लता मंगेशकरांच्या अंत्यदर्शनावेळी थुंकल्याचा शाहरूख खानवर आरोप; नाना पटोले म्हणाले, “मुद्दामहून…”

शाहरूखने शिवाजी पार्कवर येऊन लता मंगेशकर यांच्यासाठी ‘दुवा’ केल्यानंतर त्याला ट्रोल करण्यात आलं. यावर नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली.

भारतरत्न आणि ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांच्या निधनानंतर देशभरातून शोक व्यक्त करण्यात आला. अनेक दिग्गज मान्यवरांनी लता मंगेशकर यांचं अंत्यदर्शन घेत मंगेशकर कुटुंबाचं सांत्वन केलं. यात अभिनेता शाहरूख खानचाही समावेश होता. शाहरूखने शिवाजी पार्कवर येऊन लता मंगेशकर यांच्यासाठी ‘दुवा’ केल्या. मात्र, यावरूनच शाहरूखवर दुवा देताना थुंकल्याचा आरोप करत ट्रोलिंग करण्यात आलं. यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. काही लोक मुद्दामहून इतरांच्या धर्मावर टीका करून स्वतःला मोठं करण्याचा प्रयत्न करत असल्याचं मत नाना पटोले यांनी व्यक्त केलं.

नाना पटोले म्हणाले, “सर्वांना आपआपल्या धर्माप्रमाणे वागण्याचं स्वातंत्र्य आहे. दुसऱ्याच्या धर्मावर टीका करू नये, असं आपलं संविधान सांगतं. मात्र, काही लोक मुद्दामहून इतरांच्या धर्मावर टीका करून स्वतःला मोठं करण्याचा प्रयत्न करतात. हे चुकीचं आहे. काही लोकांनी तर इतरांच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला घालण्याचं कॉन्ट्रॅक्टच घेतलंय. त्याचाच हा परिणाम आहे.”

लता मंगेशकर यांच्या अंत्यदर्शनाला काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांच्या गैरहजेरीवर पटोलेंची प्रतिक्रिया

लता मंगेशकर यांच्या अंत्यदर्शनाला काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची गैरहजेरीवरही नाना पटोले बोलले. ते म्हणाले, “बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, अमित देशमुख हे सर्वजण कोरोना बाधित आहेत. त्यामुळे ते रविवारी (७ फेब्रुवारी) लता दिदींच्या अंत्यदर्शनाच्या ठिकाणी हजर राहू शकले नाहीत. माझ्या बहिणीच्या सासु वारल्यामुळे मी सुद्धा तिकडे होतो. आमचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप तिथे होते.”

हेही वाचा :  Maruti WagonR 2022: कंपनीने गाडीत केला मोठा बदल; आता आधीपेक्षा मिळणार जास्त मायलेज, जाणून घ्या

हेही वाचा : ‘नन्हे पटोले’ म्हणणाऱ्या अमृता फडणवीसांबद्दल विचारलं असता नाना पटोले म्हणाले, “त्या आमच्या…”

“महाराष्ट्रात सध्या तालुक्यात काँग्रेस कमिटीच्या लोकांना आम्ही सूचना दिल्यात. त्यांनी सर्व ठिकाणी रविवारी लतादीदींना श्रद्धांजली अर्पण करण्याचं काम केलंय. अस्लम शेख सुद्धा मुंबईबाहेर होते. वर्षा गायकवाड मुंबई बाहेर होत्या. शनिवार रविवारमुळे अनेकांचे दौरे होते. अनेकांना कनेक्टिव्हिटी नव्हती. त्यामुळे आम्ही पोहोचू शकलो नाही. लतादीदी या काँग्रेस परिवारातल्याच होत्या. त्यांचे योगदान मोठे आहे. आता थोड्या वेळात मी लतादिदींच्या परिवाराचे सांत्वन करायला जातोय,” असंही नाना पटोले यांनी नमूद केलं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.



Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

“मराठी कलाकार स्वत: सेटवर हिंदीत बोलतात”, अजय-अतुलच्या जोडीतील अतुलने केली तक्रार

मराठी राजभाषा दिनाच्या निमित्तानं दिलेल्या मुलाखतती अतुलने ही तक्रार केली आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि …

Russia – Ukraine War : ठाणे जिल्ह्यातील ३१ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले

हे सर्व विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनमध्ये गेलेले आहेत. ठाणे जिल्ह्यातील विविध शहरांमधील ३१ विद्यार्थी …