majhinews

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा : रहाणेची शतकी दावेदारी

रहाणे आणि सर्फराज यांनी सावध फलंदाजी करीत चौथ्या गडय़ासाठी २१२ धावांची भागीदारी करीत डाव सावरला. आगामी श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाचे दरवाजे ठोठावणारी शतकी खेळी अजिंक्य रहाणेने गुरुवारी साकारली. रहाणे आणि सर्फराज खान यांनी नाबाद शतके करून सौराष्ट्रविरुद्धच्या रणजी करंडक क्रिकेट लढतीत मुंबईला पहिल्या डावात ३ बाद २६३ अशा सुस्थितीत राखले. ड-गटाच्या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. पण …

Read More »

भारत-विंडीज ट्वेन्टी-२० मालिका : मालिकाविजयाचे लक्ष्य!

फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागांत दर्जेदार खेळ करत असलेल्या भारतीय संघाचे शुक्रवारी वेस्ट इंडिजविरुद्ध दुसरा ट्वेन्टी-२० सामना जिंकत तीन सामन्यांच्या मालिकेत विजयी आघाडी मिळवण्याचे लक्ष्य आहे. या सामन्यात माजी कर्णधार विराट कोहलीला सूर गवसण्याबाबत भारतीय संघ व्यवस्थापन आशादायी आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने विंडीजवर वर्चस्व गाजवले आहे. तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत निर्भेळ यश मिळवल्यानंतर भारताने ट्वेन्टी-२० …

Read More »

शिवछत्रपती पुरस्कार यंदाही नाही

करोनाच्या साथीमुळे राज्यातील क्रीडा क्षेत्रात प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराला यंदा सलग दुसऱ्या वर्षी फटका बसला आहे. गतवर्षीप्रमाणेच (२०१९-२०) यंदाही (२०२०-२१) शिवछत्रपती पुरस्कार दिले जाणार नाहीत. परंतु करोनातून सावरत क्रीडा स्पर्धा सुरळीत सुरू झाल्यानंतर पुढील वर्षीपासून हे पुरस्कार नियमितपणे दिले जातील, असे आश्वासन राज्याचे क्रीडामंत्री सुनील केदार यांनी गुरुवारी दिले. १९६९-७०पासून राज्यातील क्रीडा क्षेत्रात भरीव योगदान देणारे खेळाडू, …

Read More »

उर्दू घरास मुस्कान खानचे नाव; मालेगाव महापालिकेत ठराव मंजूर

हिजाबप्रकरणी धैर्य दाखविणाऱ्या कर्नाटकातील मुस्कान खान या विद्यार्थिनीचे नाव एका उर्दू घरास देण्याचा सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने आणलेला ठराव गुरुवारी झालेल्या मालेगाव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. महापौर ताहेरा शेख यांच्या अध्यक्षतेखाली आभासी पद्धतीने ही सभा पार पडली. परस्परविरोधी मतप्रवाहांमुळे आठवडाभरापासून नामकरणाचा विषय येथे चर्चेत होता. कर्नाटकातील शैक्षणिक संकुलांमध्ये हिजाब परिधान करण्यास विरोध करण्यावरून उद्भवलेल्या वादामुळे येथील मुस्लीम समाजात तीव्र …

Read More »

समान निधी वाटपाची काँग्रेसची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

राज्यातील शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांचे आघाडी सरकार आहे, परंतु निधी वाटपात काँग्रेसवर अन्याय होत असल्याची भावना त्या पक्षाचे मंत्री, आमदारांमध्ये आहे. तिन्ही पक्षांच्या मंत्र्यांचे विभाग व आमदारांना निधीचे समान वाटप झाले पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे मंत्री व वरिष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. काँग्रेसच्या मंत्र्यांकडील विभागांना पुरेसा निधी मिळत नाही, तसेच आमदारांच्या विकास कामांच्या …

Read More »

“…नाहीतर जिल्ह्यातून हद्दपार करू” म्हणत रायगडमध्ये शिवसेनेचा राष्ट्रवादी काँग्रेसला इशारा

शिवसेनेच्या रायगड जिल्हा कार्यकारणीची बैठक आज अलिबाग येथे पार पडली. “अडीच वर्षे खूप सहन केले आहे. आता मात्र पाणी डोक्यावरून जायला लागले आहे. शिवसेना आमदारांच्या कामांचे श्रेयही पालकमंत्री घेण्याचा प्रयत्न करत आहेत. आता मात्र हे सहन केले जाणार नाही.” असं सांगत, “कोणी पण द्या पण रायगड जिल्ह्याला शिवसेनेचा पालकमंत्री द्या.”, अशी मागणी शिवसेनेच्या रायगड जिल्हा कार्यकारणीने एकमुखाने केली आणि सत्तेत …

Read More »

Pro Kabaddi League : यू मुंबा स्पर्धेबाहेर; यूपी योद्धाची प्लेऑफमध्ये धडक!

प्रो कबड्डी लीगमध्ये यूपी योद्धाने यू मुंबावर ३५-२८ असा रोमांचक विजय नोंदवला. यासह यूपी योद्धाने प्लेऑफमध्ये प्रवेश केला असून यू मुंबाचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. यू मुंबा स्पर्धेबाहेर होणारा चौथा संघ ठरला आहे. पीकेएलमधील यूपी योद्धाचा हा चौथा हंगाम आहे आणि प्रत्येक वेळी संघ प्लेऑफमध्ये पोहोचला आहे. अशी कामगिरी करणारा तो एकमेव संघ ठरला आहे. या सामन्यात परदीप …

Read More »

Punjab Election 2022 : मुख्यमंत्री चन्नी यांच्या ‘यूपी-बिहार के भैया…’ या वक्तव्यावर पंतप्रधान मोदींनी साधला निशाणा, म्हणाले…

भाजपाने व काँग्रेसच्या विरोधी पक्षांनी हा मुद्दा उचलून धरला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांच्या “यूपी, बिहार आणि दिल्ली दे भैये” या विधानावरून काँग्रेसवर निशाणा साधला. अशा “विभाजवादी विचारांच्या” लोकांनी गुरुंचा अपमान केला आहे आणि त्यांना राज्यावर राज्य करण्याचा अधिकार नाही. असं मोदींनी म्हटलं आहे. “अशा विधानांनी त्यांनी (चन्नी) उत्तर प्रदेश आणि बिहारच्या लोकांचाच …

Read More »

विश्लेषण : झोमॅटो, पेटीएमच्या समभागांत का होतेय सातत्याने घसरण?

नवीन वर्षात सुरू असलेली भांडवली बाजारातील पडझड ही बाजारात नव्याने पदार्पण करणाऱ्या नव्या पिढीच्या तंत्रज्ञानाधारित नवउद्यमी कंपन्यांसाठी खूपच मारक ठरली. पेटीएम, पॉलिसीबझार, नायका, झोमॅटो, कारट्रेड टेक या कंपन्यांचे समभाग दणदणीत आपटले. गेल्या काही महिन्यांत अतिभव्य प्रारंभिक भागविक्री आणि त्याला गुंतवणूकदारांकडून दणकेबाज प्रतिसाद मिळवीत अनेक नवीन पिढीच्या कंपन्यांचे समभाग बाजारात सूचिबद्ध झाले. परंतु ताज्या पडझडीत या कंपन्यांच्या समभागांना आता वाली उरला …

Read More »

आदित्य ठाकरेंची सोमय्या-राऊत आरोप-प्रत्यारोपांवर सूचक प्रतिक्रिया; म्हणाले, “राऊतांनी काल मॅच सुरू केली, आता…”!

संजय राऊतांनी किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्यावर शिवसेना भवनातील पत्रकार परिषदेत गंभीर आरोप केले आहेत. किरीट सोमय्या आणि संजय राऊत असा उभा राजकीय सामना सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात रंगताना पाहायला मिळत आहे. एकीकडे भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी संजय राऊत, राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि उद्धव ठाकरे कुटुंबीय यांच्यावर गंभीर आरोप केले असताना दुसरीकडे शिवसेना खासदार संजय …

Read More »

भाजपाला शह देण्यासाठी शिवसेनेची खेळी? आदित्य ठाकरे यांच्या हस्ते स्वा. सावरकर सभागृहाचे उद्घाटन!

कल्यण डोंबिवली महानगर पालिकेतील सावरकर हॉलचं आदित्य ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन! गेल्या दोन आठवड्यांपासून कल्याण-डोंबिवलीमध्ये सावरकरांच्या नावावरून मोठा वाद सुरू झाला आहे. कल्याण-डोंबिवलीमधील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नावाचा प्रभाग नव्या प्रभाग रचनेमध्ये रद्द करण्यात आल्यानंतर त्यावरून भाजपानं रान उठवलं आहे. शिवसेनेनं हिंदुत्ववादी विचार संपवण्याचा घाट घातल्याचा आरोप भाजपाकडून आमदार रवींद्र चव्हाण यांनी केला होता. त्यावरून शिवसेनेवर निशाणा साधला दात असताना आता शिवसेनेनं …

Read More »

भारताचे माजी फुटबॉलपटू सुरजित सेनगुप्ता यांचे निधन

७१ वर्षीय सेनगुप्ता दीर्घकाळ करोनाशी झुंज देत होते. भारताचे माजी मिडफिल्डर आणि पश्चिम बंगालचे माजी फुटबॉलपटू सुरजित सेनगुप्ता यांचे निधन झाले आहे. ७१ वर्षीय सेनगुप्ता दीर्घकाळ करोनाशी झुंज देत होते. १९७०च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक विजेत्या भारतीय संघाचा ते भाग होते. सेनगुप्ता १९७० ते १९७६ दरम्यान सलग सहा वेळा कोलकाता फुटबॉल लीगचे विजेतेपद जिंकणाऱ्या ईस्ट बंगाल संघाचे भाग होते. सेनगुप्ता …

Read More »

“देवेंद्रजी खूप चांगला डोसा बनवतात, मोलकरीन आली नाही तर…”; अमृता फडणवीसांनी केला खुलासा

अमृता फडणवीस यांनी एका शोमध्ये हा खुलासा केला आहे. झी मराठीवर ‘किचन कल्लाकार’ हा नवीन कुकरी शो प्रेक्षकांच्या भेटीस आला. या शोला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. अभिनेता संकर्षण कऱ्हाडे हे या शोचे सूत्रसंचालन करताना दिसत आहे. नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी हजेरी लावली. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजेरी …

Read More »

युपीच्या भैय्यांना पंजाबमध्ये घुसू देऊ नका वक्तव्यावर योगी आदित्यनाथांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी युपी, बिहारच्या भैय्यांना पंजाबमध्ये घुसू देऊ नका वक्तव्य केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. यानंतर भाजपा आणि इतर विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून चरणजीत सिंग चन्नी आणि काँग्रेसवर जोरदार टीका केली जात आहे. उत्तर प्रदेशातही निवडणुका होत असल्याने या मुद्द्यावरुन राजकारण चांगलंच तापलं आहे. विशेष म्हणजे चरणजीत सिंग चन्नी यांनी हे वक्तव्य केलं तेव्हा काँग्रेसच्या नेत्या …

Read More »

Bappi Lahiri Funeral: बप्पी लहरी यांच पार्थिव पंचत्त्वात विलीन, जुहू स्मशानभूमीत पार पडले अंत्य संस्कार

प्रसिद्ध गायक बप्पी लहरी यांचं बुधवारी १६ फेब्रुवारीला निधन झालं. मुंबईतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. ते ६९ वर्षांचे होते. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. बप्पी लहरी यांच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. त्यानंतर आज १७ फेब्रुवारीला त्यांच्या पार्थिवावर जुहूमधील पवन हंस स्मशानभूमीत अंत्य संस्कार करण्यात आले. त्यांचा मुलगा बप्पा लहरी यांनी त्यांना मुखाग्नी दिला. बप्पी लहरी …

Read More »

Hijab Row : प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान; म्हणाल्या, “मुस्लीम महिलांनी घरातच हिजाब घालावा, कारण…”

“हिंदू सनातनी परंपरा मानतात ज्यात महिला देवीचं स्वरूप असतात, म्हणून हिंदू महिला सुरक्षित असतात”, असंही प्रज्ञासिंह ठाकूर म्हणाल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून देशातलं राजकीय वातावरण हिजाब प्रकरणावरून तापू लागलं आहे. कर्नाटकमधून सुरू झालेल्या या प्रकरणाचे पडसाद देशाच्या इतरही काही भागांमध्ये उमटू लागले आहेत. इतकंच काय, काही केंद्रीय नेते देखील यासंदर्भात विधानं करू लागले आहेत. यामध्ये आता साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा …

Read More »

“संजय राऊतांना भीती वाटणं साहजिक आहे कारण…”; किरीट सोमय्या-संजय राऊत आरोप-प्रत्यारोप सुरूच!

आता उद्धव ठाकरेंचे १९ बंगले पायाखाली आले म्हणून आत्ता नोटीस पाठवली आहे, असंही सोमय्या म्हणाले. शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यात गेल्या काही दिवसांपासून आरोप प्रत्यारोपांचं सत्र सुरुच आहे. अशातच आता किरीट सोमय्या यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरीट सोमय्या यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या सांताक्रुझमधील मालमत्तेची पाहणी केली होती. त्यामुळे …

Read More »

कंगनाला करण जोहराला टाकायचे ‘लॉक अप जेल’मध्ये, म्हणाली ‘इंडस्ट्रीमध्ये असे अनेक…’

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत ही कायच चर्चेत असते. ती सामाजिक विषयावर बिनधास्तपणे तिचे मत मांडताना दिसते. तिची प्रत्येक पोस्ट ही चर्चेचा विषय ठरते. कंगना एक दिग्दर्शिका तसेच निर्माती देखील आहे. आता ती डिजिटल प्लॅटफॉर्मवर एक रिअॅलिटी शो होस्ट करताना दिसणार आहे. तिच्या शोचे नाव आहे ‘लॉक अप.’ या शोमध्ये ती इंडस्ट्रीमधील काही सेलिब्रिटींना लॉकअप ठेवणार आहे. कंगनाने आता बॉलिवूडमधील अतिशय …

Read More »

Gangubai Kathiawadi : अभिनेता विजय राजची व्यक्तिरेखा वादाच्या भोवऱ्यात, वाचा नेमकं काय घडलंय

चित्रपट ‘गंगूबाई काठियावाडी’मधील अभिनेता विजय राजच्या भूमिकेची सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे. अभिनेत्री आलिया भट्टची मुख्य भूमिका असलेला चित्रपट ‘गंगूबाई काठियावाडी’चा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून हा चित्रपट कोणत्या ना कोणत्या कारणामुळे वादात अडकलेला दिसत आहे. सुरुवातीला काही लोकांनी या चित्रपटाच्या कथेवर आक्षेप घेतला. त्यानंतर आलियाच्या कास्टिंगवर आणि आता या चित्रपटात अभिनेता विजय राजनं साकारलेल्या तृतीयपंथी महिलेच्या भूमिकेवरुन नवा वाद सुरू झाला …

Read More »

लवकरच बस हवेत उडताना दिसणार; गडकरींची उत्तर प्रदेशात घोषणा; म्हणाले “माझ्याकडे पैशांची कमी नाही, करोडोंमध्ये…”

ज्येष्ठ भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लवकरच हवेत उडणाऱ्या बस पहायला मिळतील अशी घोषणा केली आहे. इतकंच नाही तर हवाई बसचा डीपीआर तयार असल्याचंही नितीन गडकरी यांनी सांगितलं आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने नितीन गडकरी यांनी प्रयागराजमधील सभेला उपस्थिती लावली. यावेळी बोलताना त्यांनी हे आश्वासन दिलं. ग़डकरींनी यावेळी बोलताना सी प्लेन, रिंग रोड, सहा पदरी पुलासह …

Read More »