फेब्रुवारी 29, 2024

“किरीट सोमय्या यांना ठार मारण्याचा हेतू होता, हे गुंडाराज…”, चंद्रकांत पाटलांचा गंभीर आरोप

चंद्रकांत पाटील यांनी किरीट सोमय्या यांना ठार मारण्याचा हेतू असल्याचा गंभीर आरोप केला.

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या तब्येतीची पुण्यातील संचेती रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. तसेच डॉक्टरांकडून सोमय्या यांच्या दुखापती आणि उपचार याची माहिती घेतली. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी किरीट सोमय्या यांना ठार मारण्याचा हेतू असल्याचा गंभीर आरोप केला. तसेच केंद्राची सुरक्षा व्यवस्था नसती, तर किरीट सोमय्या यांना श्रद्धांजली वाहावी लागली असती, असं म्हटलं.

चंद्रकांत पाटील, “किरीट सोमय्या यांना ठार मारण्याचा हेतू होता. सोमय्या यांना मारण्याची पूर्ण तयारी झाली होती. हे गुंडाराज असून आज सोमय्यांना श्रद्धांजली वाहण्याची वेळ आली असती. हल्ला झाले त्यावेळी पोलीस काय करत होते? किरीट सोमय्यांवर हल्ला करून काहीही होणार नाही. ही घटना लक्षात घेता पुणे पोलिसांनी ‘सुमोटो’ गुन्हा दाखल करावा. कारण ही दंगल आहे. निषेध शब्द बोथट असून आम्ही स्वस्थ बसणार नाही.”

हेही वाचा :  कुस्ती महासंघाला मोठा झटका, नॅशनल चॅम्पियनशिपवर बहिष्कार टाकून अनेक खेळाडू आंदोलनात सहभागी

“असे १०० जण खिशात घेऊन फिरतो”

“किरीट सोमय्या यांची रुग्णालयात भेट घेऊन त्यांच्यासोबत भविष्यातील गोष्टींवर चर्चा झाली. ते देखील या हल्ल्यांना घाबरत नाहीत आणि मी पण घाबरत नाही. असे १०० जण खिशात घेऊन फिरतो,” असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी शिवसेनेवर हल्ला चढवला. तसेच सरकार भाजपा आमदार नितेश राणेंबाबतीत देखील सुडबुद्धीने वागत असल्याचा आरोप केला.

हेही वाचा : शिवसैनिकांच्या हल्ल्यानंतर किरीट सोमय्या संचेती रुग्णालयात दाखल, डॉक्टर म्हणाले, “मानसिक धक्का बसल्याने…”

शिवाजीनगर पोलीस स्टेशनबाहेर भाजपा कार्यकर्त्याचं आंदोलन सुरू

दरम्यान, शिवसैनिकांनी किरीट सोमय्या यांच्यावर केलेल्या हल्ल्याविरोधात कारवाई करण्याच्या मागणीसह भाजपा कार्यकर्त्यांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशनबाहेर आंदोलन सुरू केलं आहे.

नेमकं काय घडलं?

किरीट सोमय्या शनिवारी (५ फेब्रुवारी) आधी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गेले. तिथे त्यांनी पुणे जम्बो कोविड सेंटरमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली. यानंतर सोमय्या तेथून पुणे महानगरपालिकेत आयुक्तांना भेटण्यासाठी आले. त्यावेळी शिवसैनिकांनी किरीट सोमय्या यांना निवेदन स्विकारण्याची मागणी केली. मात्र, सोमय्यांनी हे निवेदन स्विकारलं नाही. यावर आक्रमक शिवसेना कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली.

व्हिडीओ पाहा :

शिवसेना कार्यकर्त्यांनी हल्ला केल्यानंतर पोलिसांनी किरीट सोमय्यांना घटनास्थळावरून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिवसैनिकांच्या धक्काबुक्कीत किरीट सोमय्या पायऱ्यांवर पडले. यानंतर पोलिसांनी सोमय्या यांना तिथून बाजूला नेत गाडीत बसवले.

हेही वाचा :  संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया ; प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले…

पोलिसांनी किरीट सोमय्या यांना गाडीत बसवल्यानंतरही आक्रमक शिवसैनिकांनी सोमय्यांच्या गाडीवरही हल्ला चढवला. काही कार्यकर्ते गाडीच्या समोर आले, तर काही कार्यकर्त्यांनी गाडीच्या मागच्या बाजूने हल्ला केला.

हल्ल्यावर किरीट सोमय्यांची पहिली प्रतिक्रिया

शिवसैनिकांच्या हल्ल्यानंतर किरीट सोमय्या यांनी स्वतः याची माहिती देत ट्वीट केलंय. ते म्हणाले, “माझ्यावर शिवसेनेच्या गुंडांनी पुणे महानगरपालिकेच्या आवारात हल्ला केला आहे.”

Loksatta Telegram

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

“मराठी कलाकार स्वत: सेटवर हिंदीत बोलतात”, अजय-अतुलच्या जोडीतील अतुलने केली तक्रार

मराठी राजभाषा दिनाच्या निमित्तानं दिलेल्या मुलाखतती अतुलने ही तक्रार केली आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि …

Russia – Ukraine War : ठाणे जिल्ह्यातील ३१ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले

हे सर्व विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनमध्ये गेलेले आहेत. ठाणे जिल्ह्यातील विविध शहरांमधील ३१ विद्यार्थी …