्त असात तर आज आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुमच्या घराचे वीज बिल कमी येऊ शकते. किचनमधील चिमणी
तर उन्हाळ्यात (Summer) आपण किचनमधील चिमणीचाही खूप वापर करतो. त्यामुळे विजेचा वापरही खूप वाढू लागतो. यामुळेच चिमणी वापरताना अनेक गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागते. गरज नसेल तर लगेच थांबवा. चिमणीच्या ऐवजी तुम्ही सामान्य पंखा देखील वापरू शकता, यामुळे विजेचीही बचत होईल.

एसी
त्यानंतर आणखी एक वाढीव बिलासाठी जबाबदार गोष्ट म्हणाल तर उन्हाळ्यात एसी हेही एक प्रमुख कारण बनतं. एसी वापरतानाही तुम्हाला अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. नॉर्मल एसीऐवजी इन्व्हर्टर एसीही वापरता येईल. पीसीबी इन्व्हर्टर एसीमध्ये बसवलेले आहे आणि ते वीज बचतीसाठी सर्वात उपयुक्त ठरते. यामुळेच आता जास्त एसी इनव्हर्टर येत आहेत आणि लोक त्याचा वापरही करू लागले आहेत.

हेही वाचा :  कमालच म्हणावी या Air Conditioner ची; किती कमी बिल देतो माहितीये?

वाचाः Phone Hacked: ‘या’ पाच गोष्टी होत असतील तर समजा हॅक झालाय तुमचा फोन, होऊ शकतो मोठा तोटा

गीझर
गीझरमुळे देखील वीज बिल खूप जास्त येतं. उन्हाळ्यात गिझरचा वापर अधिक केला जात नसला तरी हिवाळ्याच्या हंगामात हे देखील एक मोठे कारण बनते. खासकरुन गीझरची गरज नसतानाही तो चालू ठेवला जातो आणि त्यातून विजेचा वापर अधिक होत असल्याने बिलही जास्त येते. त्यामुळे गीझरचा केवळ गरजेपुरता वापर करुन वीज बिल कमी करता येऊ शकते.

वाचाः Jio ची भन्नाट ऑफर, ९१ रुपयांमध्ये अनलिमिटेड कॉलिंगसोबत OTT आणि बरच काही…

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

मुंबईत मराठी-गुजराती वाद पेटला! आदित्य ठाकरे आक्रमक; मराठी उमेदवाराला प्रचार न करु दिल्याचा आरोप

Loksabha Election 2024 : नोकरीसाठी मराठी माणूस नको ही एका एचआरची पोस्ट व्हायरल झालेली असतानाच …

‘बाळासाहेब असते तर उबाठाला धू धू धुतलं असतं’ सीएम शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना असं का म्हटलं?

Shinde vs Thackeray : ‘काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी मुंबई 26/11 हल्ल्यातील (Mumbai 26/11) शहिद …