मराठी सृष्टीतील प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री किशोरी शहाणे यांच्या गाडीला काही दिवसांपूर्वीच अपघात झाला होता. या अपघातादरम्यान गाडीचे खूप मोठे नुकसान झाले असल्याचे फोटोवरून तुमच्या लक्षात येईल. किशोरी शहाणे यांचे पती दीपक बलराज वीज हे चार चाकी वाहनाने प्रवास करत होते ते स्वतः गाडी चालवत होते. पुण्यातील गिरीवन ठिकाणाहून जात असताना पवना लेक, लोणावळा या परिसरात असताना समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली.

सुदैवाने या अपघातात दीपक वीज थोडक्यात बाचावले आहेत मात्र भरधाव येणारी ट्रक त्यांच्या गाडीला जोरदार धडकल्याने वाहनाचे खूप मोठे नुकसान झाले आहे. ही घटना साधारण दहा दिवसांपूर्वी घडली होती मात्र आज किशोरी शहाणे यांनी या घटनेची बाब सोशल मीडियावर शेअर केली आहे. ‘जाको राखे साईंया मार सके ना कोय’ असे म्हणत आम्ही या अपघातातून सुखरूप बचावलो असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अपघातात कुठलीही दुखापत झाली नसली तरी हा अपघात झाल्यानंतर गाडीची अवस्था मात्र कशी होती याची माहिती देऊन त्यांनी घटनास्थळाचा एक फोटो शेअर केला आहे. अभिनेत्री किशोरी शहाणे यांनी मराठी तसेच हिंदी सृष्टीतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. त्यामुळे मराठी प्रेक्षकांसोबतच हिंदी प्रेक्षकांनी देखील त्यांना अपघातातून बचवल्या म्हणून त्यांच्याप्रती सहानुभूती दर्शवली आहे. ‘दुर्गा झाली गौरी’ या नाटकातून किशोरी शहाणे यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. अकरावी इयत्तेत शिकत असताना त्यांनी ‘प्रेम करूया खुल्लम खुल्ला’ या चित्रपटातून पदार्पण केले होते.

मराठी सृष्टीत अभिनयाचा ठसा उमटवल्यानंतर ‘घर एक मंदिर’, ‘ जस्सी जैसी कोई नही’, आणि ‘सिंदूर’ या हिंदी मालिकांमधुन त्यांनी महत्वाच्या भूमिका बजावल्या. ‘प्रेम करुया खुल्लम खुल्ला’, ‘वाजवा रे वाजवा’, ‘बाळाचे बाप ब्रह्मचारी’, ‘सगळीकडे बोंबाबोंब’ अशा अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं आहे. हप्ता बंद या चित्रपटात काम करत असताना चित्रपटाचे दिग्दर्शक दीपक बलराज वीज यांच्याशी मैत्री जुळली आणि या मैत्रीचे पुढे प्रेमविवाहात रूपांतर झाले. चित्रपट, मालिका असा प्रवास त्यांचा सुरू असतानाच मराठी बिग बॉसच्या दुसऱ्या सिजनमध्ये त्यांना सहभागी होण्याची संधी मिळाली. बिग बॉसच्या घरातील त्यांचा एकूणच वावर प्रेक्षकांना देखील आवडला होता.