majhinews

“पं. दिनानाथ मंगेशकर बाजूला झाले आणि म्हणाले हिचे गाणे ऐका..”; लतादीदींच्या पहिल्या कार्यक्रमाच्या सोलापूरकरांनी जागवल्या आठवणी

भारतरत्न आणि भारताच्या गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचं निधन झालं आहे. वयाच्या ९२ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृती बिघडल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. लता मंगेशकर यांच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. यावेळी सोलापूरकरांनी त्यांच्या आयुष्यातील पहिल्या कार्यक्रमाच्या आठवणींना उजाळा दिला आहे. लतादीदींचा नाट्यसंगीत आणि शास्त्रीय …

Read More »

लोकसत्ता विश्लेषण : राष्ट्रीय दुखवटा म्हणजे काय? शासकीय इतमामात अंत्यसंस्कार कधी केले जातात?

लता मंगेशकर यांच्या निधनानंतर दोन दिवस राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला असून राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकावला जाणार आहे भारतरत्न आणि भारताच्या गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचं निधन झालं आहे. ९२ वर्षीय लता मंगेशकर यांनी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. कोविड पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्यांना ८ जानेवारी रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल केंद्र …

Read More »

लातूर: दोन दलित तरुणांनी मंदिरात प्रवेश केल्यानं वाद; गावकऱ्यांचा दलित समुदायावर बहिष्कार

लातूर जिल्ह्यातील एका गावात गावकऱ्यांनी मंदिर प्रवेशाशी संबंधित वादावरून स्थानिक दलित समुदायावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याची घटना घडली आहे. यावरून गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. दरम्यान, शांतता समितीच्या बैठकीनंतर हा वाद मिटला असून परिस्थिती आता सामान्य झाल्याचे पोलिसांनी शनिवारी सांगितले. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, तीन दिवसांपूर्वी निलंगा तहसीलमधील ताडमुगली गावात दोन दलित तरुणांनी हनुमान मंदिरात प्रवेश करून नारळ फोडला. …

Read More »

Lata Mangeshkar Passes Away : लतादीदींच्या अंत्यदर्शनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येणार

Lata Mangeshkar Death : संध्याकाळी साडेसहा वाजता लतादीदींवर शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. Lata Mangeshkar Passes Away : पंतप्रधान नरेंद्र मोदी लतादीदींच्या अंत्यदर्शनासाठी मुंबईत येणार आहेत. दुपारी चार वाजता ते मुंबई विमानतळावर दाखल होतील आणि ५ वाजता शिवाजी पार्क येथे अंत्यदर्शनासाठी पोहचतील. त्यानंतर संध्याकाळी साडेसहा वाजता लतादीदींवर अंत्यसंस्कार होणार आहेत. भारताच्या गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचे आज निधन …

Read More »

महाराष्ट्र सरकार हे कसे सहन करते असा प्रश्न पडतो; संजय राऊतांचं रोखठोक

अनिल देशमुख हे माजी गृहमंत्री ईडीच्या कारवाईमुळे तुरुंगात आहेत. इतरही मंत्री देशमुखांच्या बाजूच्या कोठडीत लवकरच जातील, अशी धमकी काही मंडळी केंद्रीय पोलिसांच्या संरक्षणात देतात तेव्हा महाराष्ट्र सरकार हे कसे सहन करते, असा प्रश्न पडतो. राज्याचे पोलीस, राज्यातील प्रशासन, राज्यातील आर्थिक गुन्हे विभाग यांना न जुमानता केंद्रीय तपास यंत्रणा एखाद्या राज्यात मनमानी करीत असतील तर भाजपविरोधी मुख्यमंत्र्यांनी एकत्र यायला हवे असं …

Read More »

Lata Mangeshkar Passes Away : केवळ स्वर नाही, तर भारतीय संगीताचा आत्मा हरपला – देवेंद्र फडणवीस

Lata Mangeshkar Death : “त्या स्वर्गातूनही सुरांची बरसात नक्कीच करतील”, असंही फडणवीस म्हणाले आहेत. Lata Mangeshkar Passes Away : “लतादीदी मंगेशकर यांच्या निधनाने केवळ स्वर नाही, तर भारतीय संगीताचा आत्मा हरपला आहे. भारतीय संगीताचे हे दैवत आज आपल्यात नाही, ही कल्पनाच करवत नाही. ईश्वराने भारताला दिलेली अमूल्य देणगी हिरावून घेतली आहे. आपल्या आयुष्यातील अविभाज्य घटक हरपला आहे. ” अशा शब्दांमध्ये …

Read More »

रंग माझा वेगळा मालिकेतील या लोकप्रिय अभिनेत्याच्या डाव्या पायाला दुखापत – Bolkya Resha

bolkya 34 mins ago जरा हटके 11 Views स्टार प्रवाहवरील वाहिनीच्या बहुतेक सर्वच मालिका टीआरपीच्या बाबतीत अग्रेसर राहिल्या आहे. त्यात विशेष म्हणजे रंग माझा वेगळा या मालिकेने गेल्या अनेक महिन्यांपासून पहिल्या क्रमांकावर स्थान पटकावले आहे. त्यामुळे ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका ठरली आहे. मालिकेत दीपा आणि कार्तिक पुन्हा एकत्र कधी …

Read More »

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं खरं नाव माहितीये का?

भारतरत्न आणि भारताच्या गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचं आज निधन झालं. वयाच्या ९२ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. लता मंगेशकर यांच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. लता मंगेशकर यांनी असंख्य चित्रपटांना आपला आवाज दिला. त्यांच्या गोड आवाजामुळे आज लाखो गाणी अजरामर झाली आहेत. त्यामुळे त्यांच्या गाण्याविषयी तर साऱ्यांनाच ठाऊक आहे. …

Read More »

Petrol- Diesel Price Today: IOCL ने जाहीर केले नवे दर; जाणून घ्या तुमच्या शहरातला आजचा भाव

पेट्रोल भरायला जाण्याआधी महाराष्ट्रातील तुमच्या शहरातील पेट्रोल- डिझेलचा प्रति लिटरचा आजचा भाव किती आहे ते जाणून घ्या. Petrol and diesel price today: महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात – जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक …

Read More »

U19 WC Final : वर्ल्डकप जिंकताच BCCIच्या जय शाहंची ‘मोठी’ घोषणा; प्रत्येक खेळाडूला मिळणार…!

भारत पाचव्यांदा अंडर १९ विश्वविजेता बनला आहे. भारताने अंतिम सामन्यात इंग्लंडला हरवत पाचव्यांदा अंडर १९ क्रिकेट वर्ल्डकप पटकावला. स्पर्धेत दमदार कामगिरी केलेल्या भारताच्या यंगिस्तानचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. अनेकजण ट्विटर, सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतीय संघ आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सदस्यांचे अभिनंदन करत आहेत. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी भारताच्या या विश्वविजेत्या खेळाडूंसाठी आणि सपोर्ट स्टाफसाठी बक्षिसांची घोषणा केली आहे. …

Read More »

पूर्व विदर्भात आठ वर्षातील ‘डेंग्यू’चा उच्चांक!; वर्ष २०१४ नंतर सर्वाधिक मृत्यू २०२१ मध्ये 

|| महेश बोकडे वर्ष २०१४ नंतर सर्वाधिक मृत्यू २०२१ मध्ये  नागपूर :  पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांत २०२१ मध्ये करोना, म्युकरमायकोसीसनंतर डेंग्यूचाही उद्रेक झाला. वर्ष २०१४ नंतर येथे २०२१ या वर्षी सर्वाधिक डेंग्यूचे रुग्ण  नोंदवले गेले. सोबतच २०२१ या वर्षी सर्वाधिक २४ डेंग्यूग्रस्तांचा मृत्यू झाला. पूर्व विदर्भात नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली हे सहा जिल्हे येतात. येथे २०१४ मध्ये डेंग्यूचे …

Read More »

काश्मीर खोऱ्यातील मतदारसंघांत फेरबदल; पुनर्रचनेबाबतचा सीमांकन आयोगाचा अहवाल तयार

पुनर्रचनेबाबतचा सीमांकन आयोगाचा अहवाल तयार जम्मू-काश्मीरमधील विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघांच्या फेररचना अहवालाचा मसुदा सीमांकन आयोगाने सहयोगी सदस्यांकडे सूचना आणि मतांसाठी पाठवल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली. जम्मू भागातील राजौरी आणि पूंछ यांचा समावेश करून अनंतनाग लोकसभा मतदारसंघाची फेररचना करण्याचा, तसेच काश्मीर विभागात फार मोठय़ा प्रमाणावर बदल करण्याचा प्रस्ताव या विस्तृत अहवालाद्वारे देण्यात आला आहे. भाजपची ही राजकीय खेळी असल्याचा आरोप …

Read More »

पाकव्याप्त काश्मीर भारताकडे सोपविणे इतकाच मुद्दा शिल्लक !; पाकिस्तानच्या ‘टूलकिट प्रयोगा’वर केंद्राची भूमिका

 ‘१९४७ सालच्या फाळणीच्या मध्यरात्रीपासून, जम्मू व काश्मीर हा भारताचा भाग असल्याची बाब पाकिस्तान स्वीकारू शकलेला नाही पाकिस्तानच्या ‘टूलकिट प्रयोगा’वर केंद्राची भूमिका पाकिस्तानने शनिवारी ‘काश्मीर ऐक्य दिवस’ साजरा केला असतानाच, काश्मीरच्या मुद्दय़ावर जगभरातून पाठिंबा मिळवण्यासाठी टूलकिट्स तयार करणाऱ्या आमच्या ‘शत्रुराष्ट्राच्या’ अशा ‘नव्या प्रयोगांमुळे’ भारताला घाबरवले जाऊ शकत नाही, असे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले.  भारत व पाकिस्तान यांच्यात काही प्रलंबित …

Read More »

जिओची माफी मागण्याची हटके स्टाईल, ‘या’ भागातील ग्राहकांना २ दिवस अनलिमिटेड डाटा!

ग्राहकांना काही काळासाठी झालेल्या या त्रासाबद्दल जिओने हटके स्टाईलने माफी मागितली आहे. तसेच अडथळ्याला सामोरं जावं लागलेल्या ग्राहकांसाठी खास घोषणा केलीय. जिओच्या नेटवर्कमध्ये शनिवारी (५ फेब्रुवारी) काही तांत्रिक दोषांमुळे अडथळे आले. त्यामुळे मुंबईसह काही भागातील जिओ ग्राहकांचा सेवा ठप्प झाली. यानंतर काही वेळातच हा तांत्रिक दोष दुरुस्त करून सेवा सुरळीत करण्यात आली. मात्र, ग्राहकांना काही काळासाठी झालेल्या या त्रासाबद्दल जिओने …

Read More »

खासदार उदयनराजेंकडून पुण्यात अजित पवार यांची भेट, निवेदन देत केली ‘ही’ मागणी

खासदार उदयनराजे भोसले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुणे येथे भेट घेतली. यावेळी उदयनराजेंनी अजित पवार यांना प्रस्ताव देत सातारा पालिकेच्या नवीन वाढीव हद्दीतील विकास कामांना प्राथमिक सोयी सुविधांसाठी ५० कोटी रुपयांचा निधी देण्याची मागणी केली. यावेळी मुख्याधिकारी अभिजित बापट देखील उपस्थित होते. सातारा पालिकेच्या हद्दवाढीतील भागात सोयी सुविधा पुरविण्यासाठी राज्य शासनाने ४८ कोटी ५० लाख रुपये इतके अनुदान उपलब्ध …

Read More »

“किरीट सोमय्या यांना ठार मारण्याचा हेतू होता, हे गुंडाराज…”, चंद्रकांत पाटलांचा गंभीर आरोप

चंद्रकांत पाटील यांनी किरीट सोमय्या यांना ठार मारण्याचा हेतू असल्याचा गंभीर आरोप केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या तब्येतीची पुण्यातील संचेती रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. तसेच डॉक्टरांकडून सोमय्या यांच्या दुखापती आणि उपचार याची माहिती घेतली. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी किरीट सोमय्या यांना ठार मारण्याचा हेतू असल्याचा गंभीर आरोप केला. तसेच केंद्राची सुरक्षा व्यवस्था नसती, तर …

Read More »

शिवसैनिकांच्या हल्ल्यानंतर किरीट सोमय्या संचेती रुग्णालयात दाखल, डॉक्टर म्हणाले, “मानसिक धक्का बसल्याने…”

पुण्यात शिवसैनिकांनी हल्ला केल्यानंतर भाजपा नेते किरीट सोमय्या संचेती हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. या ठिकाणी त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. पुण्यात शिवसैनिकांनी हल्ला केल्यानंतर भाजपा नेते किरीट सोमय्या संचेती हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. या ठिकाणी त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तसेच आवश्यक उपचारही करण्यात आले. यानंतर संचेती हॉस्पिटलचे डॉ. पराग संचेती यांनी किरीट सोमय्या यांच्या प्रकृतीविषयी माध्यमांना माहिती दिली. यात त्यांनी अचानक …

Read More »

या प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीच्या गाडीला अपघात थोडक्यात जीव वाचला – Bolkya Resha

मराठी सृष्टीतील प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री किशोरी शहाणे यांच्या गाडीला काही दिवसांपूर्वीच अपघात झाला होता. या अपघातादरम्यान गाडीचे खूप मोठे नुकसान झाले असल्याचे फोटोवरून तुमच्या लक्षात येईल. किशोरी शहाणे यांचे पती दीपक बलराज वीज हे चार चाकी वाहनाने प्रवास करत होते ते स्वतः गाडी चालवत होते. पुण्यातील गिरीवन ठिकाणाहून जात असताना पवना लेक, लोणावळा या परिसरात असताना समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने …

Read More »

वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या वनडेपूर्वी ऋषभ पंत झाला मालामाल; मिळणार ‘इतके’ कोटी!

उद्या रविवारी (६ फेब्रुवारी) होणाऱ्या भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यापूर्वी यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने करोडोंचा करार केला आहे. पंतने क्रिकेट किट बनवणारी कंपनी SG (Sanspareils Greenlands) सोबत ७ वर्ष जुन्या बॅट प्रायोजकत्व कराराचे नूतनीकरण केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा भारतातील सर्वात मोठा बॅट- प्रायोजकत्व करार आहे. पंत आता विराट कोहली आणि रोहित शर्मानंतर बॅट एंडोर्समेंटद्वारे भारतातील तिसरा …

Read More »

विद्यार्थी आंदोलन : ‘हिंदुस्थानी भाऊ’च्या पोलीस कोठडीत १४ दिवसांची वाढ

त्याला १ फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली होती. दहावी-बारावीची परीक्षा रद्द करण्यासाठी सोमवारी म्हणजेच ३१ जानेवारी २०२२ रोजी मुंबई, पुणे आणि नागपुरातील हजारो विद्यार्थ्यांनी केलेल्या हिंसक निदर्शनांच्या प्रकरणामध्ये हिंदुस्तानी भाऊला चार फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. दरम्यान, त्याच्या कोठडीत १४ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. सोशल मीडियावर प्रसिद्ध असणारा हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास पाठकने या विद्यार्थांना दिलेल्या चिथावणीमुळे शेकडो …

Read More »